Industrial Workers Safety Week : औद्योगिक कामगारांच्या सुरक्षा सप्ताहनिमित्त एमआयडीसी मधील कामगारांची आरोग्य तपासणी करुन त्यांना निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अमृतदिप प्रकल्पाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
क्लासिक व्हील कंपनीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ५५० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरावेळी विखे पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश जी मोरे, एम.आय.डी.सी.चे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, जिल्हा रुग्णालयचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, परीसेविका सुरेखा अंधळे, अमृतवाहिनीचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख आदी उपस्थित होते.
सचिन चंगेडिया यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी समाजाच्या विकासासाठी कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असून, निरोगी समाज घडविण्यासाठी दिशादर्शक पाऊल असल्याचे सांगितले.
या शिबिरासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून सुनील मुनोत, सुमित मुनोत, आर. चोडकी यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरासाठी विखे पाटील हॉस्पिटलचे डॉ. प्रतिक देशमुख, डॉ. दिव्या दलिपली, जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक राहुल कडूस, रक्त तापसक नोवेल सातराळकर, अमृत दिप प्रकल्पाचे डॉ. सुरेश घोलप आदींसह महालॅब टीमचे योगदान मिळाले. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या मानस संसाधन विभागातील आधिकरी, अमृतदिप प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सागर विटकर, समुपदेशक प्रसाद माळी, लेखाधिकारी श्रीकांत शिरसाठ, क्षेत्रीय अधिकारी मच्छिंद्र दुधवडे, विकास बर्डे, अजय दळवी यांनी परिश्रम घेतले.