Pooja Varade and Tushar Ghadge Gaurav ः भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा व ग्रुपचे सदस्य ज्यौतिषाचार्य तुषार घाडगे यांना ज्योतिष क्षेत्रातील ज्योतिष महामेरु व ज्योतिष शिरोमनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्कमध्ये वराडे आणि घाडगे यांचा सत्कार महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार झंवर आणि उद्योजक लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सुमेश केदारे, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, दीपक धाडगे, दिलीप गुगळे, शामराव वाघस्कर, विकास भिंगारदिवे, विठ्ठल राहिंज, अशोक लोंढे, रमेश वराडे, नामदेवराव जावळे, सुनिता वराडे, प्रांजली सपकाळ, मनीषा शिंदे, सुरेखा आमले, राजश्री राहिंज, वेणूताई इस्सर, मीना परदेशी, सुधा जावळे, मीना ससाणे, डॉ. सुचेता मांजरे, निर्मला पांढरे, मीना रासणे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले, “हरदिन ग्रुप हा परिवार बनला असून, यश प्राप्त करणाऱ्या परिवारातील सदस्य व त्यांच्या पाल्यांचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रुपचे सदस्य विविध क्षेत्रात यश मिळवून भिंगारचे नाव उज्वल करीत आहे”. आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे हिने भिंगारचे नाव उंचावले असून, खेळातही त्यांनी नाव गाजवलेले आहे. तर ज्यौतिषाचार्य तुषार घाडगे यांनी ज्योतिष क्षेत्रात मिळवलेले पुरस्कार अभिमानास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रमेश त्रिमुखे यांनी मुलांची आवड पाहून त्या दृष्टीने प्रोत्साहन द्या, त्यांच्या इच्छेविरुद्ध केल्यास आपल्या हातात काहीच येणार नसल्याचे सांगितले. अरविंद ब्राम्हणे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामात लढा दिल्याचा वारसा वराडे कुटुंबीयांना मिळालेला आहे. सर्वसामान्य व कष्टाळू कुटुंब असलेले वराडे यांनी सेवानिवृत्तीनंतर तटपुंज्या पेन्शन मधून मुलांना एक मुलगा इंजिनिअर व दुसरी मुलगी पोलीस उपनिरीक्षक घडविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन चोपडा, संजय भिंगारदिवे, अजय खंडागळे यांची भाषणे झाली.
पूजा वराडे म्हणाली, परिस्थितीवर मात करून पुढे गेले. खेळाडूवृत्तीने परिस्थितीचा सामना केला. खेळात सातत्य असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र इच्छाशक्तीमुळे पुन्हा अभ्यासाकडे वळून हे यश प्राप्त केले. दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश आले. स्पर्धा मोठी आहे. मुलांना वेळ द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा. मुलींच्या लग्नाची घाई करू नका, त्यांना आपले भवितव्य घडवू देण्याचे आवाहन तिने केले.
बापूसाहेब तांबे, किशोर भगवाने, अशोक पराते, सरदारसिंग परदेशी, अविनाश जाधव, संजय भिंगारदिवे, दिनेश शहापूरकर, प्रफुल्ल मुळे, सुंदरराव पाटील, सुधीर कपाले, अविनाश पोतदार, डॉ. राहुल हजारे, एकनाथ जगताप, मुन्ना वाघस्कर, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, अशोक भगवाने, अशोक दळवी, राजू कांबळे, प्रकाश भिंगारदिवे, बबनराव चिंचीणे, मुरलीधर बरबडे आदी उपस्थित होते. रमेश वराडे यांनी आभार मानले.