Award :शहीद काॅम्रेड गाेविंद पानसरे यांनी शेतकरी, कामगार, कष्टकयांसाठी आयुष्य वेचले. ज्ञानदेव पांडुळे समाजभान असलेला कार्यकर्ता त्यांचेच कार्य पुढे नेत असल्याचे काैतुक आहे. त्यामुळे काॅम्रेड गाेविंद पानसरे स्मृती प्रबाेधन पुरस्काराने सन्मानित करताना आनंद हाेत असल्याचे प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीला माेराळे (बीड) यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे काॅ. गाेविंदभाई पानसरे स्मृती प्रबाेधन पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी प्रा. सुशीला माेराळे बाेलत हाेत्या. हमाल पंचायतीचे राज्य सल्लागार बाबा आरगडे अध्यक्षस्थानी हाेते. आमदार संग्राम जगताप, प्रा. तानाजी ठाेंबरे, माजी आमदार दादा कळमकर, स्मिता पानसरे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गाेसावी आदी उपस्थित हाेते.
प्रा. सुशीला माेराळे म्हणाल्या, “गाेविंदभाई पानसरे यांच्या नावाने पुरस्कार म्हणजे डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा, प्राेत्साहन आणि ऊर्जा आहे. सध्या देशातील वातावरण मनुवादी आहे. फॅसिट प्रवृत्तींचा प्रभाव आहे. यातून समाजात द्वेष पसरत आहे”. शब्दगंध कार्यकर्त्यांची याेग्य निवड करत असल्याचे सुशीला माेराळे यांनी काैतुक केले.
आमदार संग्राम जगताप यांनी ज्ञानदेव पांडुळे यांनी सर्वसामान्य आणि कष्टकरी यांच्या हिताची कामे केले. त्यांच्या कामाची पावती अनेक सामाजिक संस्थांनी दिली आहे. शब्दगंधने पुरस्कार देऊन त्यांच्या कामावर माेहाेर उमटवली असल्याचे सांगितले. स्मिता पानसरे यांनी गाेविंद पानसरे यांचे विचार संपलेले नाहीत. राज्यातील कानाकाेपऱ्यात अनेक पानसरे विचारांची ज्वाला घेऊन तयार आहे, असे सांगितले.
शब्दगंधचे खजिनदार भगवान राऊत यांनी स्वागत केले. संस्थापक सुनील गाेसावी यांनी प्रास्ताविक केले. शाहीर भारत गाडेकर यांनी पाेवाडा सादर केला. वकील बन्सी सातपुते, कारभारी उगले, वकील सुभाष भाेर, प्रा. मेधा काळे, मधुसूदन मुळे, वकील सुधीर टाेकेकर, अजयकुमार साळवे, प्रा. जयंत गायकवाड, युनूस तांबटकर, प्राचार्य विश्वास काळे, लेविन भाेसले आदी उपस्थित हाेते. शर्मिला गाेसावी यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. अशाेक कानडे यांनी आभार मानले.
