जगभरात ओळखले जाणारे सर्च इंजिन गुगल आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ता गुगलने विशेष ‘डूडल’ शेअर केले आहे. या गुगलमधील दाेन ‘ओ’च्या ठिकाणी 25 हा अंक वापरला आहे. गुगलची स्थापना 27 सप्टेंबर 1998 राेजी सहसंस्थापक सेर्गे ब्रिन आणि लॅरी पेज यांनी केली. गुगलने 25 वर्षाच्या वाटचालीत वर्ल्ड वाइड वेब वापरण्याचा मार्ग नेहमीच बदलला आहे. मे 2011 राेजी गूगलने मासिक युजर्सची संख्या प्रथमच एक अब्ज ओलांडली. यानंतर गुगलने नेहमीच अग्रेसर राहिले.
गुगल लाेकप्रिय हाेण्यामागचे प्रमुख कारण
गुगल आज जगभरात लाेकप्रिय आहे. त्याची प्रमुख दाेन करणे आहेत. एक सर्च करण्याची साेपी पद्धत आणि वापरण्यासाठी हवी ती माहिती सहज, सुलभपणे उपलब्ध हाेणे ही दाेन प्रमुख कारणे लाेकप्रिय हाेण्या मागे आहे. यातून गुगलने जगाच्या बाजारपेठेत वर्चस्व स्थापित केले.
डाॅक्टरेट विद्यार्थी सर्गे ब्रिन आणि लॅरी पेज 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात स्टॅनफाेर्ड विद्यापीठाच्या संगणक विज्ञान कार्यक्रमाचा पाठपुरावा करताना भेटले. यानंतर दाेघांची वैचारिक दृष्टी एकच हाेती. यानंतर दाेघांनी वर्ल्ड वाइड वेबवर काम सुरू केले. दाेघे खूप मेहनती हाेते. एक सर्च इंजिन बनविण्यासाठी ते दाेघे मेहनत घेत हाेते. यातून त्यांनी एक चांगल्या शाेध इंजिनसाठी प्राेटाेटाइप तयार केला. काम वाढत असल्याने त्यांनी वसतिगृहातून गुगलचे कार्यालय एका भाड्याच्या गॅरेजमध्ये स्थलांतरित केले. Google Inc. ची 27 सप्टेंबर 1998 मध्ये अधिकृतपणे स्थापना केली.
हे दाेघे गुगलवर काम करत राहिले. 1998 गुगलमध्ये बरेच बदल झाले. लाेगाे देखील बदलला. ते आजचे ‘डुडल’ पाहिल्यावर लक्षात येते. गुगलने एका क्लिकवर जगाची माहिती घराेघरी पाेहचवली. त्यांचे मिशन आजही तेच आहे. सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन करून त्याचे सार्वत्रिकरण आणि उपयुक्तता सुनिश्चित करणे हाच गुगलचा आजपर्यंतचा उद्देश राहिला आहे. आज जगभरातील अब्ज लाेक गुगलच्या माध्यमातून माहिती संकलित करताना दिसतात. तसे ते गुगलवर अवलंबून असल्याचे जाणवते.