हिंदी चित्रपट ‘गदर 2’, ‘OMG 2’ आणि ‘राॅकी और रानी की प्रेम कहानी’, या तिन्ही चित्रपटांनी रविवारी जाेरदार कमाई केली. या तिन्ही चित्रपटांची रविवारी एकत्रित कमाई 75 काेटी रुपयांजवळ हाेती. हिंदी चित्रपट उद्याेगासाठी हा एक दिवस सर्वाधिक कमाईचा ठरला.
‘गदर 2’ या चित्रपटाने रविवारी सर्वाधिक 52 काेटी रुपयांची कमाई केली. ओपनिंग विकेंडला एकूण 135 काेटी रुपयांची कमाई झाली. ‘गदर 2’ सनीचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला आहे. दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘OMG 2’ च्या कमाईत देखील वाढ हाेत आहे. रविवारी या चित्रपटाने 20 काेटी रुपयांच्या जवळ कमाई केली. चित्रपटाचे ओपनिंग विकेंडचे कलेक्शन 45 काेटी रुपये झाले आहे.
या दाेन चित्रपटाबराेबर राॅकी आणि राणीच्या प्रेमकहाणीने तिसऱ्या आठवड्यातील रविवारी चार काेटी रुपयापर्यंत कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 130 काेटी रुपये कमावले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत कितपत कमाई करतात, हे पाहावे लागेल.