नृत्यांगणा गाैतमी पाटील ही काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्र गेले काही दिवस ठरले आहे. आता तर तिच्या नावातील आडनावावरून गदाराेळ सुरू झाला आहे. पुण्यात एक बैठक झाली. त्यात गाैतमीचे आडनावावरून वाद झाला. गाैतमीचे अडनाव हे पाटील नसल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला.
ही बैठक हाेत नाही, ताेच गाैतमीच्या आडनावावरून समाज माध्यमांमध्ये गदाराेळ सुरू झाला. तिच्या आडनावावर काहींचा अक्षेप असला, तर तिला काहींनी फुल्ल सपाेर्ट दिला आहे. गाैतमीच्या गावातील महिलांनी देखील तिला सपाेर्ट केला आहे. गाैतमी ही कलाकार आहे. तिच्या प्रगतीवर काहीजण जळतात. त्यामुळे तिच्याभाेवती वाद निर्माण केले जात आहे. ती पाटील आहे, अन् ती पाटीलच राहिल, असे तिच्या गावातील महिलांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. त्यावेळी मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांच्या मते, “गाैतमीचे खरे आडनाव चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करत आहे. तिने हे पाटील आडनाव लावू नये. अन्यथा तिच्या नृत्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात हाेऊ देणार नाही”.
नृत्यांगणा ही मनाेरंजन विश्वात नेहमीच चर्चेत असते. सबसे कातिल गाैतमी पाटील हा तिचा डायलाॅग चर्चेत आहे. तरुणाईबराेबर ज्येष्ठांच्याही ताेंडी हा डायलाॅग आहे. तिच्या अदांवर मीम्स देखील व्हायरल हाेत आहेत. प्रसिद्धी बराेबर तिच्याभाेवती वाद आहेत. जिथं गाैतमीचे कार्यक्रम हाेतात, तिथं राडा हाेताेच हाेताे. त्यामुळे तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला अतिरीक्त पाेलिस बंदाेबस्त ठेवावा लागताे. आता तिच्या आडनावावरून गदाराेळ सुरू झाला आहे.
अभिनेता किरण माने यांनी मात्र तिच्या आडनावावरून गदाराेळ करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. एक छाेटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे, असे गाैतम बुद्ध अंबठ्ठाला सांगितलेले हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांत सुंदर आणि आशघन वाक्य आहे, असे आ. ह. साळुंखे नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या स्वातंत्र्य या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण कुठेच नाही.
“आपण माणूस आहाेत. मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये? एखाद्यानं काय बाेलायचं, कसं वागायचं, स्वतःच्या घरात काय खायचं, कसले कपडे घालायचे यावर बंधन आणण्याचे प्रकार सुरू आहेतच. पण आता कळस झालाय. एका मुलीने पाेटापाण्यासाठी काय करावं किती पैसे घ्यावेत, इथंपासून ते आता तिनं कुठलं आडनांव लावावं यासाठी जबरदस्ती करत असाल, धमक्या देत असाल, तर हे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हायं”, असं अभिनेता किरण माने यांनी म्हटलं आहे.