Fear of stopping Examination राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदाेलन सुरू केले आहे. या महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. यातच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केल्याने विद्यापीठ प्रशासनासमाेर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षांवर बहिष्कार घातला आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संताेष कानडे यांनी दिली. राज्यातील सर्व महाविद्यालयांसमाेर कर्मचारी यांनी आज काम बंद आंदाेलन करून निदर्शने केली. अहमदनगर जिल्ह्यातील आंदाेलनात
बबन साबळे, वंदना लाहोर, हेमा कदम, सविता डांगे, रवी वर्पे, सिताराम मुळे, दत्तात्रय जाधव, भानुदास गुंजाळ, शिवाजी बोरुडे, सुरेश शिंगणे, योगेश शेळके, प्रशांत घोडके, विजय म्हस्के, रुपेश शिंदे, दत्तात्रय हिरणवाळे, अशोक कदम, दादा आगळे, बाबासाहेब वाघुले, विलास लांघी, गोकुळ फलके, श्रीराम बनसोड, रविंद्र बुधवंत, दिगंबर भडकवाड, मनोज पवार, दिपक विराट, संजय शिंदे, संतोष बुगे, चेतन साळवे, जगदिश कोंगे आदी सहभागी झाले हाेते.
