पीएम किसान याेजनेबाबत माेठी अपडेट समाेर आली आहे. या याेजनेतील निधी वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यास प्रति वर्षिक सरकारवर 20 ते 30 हजार काेटी रुपयांचा बाेजा वाढणार आहे. निधी वाढीच्या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात ही वाढीची रक्कम कधी जमा हाेणार, हे मात्र अनिश्चित आहे.
देशातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचत्या याेजना राबवत आहेत. पीएम किसान सन्मान निधी याेजना त्यातील एक आहे. देशातील काेट्यवधी शेतकऱ्यांना या याेजनाचा माेठा फायदा झाला आहे. याच याेजनेतील निधी वाढीचा प्रस्ताव आता समाेर आला आहे. ही वाढ झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा हाेणार आहे. मात्र 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता निधी वाढीच्या प्रस्तावानुसार सन्मान निधी हा 50 टक्के वाढू शकताे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 14 हप्ते देण्यात आले आहेत.
निधी वाढीचा प्रस्ताव चार राज्यांमधील निवडणुकांपूर्वी हाेण्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी सन्मान निधीमध्ये सुमारे 50 टक्के वाढ होऊ शकते, म्हणजेच दोन हजार रुपयांवरून शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळू शकतात.
पिकांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) लागू केल्यानंतर काही राज्यांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा, असे देशभरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या मागणीचा विचार करून सरकार किमान आधारभूत किंमतीवर अधिक अन्नधान्य खरेदी करण्याची तयारी करत आहे.