एकेकाळी 365 राजपूत राजांनी आपल्या देशाचे संरक्षण केले होते. धर्माचे व सर्व समाजांचे रक्षण राजपूत समाज पुरातन काळापासून करत आहे. राजपूत समाज जेव्हढा प्रेमळ व शांतताप्रिय आहे तेव्हढाच आक्रमक आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यासह आठ मंत्री राजपूत आहेत. राजपूत युवक हुशार आहेत पण आरक्षणामुळे त्यांना संधी मिळत नाहीये. तसेच सरकारी योजनांच्याही लाभ पासून समजा लांब आहे. त्यामुळे राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून समाजाचे प्रलंबित प्रश्न पदाधिकारी सोडवणार आहेत. अहमदनगरमधील राजपूत युवकांनी राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून संघटीत होवून आपल्या पूर्वजांनी जो पराक्रम गाजवला त्यांचे स्मरण करून समाजासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष शामसिंह ठाकूर यांनी केले.
अहमदनगर शहरात श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष शामसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत राजपूत करणी सेनेची स्थापना करण्यात आली. यावेळी झालेल्या मेळाव्यात ठाकूर बोलत होते. यावेळी सेनेचे प्रदेश सचिव गुलाबसिंह परदेशी, उपाध्यक्ष काशिनाथसिंह ठाकूर, युवा कार्याध्यक्ष सागरसिंह बघेल, नगरसेवक प्रदीप परदेशी, संचितसिंह परदेशी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात राजपूत करणी सेनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी महेंद्रसिंह चौहान व जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल ठाकूर यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
नगरसेवक प्रदीप परदेशी म्हणाले, “अहमदनगर शहरात राजपूत समजाची संख्या कमी असली तरी स्व.अनिल राठोड या राजपूत वाघाने तब्बल 25 वर्ष शहरावर अभिराज्य गाजवले. राजपूत समाज हा अन्याय सहन न करणारा समाज आहे. म्हणून जेथे अन्याय होतो तेथे राजपुतांनी धावून गेले पाहिजे”. अहमदनगरमध्ये राजपूत करणी सेनेची शाखा स्थापन झल्याने या शाखेच्या माध्यमातून राजपूत समाजाचे चांगले संघटन उभे राहील. यासाठी सर्व सहकार्य करू, असेही ते म्हणाले.
गुलाबसिंह परदेशी यांनी राजपूत करणी सेनेच्या कार्याची माहिती दिली, संचितसिंह परदेशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या राजपूत करणी सेनेची कार्यकारणी पुढील प्रमाणे- जिल्हा सचिव किशोरसिंह परदेशी, शहर अध्यक्ष रोहनसिंह परदेशी, विभाग प्रमुख प्रीतम परदेशी, कार्याध्यक्ष किसनसिंह परदेशी, उदयभान चंदेल, विजय कौशिक, ओमकार चौहान, हर्शल परदेशी, सचिन परदेशी, श्रेयस परदेशी, अजय परदेशी, महेश ठाकूर, महेश दिक्षित, संतोष ठाकूर, हरीष परदेशी, गणेश चौहान, दिलीप परदेशी, कचरू परदेशी, निलेश परदेशी, किशोरसिंह राजपूत, करण चौहान, कुंदन चौहान, कार्तिक चौहान व राणा चौहान आदींची नियुक्ती करणात आली.