BSP News ः बहुजन समाज पक्षाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
बसपाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, विधानसभा प्रभारी गणेश बागल, शहराध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, रवी बाबा, महिला शहराध्यक्षा मनीष जाधव, किरण सोनवणे, जालिंदर कातोरे, तन्मय मोरे, बाळासाहेब मधे, अजित यादव, बाळासाहेब काटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुरिता झगडे म्हणाल्या, “महापुरुषांची जयंती डिजेवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आहे”. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या तेजाने समाजाला प्रकाशमान केले. त्यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन गेल्यास समाजाचे भविष्य उज्वल असल्याचे, ते म्हणाल्या.
उमाशंकर यादव यांनी पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत जोखडलेल्या समाजाचे बाबासाहेबांनी नेतृत्व करुन त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. बाबासाहेबांचे विचार घेऊन बहुजन समाज पार्टी देशात कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.