वास्तविक ज्ञानेश्वरी श्रीमद् भगवत गीता हे उत्कृष्ट जीवन जगण्याच्या मार्गदर्शिका आहेत. आपण खरोखरच भाग्यवान आहोत की, आपला जन्म माऊलंच्यानंतर झाला. बाकी सर्व ग्रंथ, वेद, उपनिषद हे संस्कृतमध्ये असल्यामुळे त्या संस्कृत भाषेचे ज्ञान संपादन करावे लागते. अधिकारी प्राप्त करावा लागतो. परंतु ज्ञानेश्वरी त्या बाबतीत ‘भाव धरुनी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरि तयावरी’ हे संत एकनाथ महाराजांचे वचन आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत भाव किर्ती श्रेष्ठ आहे याचे अनेक सुंदर वर्णन हभप नीळकंठ देशमुख यांनी करुन उदाहरणा सहित स्पष्ट केले.
सनातन धर्मसभेच्यावतीने श्रावण मास पर्वकाळानिमित्त सुरु असलेल्या कीर्तन-प्रवचन सेवेत नीळकंठ देशमुख महाराज यांनी ‘तू मन देवी मी करी’ या 9 व्या अध्यायाच्या ओवीचे निरुपण करतांना केले. यावेळी सनातन धर्म सभेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक, मंत्री दिनकर देशमुख, पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.
नीळकंठ देशमुख म्हणतात, “मन हा तसं पाहिले, तर जीवाचा सर्वात जवळचा मित्र आहे. मन या शब्दातला भाव स्पष्ट करतांना, त्यांनी मन हा शब्द उलगडून दाखवला. ‘मन’ या एका शब्दात दोन अक्षरे आहेत म व न ‘म’ म्हणजे माझे ‘न’ म्हणजेनाही याचा अर्थ या विश्वात माझे काही नाही. ही मनाची अवस्था होणे महत्वाचे आहे. कारण महत्वाचे आहे. कारण ज्ञानेश्वरी ओवी आहे ‘मी माझी ऐसी आठवण, विसरले जयांचे अंत:करण, तो जाण संन्यासी निरंतर’. संन्यास अवस्था म्हणजे नक्की काय मी आणि माझे याचे ज्याला विस्मरण झाले तो महात्मा. तसेच विस्मरण हे महत्वाचे आहे. कारण मी मधध्ये अहंकार असतो तर माझ्यामध्ये स्वार्थ असतो. या दोन्ही गोष्टी जीवनाचा घात करणार्या असतात. त्यामुळे या दोन्हीचा विसर ही मनाची सर्वोत्कृष्ट अवस्था आहे. ‘मन’ हे इंद्रिय असम्या उल्लेख मनुस्मृतीमध्ये आहे. त्यामुळे मन हे पाच कर्म इंद्रिय व प्रवान इंद्रियांचे मन हे अध्यक्ष आहे, असे त्याचे वर्णन करावे लागेल. मन मनुष्याला कवी स्थिर बनू देत नाही. ज्यावेळी अशी अवस्था असते की, शरीर एका ठिकाणी आहे व मन फिरते ती अवस्था असते की, शरीर एका ठिकाणी आहे व मन फिरते ती अवस्था प्रपंचाची असते”.
परंतु मन स्थिर व शरीर फिरते ती अवस्था म्हणजे परमार्थ. प्रपंच हा कधीही संपत नाही. तो नेहमी अपुराच राहतो. परंतु ज्ञान प्राप्त करुन स्वत:ला मी ला ओळखणे. आत्मसात प्राप्त करुन घेणे यातच परमार्थ पूर्ण होते. हीच यशस्वी जीवनाचा आनंद आहे. ‘मन’ याचा आकार केवढा आहे हे सांगता येत नाही, दाखवता येत नाही, ‘मन’ असे आहे की, त्याला आनंद होतो, दु:ख होते. मन शंकेखोर आहे तर मन हे ज्ञानाचे साधन आहे. वर्गात गुरुजी म्हणतात लक्ष कोठे आहे. म्हणजे मन कोठे आहे, अशी अनेक उदा. देत भक्तांना नीळकंठ देशमुख यांनी प्रवचनाने आनंद देत होते.