माेबाईलवर टीव्ही पाहण्याची परवानगी मिळणार आहे. D2M (डायरेक्ट-टू-माेबाईल) हे तंत्रज्ञान माेबाईलधारकांना त्यांच्या डिव्हाईसवर केबल किंवा DTH कनेक्शनद्वारे टीव्ही पाहण्याची परवनागी देणार आहे. दूरसंचार विभाग (DoT), माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB) आणि IIT-कानपूर यावर काम करत आहेत. माेबाईलवर टीव्ही पाहण्यास मिळाल्यावर हा क्रांतीकारक निर्णय हाेणार आहे. परंतु टेलिकाॅम ऑपरेटर या प्रस्तावाला विराेध करण्याच्या तयारीत आहे.
DoT, MIB, IIT-कानपूरचे अधिकारी तसेच दूरसंचार आणि प्रसारण उद्योगांचे प्रतिनिधी याबाबत आठवड्यात बैठक हाेणार आहे. या बैठकीत प्रस्तावावर चर्चा हाेणार आहे. डारेक्ट टू माेबाईल म्हणजे तंत्रज्ञानावर काम अजून सुरू आहे. हे तंत्रज्ञान लाेकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी वेळ लागणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान एफएम रेडिओसारखेच काम करणार आहे.
हे तंत्रज्ञानाला टेलिकाॅम ऑपरेटरने विराेध सुरू केला आहे. त्यांच्या व्यवसायासाठी हे धाेकादायक आहे. तसेच 5G व्यवसायाचे माेठे नुकसान हाेईल, असे म्हणणे आहे. यावर ‘आम्ही व्यवहार्यता तपासात आहाेत. दूरसंचार ऑपरेटरसह सर्व भागधारकांची बैठक घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल’, असे दूरसंचार आणि प्रसारण विभागातील अधिकारी यांचे म्हणणे आहे.
OTT प्लॅटफाॅर्म माेबाईल फाेनसाठी मल्टीमीडिया कंटेंट प्रदान करण्यासाठी या D2M तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. प्रसार भारती सध्या टीव्ही प्रसारणासाठी 526-582 मेगाहर्ट्झ बॅंड वापरते. हा बॅंड माेबाईल आणि ब्राॅडकास्ट अशा दाेन्ही सेवांसाठी आहे.