‘धर्मवीर’ सिनेमा प्रचंड गाजला. हा सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला हाेता. आता धर्मवीर 2 सिनेमाची बुधवारी घाेषणा झाली आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गाेष्ट… अशी टॅगलाईन देत धर्मवीर 2 ची घाेषणा करण्यात आली आहे. जेजुरीच्या खंडाेबाचा आशीर्वाद घेऊन धर्मवीर 2 ची घाेषणा निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली आहे.
निर्माते मंगेश देसाई म्हणाले, “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सर्वांसमोर आणले. धर्मवीर आनंद दिघे साहेब सिनेमाच्या माध्यमामातून सर्व जगभर पाेहाेचले. ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजले. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करत आहाेत, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2… साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच… “
दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी धर्मवीर 2चे पोस्टर शेअर केले आहे. “जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने ‘धर्मवीर 2’ ची मी अधिकृत घोषणा करत आहे”. ‘धर्मवीर २’ मधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…” असं कॅप्शन देत धर्मवीर 2 ची घोषणा झालीय, असे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.