Ahmednagar Sport : नगर शहरातील देवेंद्र वैद्य हा बिहार पटना येथे झालेल्या 24 व्या नॅशनल चेस चॅम्पियन स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. देवेंद्र याची सर्बिया येथे जून महिन्यामध्ये होणाऱ्या वर्ल्ड बुद्धिबळ डेप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
देवेंद्र वैद्य याने मिळवलेल्या या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, माजी सभापती अविनाश घुले, दिनेश जोशी, मंगेश खताळ, गजेंद्र भांडवलकर, दिलीप पवार, अजय गांधी आणि आंबादास नामदे उपस्थित होते .
आमदार संग्राम जगताप म्हणाले, “देवेंद्र वैद्य यानी बुद्धिबळ क्रीडा प्रकारामध्ये आपल्या शहराचे नाव देशपातळीवर घेऊन जाण्याचे काम केले. आता त्याची निवड वर्ल्ड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली असून त्यांनी आपल्या नगर शहराचा नावलौकिक वाढविला आहे. कुठल्याही क्रीडा प्रकारांमध्ये ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येत असते”. आता विद्यार्थ्यांनाही शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे असेही आमदार जगताप यांनी यावेळी म्हटले.