युरोपची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट हाेत चालली आहे. आर्थिक संकटाने युराेपला घेरले आहे. जर्मनी, स्पेन, ग्रीस या प्रमुख देशानंतर आता नेदरलॅंड या देशाची अर्थव्यवस्था काेलमडली आहे. या वर्षी सलग दुसऱ्या तिमाहीत या देशाच्या जीडीपीत -0.3 टक्के अकुंचन पावला आहे. परिणामी नेदरलॅंडला अधिकृतरित्या तांत्रिक मंदीत ढकलले गेले आहे. युराेपच्या अनेक देशांमध्ये हा ट्रेन्ड आहे. त्यामुळे युराेपात सध्या आर्थिक मंदीची लाट सुरू असल्याचे दिसते आहे.
नेदरलॅंडचा सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत घसरण झाली आहे. या देशात अधिकृतरित्या टेक्निकल रिसेशनमध्ये गेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेली ही घट आणि घरगुती वस्तूंचा कमी झालेला वापर ही या आर्थिक मंदीची प्राथमिक कारणे आहे. या वर्षाच्या सुरूवातीला तीन महिन्यांच्या तुलनेत नेदरलॅंडची अर्थव्यवस्था -0.4 टक्क्यांनी आकुंचली हाेती. यानंतर दुसऱ्या तिमाहीत ती आर्थिक मंदीपर्यंत पाेहाेचली. यानंतर 2022 च्या तुलनेत या देशाचा जीडीपी सध्या -0.3 इतका आकुंचन पावला आहे. मालाची निर्यात कमी झाला आहे. घरगुती खर्चात कपात झाल्याने तसेच आयातीत वाढ झाल्याने हा परिणाम झाल्याचे अर्थतज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नेदरलॅंडच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि मत्स या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. या क्षेत्रात काम करणारे मजुरांवर बेराेजगार हाेण्याची वेळ आली आहे. हे क्षेत्र थेट -4.1 टक्क्यापर्यंत आकुंचन पावले आहे. व्यापार, ट्रान्सपाेर्ट आणि हाॅस्पिटॅलिटी क्षेत्रात देखील -2.0 टक्के आकुंचन पावले आहे.