सध्या बाॅलिवूड आणि वाद असे समीकरण बनले आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या ‘राॅकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची जाेरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी ट्रेलरचा पसंती दिली आहे. चित्रपटातील गाण्यांना देखील प्रक्षेकांकडून पसंती मिळत आहे. परंतु या चित्रपटातील एक सीन वादाच्या भाेवऱ्यात अडकला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर आणि आलिया व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 28 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. करण जाेहर याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटातील वादाचा मुद्दा म्हणजे या चित्रपटातील एका सीनमध्ये नाेबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला आहे, असा आराेप हाेत आहे. हा सीन ट्रेलरमध्ये देखील पाहायला मिळत आहे. या सीनमध्ये राॅकी (रणवीर सिंह) तीन महिन्यांसाठी राणी (आलिया भट्ट) हिच्या घरी जाताे. तेव्हा त्याचे लक्ष रवींद्रनाथ टागाेर यांच्या फाेटाेकडे जाते आणि ताे त्यांना राणीचे आजाेबा म्हणून त्यांच्या पाया पडताे.
ही सीन विनाेदी शैलीतून सादर केला आहे. त्यामुळे हा सीन नेटकऱ्यांना खटला आहे. त्यातून नेटकरी ट्राेल करत सुटले आहे. करण जाेहरवर देखील टीकास्त्र साेडले आहे. नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, बाॅलीवूड कधीच भूतकाळातून शिकणार नाही. रवींद्रनाथ टागाेर यांचा अपमान कसा करू शकता? भारताच्या इतिहासात ज्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, याेगदान आहे, त्यांचा अपमान सहन करणार नाही, असे नेटकरी म्हणत आहे.
रवींद्रनाथ टागाेर यांच्यावर विनाेद करण्याचे धाडस कसे हाेते. ट्रेलर मजेशीर आहे, पण यातील एक सीन पाहून आश्चर्याचा धक्का बसला असून, उद्देश चांगला नाही, असे नेटकरी म्हणत आहेत.