‘द केरला स्टाेरी’, चित्रपट अजूनही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कथानकावरून अजूनही आराेप-प्रत्याराेप सुरू आहेत. हिंदू संघटनांनी या चित्रपटाला डाेक्यावर घेतला. काही राज्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. चित्रपटाच्या निर्मात्याने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेऊन ती बंदी हटवली. या गदाराेळात चित्रपटाने कधी 200 काेटी रुपये कमावले हे देखील लाेकांच्या लक्षात आले नाही. या चित्रपटाचा वाद असतानाच आता गेल्या आठवड्यात ’72 हूरें’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
“’72 हूरें’ चित्रपटाचा टीझर रिलिज हाेताच, त्याला अनेकांनी विराेध करण्यास सुरूवात केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित हाेऊ देवू नका”, अशी मागणी हाेऊ लागली आहे. टीझरवरूनच वाद सुरू झाला असताना या चित्रपटाच्या निर्मात्याने ’72 हूरें’ चित्रपटाचा टीझर हिंदी भाषेबराेबर आणखी दहा भाषेत रिलिज करण्याची घाेषणा केली आहे.
’72 हूरें’, हा चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंह चाैहान यांनी केले आहे. टीझर इतर भाषांमध्ये रिलिज करण्यासंदर्भात दिग्दर्शक म्हणाले, “या चित्रपटात दाखविलेल्या कथेचे विषयाचे गांभीर्य देशातील कानाकाेपऱ्यातील लाेकांना कळावे यासाठी इतर दहा भाषांमध्ये टीझर रिलिज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटातून काेणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही. त्यामुळे चित्रपटाला विराेध करण्याचे काहीच कारण नाही”.
चित्रपटाचे निर्माते गुलाबसिंग तन्वर म्हणाले, “एवढ्या गंभीर विषयावर चित्रपट बनविणे हे साेपे काम नव्हते. आमिषाने तरुणांची कशी दिशाभूल हाेते, हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. त्यामुळे हा चित्रपटाचा टीझर विविध दहा भाषांमध्ये रिलिज करण्याचा निर्णय घेतला आहे”. चित्रपटाची निर्मिती अशाेक पंडित यांनी केली आहे. हा चित्रपट 7 जुलै 2023 राेजी प्रदर्शित हाेत आहे.