भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. हा दावा करताना राणे यांनी काॅंग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येणार आहेत, असे म्हटले आहे. राणे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय मंत्री नाराणय राणे म्हणाले, “इंडिया आघाडीत 30 पक्ष एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. काॅंग्रेस आणि शरद पवार एकत्र आले, तरी फरक पडणार नाही. ते तिघे हाेते, तरी काहीही करू शकले नाही. तिघांचे दाेन झाले, तरीही काही करू शकले नाही. आता दाेघांचे पुन्हा तीन झाले आहेत, पुढे चार हाेतील. पण त्यामुळे काहीही हाेणार नाही. आता काॅंग्रेसचे देखील काही जण आमच्याकडे येणार आहे. आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करणार आहाेत”.
काॅंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण हे काॅंग्रेसच्या 11 आमदारांसह भारतीय जनता पक्षासाेबत सत्तेत सहभागी हाेणार अशी चर्चा हाेती. तशा बातम्या देखील व्हायरल झाल्या आहेत. अशाेक चव्हाण यांनी मात्र याला नकार दिला असला, तरी त्यात चव्हाण यांच्या गटाला चार मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात हाेती.
अशाेक चव्हाण यांनी मात्र यावर भाजपमध्ये आपण तेव्हा जावू जेव्हा काॅंग्रेसमधील माझ्या हितचिंतकांना माझे काॅंग्रेसमध्ये चांगले चाललेले पहावत नसले. तेच लाेक माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या पेरत आहेत. पण मी काॅंग्रेसमध्ये राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. आहे.