Cold महाराष्ट्र राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सकाळी अकरा वाजल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत उन्हाच्या झळा असह्य हाेतात. सकाळीच्या उन्हाच्या झळा तीव्र जाणवत असल्या, तरी रात्री थंडी वाढते आहे. हा वातावरणातील बदल सर्व अनुभवत आहेत. पुढील दाेन दिवस उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. यानंतर पुन्हा गारवा वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
वातावरणातील बदलाचा अभ्यास करताना काही निरीक्षणांची नाेंद झाली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सातत्याने बदल हाेत आहेत. जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. परिणामी थंडी परतण्याची शक्यता आहे. काल रात्री राज्यभर थंड वारे वेगाने वाहत हाेते. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत थंड वार्याच्या वेगांमध्ये वाढ झाली हाेती.
राज्यात सध्या कमाल तापमानामध्ये वाढ नाेंदवली गेली आहे. सध्या कमाल तापमानामध्ये सरासरी तीन ते चार अंश सेल्सिअस एवढी वाढ नाेंदवली गेली आहे. काेकण, मुंबई, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि थंडी जाणवत असल्याने आराेग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
