‘दहीहंडी गाेविंदा या खेळाला सहासी खेळाचा दर्जा देण्यात आला असून, दहीहंडी खेळातील गाेविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुबंईतील वरळीतील एनसीसीआय डाेम इथं देशातल्या पहिल्या प्राे-गाेविंदा लीग 2023 या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्य सरकारने 50 हजार गाेविंदांना विमा कवच दिले हाेते. 50 हजार नाेंदणी पूर्ण झाली मात्र अनेक गाेविंदांना नाेंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गाेविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय घेत त्याला मंजुरी दिली”. आता 75 हजार गाेविंदांना विमा संरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
देशात पहिल्यांदा गाेविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गाेविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा उद्याेगमंत्री सामंत यांनी व्यक्त केली. यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच प्राे-कबड्डीसारखे प्राे-गाेविंदासाठी अभिनेता अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.