Kedgaon Shiv Jayanti ः नगर शहरातील केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्थेसमोर संदीपदादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांची सिंहासनावरील आकर्षक मूर्ती अभिवादनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी युवकांनी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आणि उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, संदीपदादा युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, भाऊ बारस्कर, माजी नगरसेविका लता शेळके, गौरी ननावरे, सविता अशोक कराळे, शकुंतला पवार, सुनिता कांबळे, राहुल कांबळे, सागर सातपुते, बापू सातपुते, गणेश सातपुते, गणेश नन्नवरे, नवसुपे महाराज, अजित पवार, सोमनाथ बनकर उपस्थित होते.
धनश्री विखे यांनी संदीपदादा कोतकर युवा मंच आणि संदीप व्यायाम शाळेच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंती उत्सवाबरोबर राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे. संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे कार्य केले जात असल्याचे कौतुक केले. सचिन कोतकर यांनी शिवजयंतीच्या केडगावच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.