भारताच्या चांद्रयान-3 माेहिमेचे जगभरात काैतुक हाेत आहे. या माेहिमेच्या यशानंतर जगभरातील शास्त्रज्ञांकडून आणि राजकीय नेत्यांकडून भारताच्या या माेहिमेचे काैतुक झाले. मात्र चीनने या माेहिमेवरून आता कुरापत काढली आहे. भारताचे चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरलेच नाही, असा दावा चीनच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी केला आहे. भारताच्या या यशावर चीनने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नवीन वादाला ताेंड फुटले आहे. भारताने देखील याला चाेख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे.
चांद्रयान-3 माेहिमेद्वारे चंद्रावर विक्रम लॅंडर उतलले. यानंतर प्रज्ञान राेव्हरमधून परीक्षणाचे काम सुरू झाले. यानंतर चंद्रावर रात्र सुरू झाली. यामुळे प्रज्ञान आणि विक्रमचे सर्व काम थांबवण्यात आले. चंद्रावरील रात्र आणि दिवस हे प्रत्येकी 14 दिवसांची असते. रात्रच्या काळात चंद्रावरील तापमान उणे हाेते. दाेन आठवड्यानंतर प्रज्ञान आणि लॅंडर यांना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी संपर्क सुरू आहे. परंतु त्याला यश आलेले नाही. हायबरनेशनमधून पुन्हा प्रज्ञान आणि लॅंडर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला देखील यश येताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर चीनच्या पहिल्या चंद्र माेहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ चिनी विश्व-रसायनशास्त्रज्ञ ओयांग झी-युआन यांनी भारताच्या चांद्रयान-3 माेहिमेवर टिपणी केली आहे. ते चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आहेत. त्यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. चांद्रयान-3 ची लॅडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ नव्हती, असे विधान केले आहे. ओयांग झी-युआन यांचा हा युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.
ओयांग झी-युआन यांचे दावे फेटाळण्यासारखे
पृथ्वीवर, दक्षिण ध्रुवाला 66.5 ते 90 अंशांच्या दरम्यान दक्षिणेकडे परिभाषित केले आहे. कारण त्याच परिभ्रमण अक्ष सूर्याच्या साक्षेप सुमारे 23.5 अंशांनी झुकलेला असताे. चंद्राचा कल केवळ 1.5 अंश आहे. त्यामुळे ध्रुवीय प्रदेश खूपच लहान आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव 80 ते 90 अंश असल्याचा दावा नासाने पूर्वी केला आहे. तसा ताे अंदाज आहे. ताे 88.5 ते 90 अंशांवर आणखी लहान आहे, जे 1.5 अंशाचा झुकाव प्रतिबिंबित करताे. या तर्काच्या आधारे ओयांग झी-युआन यांनी वरील विधान केले आहे. मात्र हाॅंगकाॅंग विद्यापीठाच्या अंतराळ संशाेधन प्रयाेगशाळेतील शास्त्रज्ञ क्वेंटिन पार्कर यांनी ओयांग झी-युआन हे दावे निराधार असून, ते फेटाळले आहे. चांद्रयान-3 माेहिमेतील काेणतेही यश भारताकडून हिरावून घेतले जाऊ शकत नाही, असेही क्वेंटिन पार्कर यांनी म्हटले आहे.