महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे विविध प्रलंबित मागण्या व न्याय हक्काच्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठींबा देत अहमदनगरमधील सारडा महाविद्यालयामधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयात एक दिवसाचा संप पुकारून धरणे आंदोलन केले. शिक्षकेतर संघटनेचा विजय असो…, आमच्या मागण्या मान्य करा…, अशा घोषणा देण्यात आल्या.
सरकारने जर त्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीतर २० फेब्रुवारीपासून सर्व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत १० वी व १२ वी बोर्डाच्या परिक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष विजय शिनगारे,भारती वायळ, अमोल मदने, सुनील नेटके, अतुल सामल, शिवाजी भडके, दिलीप सत्रे, कृष्णा केदारे, गोरक्षनाथ देवतरसे, आसाराम नायकु, दिनकर सुरवसे, बाळासाहेब बनकर, लक्ष्मीकांत राहिंज, वसंत शिंदे, ईश्वर भिंगारदिवे, बाजीराव माळी, जनार्दन मदने, बाबासाहेब दरंदले, शबाना शेख, कार्तिक चौहान, भाग्यश्री कुलकर्णी, चेतन सुर्यवंशी, ओकांर वाघमारे व अभिषेक देशपांडे आदी उपस्थित होते.