भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विराेधात बातम्या छापून न येण्यासाठी अहमदनगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेला सल्ला चांगलाच चर्चेत आला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे रविवारी भाजपच्या महाविजय 2024 अभियानाच्या प्रारंभासाठी अहमदनगरमध्ये हाेते. अहमदनगर दक्षिण कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. लाेकसभा 2024 जिंकण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक पातळीवर तयारी करण्याच्या सूचना दिल्या. लाेकसभा निवडणुका हाेईपर्यंत पत्रकारांना विराेधात काही छापू देऊ नका. वेळप्रसंगी त्यांना चहा पाजा, धाब्यावर घेऊन बसा, असा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला सल्ला जास्तच चर्चेत आला आहे.
भाजपने आगामी लाेकसभा जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लाेकसभेच्या जागा जिंकण्यासाठी महाविजय 2024 अभियान सुरू करण्यात आले. या अभियानातंर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे अहमदनगरमध्ये हाेते. यावेळी त्यांनी बूथरचना, वाॅरियर, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला. अहमदनगर दक्षिण कार्यकारिणीतील वादाची देखील दखल घेतली. यावेळी त्यांनी लाेकसभा 2024 जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नेते आणि पदाधिकारी यांनी काही सल्ले दिले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “लाेकसभा 2024 हाेईपर्यंत आपल्याविराेधात एकही बातमी छापू नये, यासाठी खबरदारी घ्या. पत्रकारांना चहा पाजा. त्यांना चहा प्यायला बाेलवायचे म्हणजे समजेल. तसेत त्यांना धाब्यावर देखील घेऊन जात जा. केंद्रप्रमुखाची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. केंद्रामध्ये कुणी पत्रकार, चॅनलवाले किंवा पाेर्टलवाले असतील, ते काेण आहेत, ते आपल्याबराेबर किती जण आहेत, हे अगाेदर पाहाठ. पाेर्टलवाले टिल्लू असे काही टाकतात की, जणू काही बाॅम्बच पडला आहे. पत्रकारांची यादी तयार करा. त्यांना महिन्यातून एकदा चहाला घेऊन जा. काही जास्तच असेल, तर त्यांना धाब्यावर घेऊन जा. काही कमी जास्त असेल, तर सुजय विखे आहेतच. सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, असेही बावनकुळे यांनी म्हटले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सल्ल्याचे पडसाद राज्यात उमटण्यास सुरूवात झाली आहे. विराेधकांनी बावनकुळे यांच्या या सल्ल्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अहमदनगरच्या भाजप पदाधिकारी यांनी मात्र यावर माैन बाळगले आहे. त्यांनी वरिष्ठांकडे बाेट दाखविण्यास सुरूवात केली आहे.