अहमदनगर एमआयडीसीमधील किर्लोस्कर फेअरर्स संचलित आयएसएमटी कंपनीमध्ये अहमदनगर जिल्हा मजदूर सेनेवतीने कायम सेवेतील कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक करार झाला. किर्लोस्कर फेअरर्स संचलित आयएसएमटी कंपनीने कायम सेवेत कामगारांचा ऐतिहासिक करार झालाय. यामध्ये कामगारांना 11 हजार 1 रुपयाची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्याला 51 हजार रुपयाची भेट दिली जाणार आहे. तसेच मूळ पगारात 45 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकाने मान्य केले. अधिकमास मध्ये झालेल्या या कराराचे आणि पगारवाढीचे कामगारांनी स्वागत केले आहे.
या कराराचे आणि पगारवाढीचे अहमदनगर जिल्हा मजदूर सेनेने स्वागत केले आहे. आजपर्यंत कामगारांनी काढलेल्या त्रासाला किर्लोस्कर फेअरर्स कंपनीने मदतीचा हात दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांनी म्हटले आहे.
संघटनेचे सचिव वसंत सिंग, कामगार प्रतिनिधी राजेंद्र वाकळे, कचरू ढगे, राजेंद्र पाटील, जलील शेख, संजय शिरसाठ, किरण धाडगे, कंपनीचे एमडी निशिकांत एकतारे, एचआर हेड जाकीर शेख, कंपनी प्लँट हेड चैतन्य शिंदे, संजय देशपांडे, बाळासाहेब पानमंद, रोहित धाडगे आदी उपस्थित होते.
चैतन्य शिंदे यांनी किर्लोस्कर फेअरर्सने नेहमीच कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कंपनीत हा ऐतिहासिक करार झाला, कंपनीला आता उज्वल भविष्यकाळ असून कामगारांनी देखील कंपनीच्या प्रगतीसाठी काम करावे, असे आवाहन केले. वसंत सिंग यांनी कंपनीने कामगारांच्या हिताचा सन 2023 ते 2026 हा त्रिवार्षिक करार झालाय. कामगार कंपनीच्या सेवेत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास कंपनीतर्फे मूल्यलाभ स्वरुपात 6 लाख किंवा प्रचलित पद्धतीने देण्याचे मान्य केले. तसेच कामगारांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन, वाचनालयाची निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कराराचे वाचन राजेंद्र वाकळे यांनी केले.