आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रम अंतर्गत बेल्जियम येथून अहमदनगर शहरात आलेली युवती डेजोंकचीरे मार्थे हिने ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेट देऊन येथील संस्कृती समजून घेतली. आंतरराष्ट्रीय लायन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात 17 युवक-युवती महराष्ट्रात आल्या आहेत. त्यापैकी बेल्जियमच्या डेजाेंकचीरे मार्थे ही सामाजिक कार्यकर्ते तथा लायन्सचे हरजितसिंह वधवा यांच्या घरी पाहुणचार घेतला. दोन आठवड्यात मार्थे हिने अहमदनगर शहरातील विविध भागात भेटी दिल्या.
चांदबीबी महाल, फराह बाग व भुईकोट किल्ला या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन डेजाेंकचीरे मार्थे भारावली. आनंद धाम, गुरुद्वारा भाईदयासिंह, ग्रामदैवत श्री विशाल गणपती, अवतार मेहेरबाबा समाधी या धार्मिक स्थळांना भेट देऊन धार्मिक संस्कृतीची माहिती घेतली. स्नेहालय, घर घर लंगर सेवा, अन्नसेवा आदी उपक्रमांना भेटी देऊन सामाजिक कार्याची तर एमआयडीसी येथील एल ॲण्ड टी कंपनीला भेट देऊन औद्योगिक क्षेत्राची देखील माहिती घेतली.

स्नेहालयाच्या मुलांसोबत डेजाेंकचीरे मार्थे हिने संवाद साधला, तर स्नेहालयाच्या सामाजिक कार्यास भारावून डेजाेंकचीरे मार्थे यांच्या वडिलांनी स्नेहालयाला 1 हजार डॉलरची मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पाठवली. हरमन कौर वधवा, सिमरन कौर वधवा, गुरनूरसिंह वधवा, हरतीतसिंह वधवा यांनी डेजाेंकचीरे मार्थे हिला मुंबईहून शहरात आणले. येताना आळंदी संत ज्ञानेश्वरांची समाधी स्थळ व शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. शिर्डी इथं उपअधीक्षक संदीप मिटके यांनी त्यांचे स्वागत केले. साईबाबाची मूर्ती देऊन सत्कार केला. गिरीश मालपाणी यांनी

डेजाेंकचीरे मार्थे व लिओ सदस्यांचा साई तीर्थाचे दर्शन घडवून त्यांचा सत्कार केला. श्रीरामपूर, कमालपुर येथील गुरुद्वारा, टाकळीभान येथील ऐतिहासिक मंदिरचे त्यांनी दर्शन घेतले. औरंगाबाद इथल्या एलोरा गुफा, दौलताबाद येथील किल्ला, बीबी का मकबरा, पवन चक्की या स्थळांना भेट दिली. औरंगाबाद येथे लायन्सच्या माध्यमातून कार्यरत डोळ्यांच्या दवाखान्यात राहुल औसेकर व जयश्री औसेकर यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर
डेजाेंकचीरे मार्थे यांनी राष्ट्रपती भवन, दिली दर्शन, आग्रा, मुंबई येथील स्थळांना भेटी दिल्या. तसेच अलिबाग येथे परदेशातून आलेले 17 युवक-युवती भारत देशातील संस्कृतीतून काय शिकले व समजले त्याचे सादरीकरण करणार आहे. तर 13 ऑगस्टला भारतातील आठवण घेऊन आपल्या मायदेशी ती परतणार आहे.
या सर्व कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे, आनंद बोरा, लिओ आंचल कंत्रोड, सनी वधवा, गगन वधवा, लिओ धारवी पटेल, अरमान खंडेलवाल, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, डॉ. संजय असनानी, नितीन मुनोत, हरीश हरवाणी, प्रिया मुनोत, सहेजकौर वधवा, जस्मीतसिंह वधवा, देवेंद्रसिंह वधवा, मनीषा कौर वधवा, आरजा कौर वधवा, नंदिनी तलरेजा, रिधिमा गुंदेचा, शीतल गांधी यांनी तिचे आदरतिथ्य केले.
डेजाेंकचीरे मार्थे यांनी नऊ वारी साडी नेसवून महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती घेतली. या भेटी दरम्यान तिने कारगिल विजय दिवस, मुलींना सायकल वाटप, घर घर लंगर सेवा अंतर्गत अन्नसेवा कार्यात सहभाग घेतला.