नगर : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्माचे झी-न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बिंग फुटले आहे. स्टिंग आॅपरेशनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये, चेतन शर्मा संघातील निवड समस्या, विराट-सौरव वाद, विराट-रोहितमधील मतभेद आणि खेळाडूंमधील बनावट इंजेक्शन या विषयांवर दावे करताना दिसत आहे. यातन सनसनाटी पसरली आहे. चेतन जे बाेलत हाेता, ते एका छुप्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा हे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माशी अर्धा तास फोनवर बोलताना दिसताे. यावेळी चेतन शर्मा म्हणतो, ‘रोहित माझ्या मुलासारखा आहे. निवडकर्त्यांची भूमिका मोठी आहे. खेळाडू निवडकर्त्यांच्या संपर्कात राहतात. कोणता निवडकर्ता बसला आहे, यावर अवलंबून आहे. माझे पोट खूप मजबूत आहे, जो कोणी माझा जोडीदार किंवा रोहित माझ्याशी बोलेल तो या खोलीच्या बाहेर जाणार नाही’.
टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल चेतन शर्मा सांगतो की, ‘तो घरी भेटायला येतो. चेतनच्या मते, ‘हार्दिक हे भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. खूप छान आहे. अतिशय नम्र, खूप चांगला क्रिकेटर. सध्याचे काही क्रिकेटपटू मला भेटायला येतात. जसा हार्दिक आला होता. तो इथेच पडून होता. दीपक हुडा नुकताच आला होता. उमेश यादव काही दिवसांपूर्वी भेटायला गेले होते’. खेळाडूंना अध्यक्षांशी बोलावे लागते. हार्दिक त्यादिवशी दिल्लीत उतरला, मला फोन केला, सर तुम्ही कुठे आहात, असे विचारले. मी म्हणालो मी घरी आहे, म्हणून तो रात्री आला. कारण माझ्या घरात जे होऊ शकते ते कुठेही होऊ शकत नाही, असेही चेतन शर्मा स्टिंग आॅपरेशनमध्ये बाेलताना दिसताे.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक