Bank : बॅंकांमधील मनुष्यबळ कमी झाले आहे. पदभरती हाेत नाही. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळामुळे बॅंकिंगच्या कामकाजावर परिणाम हाेत आहे. या पार्श्वभूमीवर बॅंक कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपासले आहे.
बॅंकिंग ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे बॅंक कर्मचाऱ्यांना ग्राहकांना सेवा देताना ताण येत आहे. असे असताना बॅंकिंगमध्ये भरती हाेत नाही. यातच अनेक सरकारी याेजना बॅंकेमार्फत चालवल्या जात आहेत. बॅंकमध्ये पुरेशी भरती करावी, या प्रमुख मागणीसाठी बॅंक कर्मचारी संघटना संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने संपांचे हत्यार उपसले आहे. याचा परिणाम म्हणजे, एकूण 13 दिवस देशातील बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया बॅक एम्प्लाॅईज युनियनने 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. हा संप 20 जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत हाेणार आहे. 4 डिसेंबरला स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, सिंध बॅंकेचे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. तसेच बॅंक ऑफ बडाेदा आणि बॅंक ऑफ इंडियाचे कर्मचारी 5 डिसेंबरला, तर कॅनरा बॅंक आणि युकाे बॅंकेचे कर्मचारी 6 डिसेंबरला, इंडियन बॅंक आणि युकाे बॅंकेचे कर्मचारी सात डिसेंबरला, तर 8 डिसेंबरला युनियन बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहे. याचबराेबर 11 डिसेंबरला खासगी बॅंकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.
बॅंक कर्मचारी युनियने नवीन वर्षात संपाचे हत्यार उपासले आहे. कर्मचारी संपावर जाणार असल्याने त्याचा परिणाम बॅंकांच्या कामकाजावर हाेणार आहे. त्याअंतर्गत 3 जानेवारी 2024 राेजी सर्व बॅंक कर्मचारी पश्चिम भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गाेवा, दादर, दीव, दमण या राज्यांमध्ये संपावर जाणार आहेत.