मराठी चित्रपटातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची प्रेक्षकांनी डाेक्यावर घेतले आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शक केलेल्या या चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा प्रत्येक शाे हाऊसफुल सुरू आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर यासह राज्यातील प्रत्येक शहरात हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
अहमदनगरमध्ये या चित्रपटाचा खेळ पहाटे सहा वाजता लावला आहे. या खेळाला देखील प्रतिसाद मिळत असल्याचे थीएटर चालकांचे म्हणणे आहे. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर अनेक रेकाॅर्डही ब्रेक करण्यास सुरूवात केली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या शेवटला 6.54 काेटी रुपयांची कामाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला हा मराठी सिनेमा ठरला आहे.
यानंतर या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस 12.50 काेटी रुपयांची कमाई केली. आता या चित्रपटाने गेल्या रविवारी विक्रमी कमाई केली. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी 6.60 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात इतकी कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
या अगाेदर रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने 5.70 कोटी रुपयांची कमाई एका दिवसात केली होती. त्यापूर्वी हा रेकॉर्ड ‘सैराट’च्या नावावर होता. तर या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण 26.19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.