- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar News ः अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यांची कमतरता विचारात घेऊन जलसंपदा विभागाने पाणी पुरवठ्यामध्ये 20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पाणी कपातीच्या निर्णयाचा अहमदनगर शहर पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असून, नागरिकांनी या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पेयजल काटकसरीने वापर करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरिभूमी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या भित्तीपत्रकाचे (पोस्टर) प्रकाशन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी जलसंकटावर भाष्य केले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, श्रीकांत पवार, लक्ष्मीकांत साताळकर, आस्थापना…
Ahmednagar News ः अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झालेले जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. जनरल सेक्रेटरी आनंद वायकर, माजी अध्यक्ष अनंत लोखंडे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, महादेव कोतकर, उपाध्यक्ष प्रकाश साठे, आयुब शेख, विजय कोतकर, सूर्यभान देवघडे, अंतवन क्षेत्रे, आकील सय्यद,सागर साळुंखे, अमोल लहारे, बाळासाहेब व्यापारी, अजित तारू, सखाराम पवार, बाबासाहेब राशिनकर, राजेंद्र वाघमारे, बैजू साठे, प्रफुल्ल लोंढे, अजय सौदे उपस्थित होते. सर्वांना सोबत घेवून महापालिका कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावू, असे मनोगत अहमदनगर महापालिका कामगार युनियनचे नवीन प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केले.…
Ahmednagar News ः ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या टोयोटा किर्लोस्कर कंपनीने सर्वांना परवडेल, अशा किंमतीत लॉन्च केलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरची केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये बुकिंग सुरू करण्यात आली आहे. एसयुव्ही श्रेणीतील या कारकडे ग्राहकांचा कल असून, चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जनक आहुजा यांनी दिली. टोयोटा किर्लोस्कर कंपनी ग्राहकांच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील असते. एसयुव्ही श्रेणीतील ग्राहकांचा कल ओळखून कंपनीने 3 नुकतेच ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर लॉन्च केली आहे. जी भारतातील त्याच्या मजबूत आणि संपूर्ण श्रेणीतील विविध गुणवैशिष्टये असलेल्या एसयुव्ही लाईनअप…
Lok Sabha Election 2024 ः अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या 48 तास आधीपासून म्हणजे 11 ते 13 मे रोजी या कालावधीत व मतमोजणी चार जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर क्षेत्रासाठी कोरडा दिवस अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 142च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला…
Ahmednagar Political ः अहमदनगर शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावली जात आहे. यामध्ये युवकांना देखील बरोबर घेतले जाते. यामुळेच सर्वांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते. आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असून त्यासाठी सर्वांनी आपली परंपरा व संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. युवकांना योग्य दिशा दिल्यास सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. त्यातून युवकांच्या हातून समाजाचे चांगले काम उभे राहील. आज युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे. उद्योजक शरद दातरंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला असून त्यांनी पक्षाचे ध्येय धोरणे व केलेली विकास कामांचा लेखाजोखा समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.…
Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना घरच्या मंडळींना मतदानासाठी आग्रह धरण्याचा व त्यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आई-बाबा, आजी-आजोबा व कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी आग्रह करणार असल्याचा संकल्प केला. ‘जन जन की पुकार आहे, मतदान आमचा अधिकार…’, ‘घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरुक बनवू..’, अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ उपस्थित होत्या. अनिता काळे म्हणाल्या, “शंभर टक्के मतदान झाल्यास योग्य उमेदवार निवडून येणार आहे. नागरिकांचा मतदान प्रक्रियेत पूर्णत: सहभाग वाढल्यास लोकशाही बळकट होणार आहे”.…
Ahmednagar Political ः “पाच वर्षात आम्ही केलेल्या विकास कामांच्या अजेंड्यावर ही लोकसभा निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे आमच्या पुढे समोरच्या उमेदवाराची कामे काहीच नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ देण्याचे नाटक करून त्यांच्याकडून करोडो रुपयांचा निधी मिळवत त्यांना फसवत त्यांची साथ सोडली. उद्या ते जनतेचीही साथ सोडतील यात शंका नाही. नगर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले एक तरी मोठे काम दाखवावे मगच, एमआयडीसी आणण्याच्या गप्पा माराव्यात. राज्यात अडीच वर्ष शरद पवारांचे रिमोट कंट्रोल असेलेले महाविकास आघाडीचेच सरकार होते. त्यावेळी का नाही एखादी एमआयडीसी करून दाखवली?, असा प्रश्न मी शरद पवारांना करत आहे. याउलट जे जाणता राज्यास जमले नाही, ते मी पालकमंत्री आणि…
Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने अहमदनगर शहरामध्ये छापा घालून 73 लाख 24 हजार 500 रुपयांची रक्कम जप्त केली होती. यापैकी 69 लाख 44 हजार 500 रुपये एवढ्या रक्कमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. उर्वरित तीन लाख 80 हजार रुपयांची रक्कम योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने बोल्हेगाव येथील कृष्णा विजय भगत यांना सुपूर्द करण्यात आली. मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी ही माहिती दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय…
Ahmednagar Police ः लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू आहे. पोलिसांनी अवैध धंदे, विघातक कृतींबरोबर समाजकंटकांवर कारवाईची मोहिम उघडली आहे. वाहनांची तपासणी होत आहे. नाकाबंदी सुरू आहे. यातच जामखेड पोलिसांनी पुणे-जामखेड बसमध्ये बाॅम्ब असल्याचा फोन आल्याने चांगलीच धावपळ उडाली. पुणे स्वारगेट-कर्जत-जामखेड ही जामखेड आगाराची बस जामखेडच्या दिशेने कर्जतहून दुपारी रवाना झाली होती. एका युवकाने बसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल जामखेड आगारास केला. या फोनमुळे आगारामधील अधिकारी यांची त्रेधा उडाली. आगार चालकाने ही माहिती बसचालक आणि वाहकास मोबाईलवर दिली. बसचालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेले. चालक उत्तम क्षीरसागर आणि वाहक विनायक गोरे…
Lok Sabha Elections ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. नगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नगर जिल्ह्यातील हाॅटेलमधून विनापरवाना बेकायदा दारू विक्रीविरोधात 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान मोहिम राबवली. या मोहिमेदरम्यान बेकायदेशीर दारू विक्रीत 95 गुन्हे नोंदवित 100 जणांना अटक करण्यात आली. कारवाईत 11 लाख 37 हजार 961 रुपयांचा देशी, विदेशी, गावठी दारू आणि चारचाकी गाडी, अस मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचो पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. नगर शहरातील तोफखाना एक, पारनेर तालुका आणि श्रीरामपूर शहर प्रत्येकी सहा, पाथर्डी आठ, राहुरी, सोनई आणि नेवासा प्रत्येकी चार, शेवगावमध्ये 13, घारगांव…