- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar Political ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली. शहरात झालेल्या निर्धार बैठकीत संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जया गायकवाड यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर मंगेश मोकळ यांची भिंगार शहराध्यक्षपदी, आकाश बडेकर यांची नगर युवक तालुकाध्यक्षपदी, निशा जाधव यांची युवती जिल्हाध्यक्षपदी व नगर तालुका युवती अध्यक्षपदी वैशाली पाखरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, दिपकराव गायकवाड, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, रिपाई नेते अजय साळवे, जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, गौतम घोडके, विलास साठे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे,…
Ahmednagar Political ः कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या एमआयडीसी नको, खोटे आयटी पार्क नको, खोटी आश्वासन नको. शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारी, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत. देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे. हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जावून संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार करणार असल्याचे प्रतिपादन आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केले. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारा आम आदमी पार्टी पक्ष देखील आता नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार लंके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे. लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनाची आप पक्षाची बैठक पक्षाच्या सावेडीतील कार्यालयात पार पडली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य…
Ahmednagar News ः मुळा धरणात सध्या 7 हजार 608 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शुक्रवारी 700 क्यूसेक वेगाने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सुमारे 30 ते 35 दिवस चालणार आहे. यासाठी तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणे अपेक्षित आहे. जायकवाडीला पाणी सोडल्याने शेतीसाठीचे एक आवर्तन कमी झाले आहे. पुढील काळामध्ये उद्योग धंदा व पिण्यासाठीच पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमारे सन 2017-18 वर्षानंतर पहिल्यांदाच मुळा धरणावर पाणी टंचाईचे संकट ओढावल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील, धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे व उपअभियंता विलास पाटील यांनी प्रभातला दिली. दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी…
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये गाजलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात नगर न्यायालयाने सर्व संचालक मंडळांना दोषी धरले आहे. तत्कालीन संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह 17 संचालक मंडळाला न्यायालय आठ एप्रिलला शिक्षेची सुनावणी करणार आहे. यानंतर नगर पोलिसांनी ज्ञानदेव वाफारे याच्यासह सह संचालक मंडळाला ताब्यात घेतले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे आठ एप्रिलला संपदा गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिक्षा सुनावणार आहेत. ज्ञानदेव सबाजी वाफारे, सुजाता ज्ञानदेव वाफारे, सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णुपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, रवींद्र विठ्ठलराव शिंदे,…
Ahmednagar News ः गुढीपाडव्यानिमित्त केडगावच्या शाहूनगर रोडवरील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवारपासून (ता. 7) कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपली संस्कृती जोपासण्यासाठी अमोल येवले यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातून केडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दरवर्षी चांगली पर्वणी मिळत आहे. 7 ते 11 एप्रिलपर्यंत हा कीर्तन महोत्सव चालणार आहे. कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवाचे दैनंदिन नियोजन पुढीलप्रमाणे रविवार 7 एप्रिल किशोर महाराज दिवटे (घनसावंगी, जालना) सोमवार 8 एप्रिल…
Ahmednagar Political ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्यावतीने नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दोन्ही मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी केली होती. प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी, सुदीप गायकवाड, झोन प्रभारी काळुराम चौधारी व आप्पासाहेब लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या मुलाखतीप्रसंगी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, महिला जिल्हाध्यक्ष अनुरीता झगडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, शहानवाज शेख, जिल्हा कोषाध्यक्ष सूर्यभान गोरे, जिल्हा सचिव सुभाष साबळे, उत्तर भारतीय संयोजक त्रिपाठी, सोनवणे, शिर्डी लोकसभा अध्यक्ष बाळासाहेब भोसल, विधानसभेचे प्रभारी महादेव त्रिभुवन, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काटे, महिला शहराध्यक्ष अंजुम सय्यद, नगर शहराध्यक्ष…
Ahmednagar News ः “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको. आंबेडकर जयंती मिरवणुकीत इतर झेंडे आणि इतर घोषणा दिल्यामुळे जातीय ताणतणाव निर्माण झाला होता. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे या मिरवणुकीत निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको”, अशा सूचना माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केल्या. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची बैठक दादासाहेब रुपवते विद्यालय येथे झाली. अजय साळवे म्हणाले, “मिरवणुकीत जास्तीत जास्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे वाजवावेत. मिरवणुकीत निळ लावावी पण निळ उधळू नये. तसेच प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आभिवादन करूनच मिरवणुकीत सहभाग…
Ahmednagar Political ः नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडी लवकरच स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. नगर जिल्ह्यात आणि शिर्डी मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरवले आहे. सध्याला दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गलांडे, राज्य समन्वयक अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष नगर दक्षिण प्रतीक बारसे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्री शेंडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षा बाचकर, जिल्हा अध्यक्ष…
Ahmednagar News ः अहमदनगरमधील हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मतदार जागृती अभियान राबवून लोकशाहीचा जागर करण्यात आला. नाईट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन लोकशाही सक्षम करण्याचा संकल्प केला. जागर लोकशाहीचा या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे, गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, उज्वला साठे, वैशाली दुराफे, वृषाली साताळकर, शिवप्रसाद शिंदे, संदेश पिपाडा, शरद पवार, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, नाना…
Ahmednagar Political ः लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू आहे. यामुळे राज्यात कोण कोणाच्या आघाडीत आणि युतीत हेच कळायला मार्ग नाही. सोयीचे राजकारण हाच अजेंडा दिसतो आहे. यातून राज्यात विकासाचा मुद्दा हा बाजुला राहिलेला दिसतो. आघाडी आणि युतीच्या खेळात पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सैरभैर झाले आहे. आश्वासक चेहरा दिसत नाही. जनतेला पर्याय हवा आहे. यातून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाने अहमदनगरसह राज्यातील काही लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. एमआयएम पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज…