Author: Kharee Gosht

Ahmednagar entertainment ः “आम्ही रसिकांसाठीच काम करतो असतो. गुढीपाडव्याचा हा भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन ज्यांच्या नावात रसिक शब्द आहे अशा रसिक ग्रुपनेच आयोजित केल्याचा वेगळा अनंद येथे वाटत आहे. नगरकरांनी कायमच माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे आजच्या मराठी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला नगरकरांचे मुखदर्शन झाल्याने येणारे पूर्ण वर्ष माझे सुखात जाणार आहे. रसिक ग्रुपने रसिककला गौरव पुरस्कार देवून मला सन्मानित केल्याबद्दल आभार”, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी नगरमध्ये केले. गुढीपाडव्यानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आयोजित ‘रसिकोत्सव’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाणरे सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी धमाल…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगरमधील संपदा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेला ज्ञानदेव सबाजी वाफारे (वय 49, रा. कान्हूरपठार) याच्यासह त्याची पत्नी सुजाता ज्ञानदेव वाफारे (रा. कान्हूर पठार) या दोघा प्रमुख आरोपींसह व्यवस्थापक रवींद्र विश्वनाथ शिंदे (वय 37, रा.सावेडी), सोने तारण विभागाचा शाखा व्यवस्थापक साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर (वय 36, रा. कान्हूर पठार) व कर्जदार संजय चंपालाल बोरा (वय 36, रा. यशवंत कॉलनी, नगर) या पाचजणांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी निकाल दिला. अन्य 12 आरोपींना विविध कलमान्वये तीन ते 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणातील फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट…

Read More

Ahmednagar News ः जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात उपलब्ध करुन देण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर व्हिजीओ क्राफ्ट या दालनाचा शुभारंभ उद्योजक पेमराज बोथरा यांच्या हस्ते झाला. या दालनाच्या माध्यमातून नेत्र रुग्णांना अल्पदरात उच्च दर्जाचे चष्मे व गॉगल्स मिळणार असून, हे दालन ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. तर यातून मिळणारे उत्पन्न देखील हॉस्पिटल मधील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहे. नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्योजक संतोष बोथरा, कुंदन कांकरिया, मानकचंद कटारिया, सतीश लोढा, प्रकाश छल्लाणी, प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, डॉ. संदीप…

Read More

Ahmednagar Police ः महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या श्रीरामपूरमधील दोन महिलांना राहुरी पोलिसांनी सापळा लावून पकडले. पूजा आकाश रोकडे आणि संगीता जीवन लोंढे (दोघे रा. श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली. महिला तिच्या आईला सोडण्यासाठी कोल्हारवरून बीडकडे जात असलेल्या बसमध्ये अनोळखी तीन महिलांनी फिर्यादी महिलेस धक्काबुक्की केली. यात तिच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली. राहुरी पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला. महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन् दाखल झाला. राहुरी पोलीस या चोरीतील आरोपींचा शोध घेत होते. राहुरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि गोपनीय माहितीनुसार महिला आरोपी पूजा आकाश रोकडे आणि संगीता जीवन लोंढे (दोघे…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही विहीर गाळाने भरलेली होती. गाय-म्हशीचे शेण, पाचट या विहिरीत टाकत असल्याने त्यातून तयार झालेल्या वायूमुळे गुदमरून या पाच जणांचा मृत्यू झाला. गुढीपाडव्याच्या दिवशी ही घटना घडल्याने नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विशाल अनिल काळे ऊर्फ बबलू (वय २३), त्याचे वडील अनिल बापूराव काळे (वय ५८), त्यांच्याकडील सालगडी बाबासाहेब पवार (वय ३५), अनिल यांचे चुलत बंधू संदीप माणिक काळे (वय ३६) आणि संदीपचे वडील माणिक काळे (वय ६५) यांचा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विजय माणिक काळे हा देखील विहिरीत यांना वाचवण्यासाठी उतरला होता. परंतु वायूमुळे…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक उड्डाणपुलाच्या पिलरचा काहीसा भाग कोसळल्यामुळे खालून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची काच फुटून मोठे नुकसान झाले. उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती कळताच अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्घटनाग्रस्त गाडी चालकाला मदत केली. उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्या खासदार, आमदारांनी या निकृष्ट कामाचे देखील आता श्रेय घ्यावे, अशी घणाघाती टीका यावेळी फेसबुक लाईक करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. काळे यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण नंदनवन लॉन्स या ठिकाणी झाले. अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ” मै भारत हूँ ” असे 15 सेल्फी पॉईंट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते. सिद्धाराम सालीमठ (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी)यांनी या प्रदर्शनास भेट दिली असता त्यांना देखील सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.प्रदर्शनाचे कौतुक करत विविध सेल्फी पॉइंटवर त्यांनी स्वतः फोटो घेत माहिती देखील घेतली.यावर असलेले क्यूआर कोड स्वतःच्या मोबाईल मध्ये स्कॅन करून अनुभव देखील घेतला. अहमदनगर जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून…

Read More

Ahmednagar Political ः पारनेर तालुक्यातील अनेक कंपन्यांचे प्रमुख निलेश लंके व त्यांच्या समर्थक गुंडांमुळे त्रस्त असून, पोलिस संरक्षण मिळाले नाही व पाठीशी कोणी उभे राहिले नाही तर आमचे उद्योग बाहेर न्यावे लागतील, असे खासगीत सांगत असल्याचा दावा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सोमवारी येथे केला. दरम्यान, महायुती उमेदवार डॉ. सुजय विखे यांना गोळ्या घालण्याचे भाष्य असणार्‍या वादग्रस्त क्लिपमागील सूत्रधार व कर्ता करविता शोधून त्याच्यावर कारवाईची मागणीही कर्डिलेंनी केली. पारनेर पंचायत समितीचे माजी सदस्य निवृत्ती घाडगे यांच्या आवाजातील वादग्रस्त ऑडियो क्लिप रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी संबंधित क्लिप आपली नाही…

Read More

Ahmednagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाच्या तयारीने वेग घेतला असून अहमदनगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी, अशा तब्बल 1 हजार 344 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणांना 71 कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. या सर्व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींत्व अधिनियम 1951 अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. या प्रशिक्षण सत्रावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील, उप विभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अहमदनगर शहरातील नंदनवन लॉन्स व भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय येथे दोन सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम…

Read More

Ahmednagar Newsः अहमदनगर साईबन व मंगळागौर महिला उत्सव समूहाच्यावतीने नृत्यांगणा मानसी देठे यांना नुकतेच ‘उत्कृष्ट संघटक व उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक’ मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नोबेल पिस अ‍ॅवॉर्ड नामांकित डॉ.सौ.सुधा कांकरिया, मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, डॉ.धनश्री खरवंडीकर, अभिनेते मोहिनीराज गटणे, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, डॉ.प्रकाश कांकरिया आदि उपस्थित होते. मानसी देठे या भरतनाट्यम विशारद आहेत. त्याचबरोबर अनेक मुलींना त्या भरतनाट्यम सह विविध नृत्य कला शिकवत आहेत. तसेच विविध सण-उत्सवातील पारंपारिक नृत्य प्रकार शिकविण्याबरोबरच त्यांचा कलाविष्कार सादर करत असतात. मंगळगौर महिला उत्सव टिमच्या माध्यमातून पारंपारिक नृत्यांना प्रोत्साहन देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विविध कार्यक्रमातून कलकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत कलेला प्रोत्साहन देत…

Read More