Author: Kharee Gosht

BSP News ः बहुजन समाज पक्षाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. बसपाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, विधानसभा प्रभारी गणेश बागल, शहराध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, रवी बाबा, महिला शहराध्यक्षा मनीष जाधव, किरण सोनवणे, जालिंदर कातोरे, तन्मय मोरे, बाळासाहेब मधे, अजित यादव, बाळासाहेब काटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनुरिता झगडे म्हणाल्या, “महापुरुषांची जयंती डिजेवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आहे”. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या तेजाने समाजाला प्रकाशमान केले. त्यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन गेल्यास समाजाचे…

Read More

Bhingar News ः भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनिल काळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार, राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, अनिल तेजी, अशोक भिंगारदिवे, दिनेश कांबळे, प्रकाश गोहेर, दास निधाने, दीपक भिदोरिया, राहुल विघावे, विक्रम चव्हाण आदी उपस्थित होते. अमित काळे म्हणाले, “दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ.…

Read More

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बीएसएनएल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी बुध्द वंदना घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक विश्‍वनाथ वाघ व सेवा असोसिएशनचे मुख्य सल्लागार प्रदीपकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक प्रबंधक चौरे, पिंपरकर, झोळे, गजेंद्र पिसे, विजय शिपनकर, गणेश जोशी, मिनल गुणे, समीर मल्लेभारी, महेश पवार, कवयित्री तथा शिर्डी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा महेश पवार, शिल्पा जावळे आदींसह बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रदीपकुमार जाधव म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांना शालेय जीवनापासून बॅरिस्टर होण्यापर्यंत व संविधानाची रचना करे पर्यंत अनेक अपमान, हाल-अपेष्टा सहन…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेंद्र शांतिकुमार फिरोदियासह 13 जणांविरोधात अनुसूचित प्रतिबंध कायदा (अॅट्रोसिटी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी केलेल्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. दिनेश भगवानदास छाबरीया (रा. सावेडी, नगर), सरला छाबरीया (रा. सावेडी, नगर), शिवाजी आनंदराव फाळके (रा. देना बॅंक शेजारी, कारेगाव), आशिष रमेश पोखरणा (रा. सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजी फाळके (रा. कर्जत गावठाण, ता. कर्जत), आकाश राजकुमार गुरनानी (रा. हरदेवनगर, संतनिरकांरी भवन, नगर), माणिक आनंदराव पलांडे (रा. पिंपळे रोड, मुखाई, पुणे), अजय रमेश पोखरणा (रा. सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (रा. एमजी रोड, कापडबाजार,…

Read More

Bhingar Breaking News ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा अहमदनगर कॅटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वसंत राठोड यांचे पुत्र सुमित यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड ही जाणिवपूर्वक करण्यात आल्याचे दिसते. परंतु यामागे कोण आहे, याची उलगडा लवकरच करू, असेही भिंगार कॅम्प पोलिसांनी सांगितले. याबाबत माहिती अशी ः वसंत राठोड यांचे घर नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील राधानगरी वसाहतीत घर आहे. राठोड यांची त्यांचे वाहन घरासमोर लावले होते. पहाटे साडेचार वाजता दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी त्यांच्या वाहनाची सुरूवातीला पाहणी…

Read More

Ahmednagar News ः “तुमच्या शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे कौशल्य शिकविण्यासाठी करा. महात्मा फुलेंनी ब्रिटीश सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना प्रखरपणे विरोध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविला व त्यावेळच्या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडले. आजही शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. दिवसेंदिवस शेती करणे अडचणीचे ठरत असून यासाठी विद्यापीठातील तरुणांनी तसेच शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांनी महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेवून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन सुप्रसिध्द व्याख्याते तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य  गणेश शिंदे यांनी केले. राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या ईदगाह मैदानाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या महापालिकेच्या विद्युत खांबावर पॅलेस्टाईनचा झेंडा विनापरवाना लावल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. कोतवाली पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच झेंडा उतरवला. याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी मुजमील राजू पठाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. याबाबत माहिती अशी ः रमजान ईदमुळे कोठला इथल्या ईदगाह मैदानाची साफसफाई करण्यात आली होती. याच मैदानालगत असलेल्या एका विद्युत खांबाचा आधार घेत पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्यात आला होता. हा झेंडा कधी आणि केव्हा लावला याचा माहिती नाही. परंतु कोतवाली पोलिसांना याची भनक लागली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस कर्मचारी आणि गोपनीय विभागातील कर्मचाऱ्यांना मैदानाकडे…

Read More

Ahmednagar News ः अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील 12 हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अनुदान योजनेतून 11 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. दूध उत्पादकांना राज्य सरकारचे पाच रुपये प्रति लिटर अनुदान देऊन काहीसा दिलासा दिला असला तरी प्रत्यक्षात दुधाचे भाव वर्षभरात दहा रुपये लिटर इतके कमी झाल्यामुळे दूध उत्पादकांचे प्रत्यक्षात झालेले नुकसान फार मोठे आहे. वर्षभरात अनेक कोटींचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. राहुरी तालुक्यात दररोज चार लाख लिटर सरासरी दूध संकलन होते. प्रतिलिटर दहा रुपये कमी भाव या दराने दररोज चाळीस लाख रुपयांचा प्रतिदिन दूध उत्पादकांना फटका बसतो. दोन महिन्यात चोवीस कोटी रुपयांपेक्षाही अधिक फटका बसलेला आहे. अनुदान योजनेतून…

Read More

AHMEDNAGAR ZP ः अहमदनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 टक्के मतदानाची भूमिका बजवावी. याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आणि मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने “मिशन 13 मे – सण मतदानाचा” या नाविन्यपूर्ण सहा स्पर्धांचा समावेश असलेल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी सहभागी व्हावे आणि मतदानामध्ये देखील सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीप समितीने केले आहे. निबंध,चित्रकला, कविता,घोषवाक्य,पोस्टर,मतदान प्रबोधनात्मक व्हिडिओ (लघुपट /माहितीपट) निर्मिती; अशा स्वरूपाच्या सहा प्रकारच्या स्पर्धा एकूण चार गटात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या सर्व…

Read More

Ahmednagar News ः बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण महिला व बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक रमनलालजी लुंकड व समाजसेवक सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते झाले. मानवसेवा प्रकल्पाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुणे येथील उद्योजक रमनलालजी लुंकड यांच्या आर्थिक योगदानाने मानवसेवा प्रकल्पाची सुसज्ज इमारत उभी राहत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, सुनिता गरड, आकाश लुंकड, संजय शिंगवी, नाना भोरे, विकास सांगळे, चंद्रकांत तागड, संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ, राजेंद्र छल्लाणी, गटागट, लौकिक शिंगवी, भरत बागरेचा, अमर अग्रवाल, सुरेश मैड आदी उपस्थित होते. रमनलालजी लुंकड म्हणाले, “ज्यांना समाजाने नाकारलं, हेटाळलं…

Read More