- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar News ः शिकवणी सुटल्यावर सायकलवरुन घरी जात असलेल्या दोन बहिनींना तीन टारगट युवकांनी भर रस्त्यात अडवून त्यांची छेड काढली. तू माझ्यासोबत बोलत का नाहीस, तु एवढा भाव का खातेस, असे म्हणून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना वांबोरी परिसरात घडली. अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, रोहन दिलीप कुसमुडे, ज्ञानेश्वर मारुती मानकर (सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील दोघी बहिणी १५ एप्रिलला सकाळी नऊ वाजता शिकवणी सुटल्यावर त्यांच्या सायकलवरुन घरी चालल्या होत्या. त्यावेळी तिघा जणांनी त्या दोन बहिणींना वांबोरी परिसरात एका निर्जन ठिकाणी रस्त्यात अडविले. आरोपी अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, रोहन…
Pooja Varade and Tushar Ghadge Gaurav ः भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा व ग्रुपचे सदस्य ज्यौतिषाचार्य तुषार घाडगे यांना ज्योतिष क्षेत्रातील ज्योतिष महामेरु व ज्योतिष शिरोमनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्कमध्ये वराडे आणि घाडगे यांचा सत्कार महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार झंवर आणि उद्योजक लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सुमेश केदारे, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, दीपक धाडगे, दिलीप गुगळे, शामराव वाघस्कर, विकास…
Ahmednagar News : राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा! अशा हनुमान चालीसा पठनाने व विविध भाव-भक्ती गीतांनी शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिराच्या (ट्रस्ट) प्रांगणात हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. या धार्मिक कार्यक्रमासाठी शीख, पंजाबी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या कलाकारांनी या भजन संध्येच्या कार्यक्रमात रंग भरला होता. संपूर्ण परिसर या सोहळ्याने भक्तीमय बनला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर, या…
Lord Shriram Navami ः भारतवासीयांचे अनेक वर्षाचे राम मंदिराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असल्यामुळे समाजामध्ये आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीराम यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असून त्या माध्यमातून चांगले काम करण्याची ऊर्जा आपल्या सर्वांना मिळत असते. धार्मिक,अध्यात्मिक तेथून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते. नगर शहरामध्ये प्रभू श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाल्याने यंदा रामनवमीला विशेष महत्व प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रभू श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, विधानसभा…
ACB Ahmednagar ः नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (वय 35, मूळ रा. कोनोशी, ता. शेवगाव), त्याचे खासगी सहकारी नंदू पांडुरंग सरोदे (रा. देवसडे, ता. नेवासा) आणि पोपट सरोदे या तिघांना पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर पथकाने कारवाई करत या तिघांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी नंदू सरोदे आणि पोलीस नाईक तुकाराम खेडकर याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार याने 12 एप्रिलला नगरच्या पथकाकडे तक्रार केली. याच दिवशी पथकाने पडताळणी केली. लाचेच्या एकूण 10 हजार रुपयांच्या…
Ahmednagar News ः राहुरीतील चांदेगाव येथे १५ एप्रिलला यात्रा उत्सवात रथाची मिरवणूक झाली. यानंतर धनेश वायदंडे यांच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करीत घरातील लोकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली. हल्लेखोरांनी घरातील सामानाची तोडफोड देखील केली. धनेश वायदंडे यांच्या फिर्यादीवरून श्रीनिवास मारुती शिंदे ऊर्फ पप्पू, बंडू शिंदे, पोपट घाडगे, रोहन गोपाल शिंदे (सर्व रा. चांदेगाव, ता. राहुरी) या चौघाविरोधात अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. धनेश वायदंडे चांदेगाव येथे त्यांच्या कुटुंबासह राहतात. चांदेगाव येथील ग्रामदैवत चंद्रेश्वर महाराज यांचा सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव झाला. ग्रामदैवत चंद्रेश्वर महाराज यांचे रथाची मिरवणूक संपल्यानंतर धनेश वायदंडे यांचा चुलत भाऊ दीपक अशोक वायदंडे याचे आणि…
Review of Kharif Season 2024 ः खरीप हंगामामध्ये शेतक-यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठा होण्यासाठी कृषि विभागाने काटेकोर नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात कोठेही कृषि निविष्ठाचा काळाबाजार अथवा लिकींग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम 2024 च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शिर्डी येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, संभाजी लांगोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सुधाकर बोराळे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, कार्यकारी अभियंता, मुळापाटबंधारे विभाग सायली पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, प्रकल्प…
Dr. Ambedkar Jayanti ः “महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार हे समाज्यासाठी प्रेरित करणारे होते. त्यांच्या विचाराची आज प्रेरणा घेऊन आपलं जीवन कार्य सुरू केल्यास आजही सामाज्यात विकसित क्रांती घडून सक्षम आणि समृद्ध भारत घडू शकतो. असे झाल्यास खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जयंतीस अभिवादन होईल”, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोपरगावतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने विविध ठिकाणी स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी अभिवादन करून जयंती साजरी केली. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, “कोपरगाव शहरातील बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी सरकारकडे पाठपुरावा करून निधी…
Dr. Ambedkar Jayanti ः “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील जातींचे उच्चाटन करण्यासाठी खुप प्रयत्न केले. त्यासाठी जातीयंतांचा लढा देखील उभारला. आज भारतात सात हजारांपेक्षा जास्त जातींची नोंद आहे, अनेक धर्म आहेत तरीही आपला भारत देश एकसंघ आहे याचे सर्व श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. सर्व समावेशक आणि सर्व वैविध्यांचा सन्मान करणारी राज्यघटना ही जगातील अद्वितीय राज्यघटना आहे”, असे प्रतिपादन नाशिक येथील निवृत्त पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी केले. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.…
Lok Sabha Election 2024 ः शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदार केंद्राना भेट दिली. या मतदार केंद्रातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संगमनेर तालुक्यापासून 45 किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. 2024च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत या…