Author: Kharee Gosht

Ahmednagar Police ः धान्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख रज्जाक शेख (रा.मिल्लतनगर, श्रीरामपूर), तौफिक राजू पठाण (रा.बेलापूर) व रेहान पठाण (रा.कोल्हार) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. भरत मोहन आछडा उर्फ बंटी (रा.मोरगे वस्ती, लक्ष्मी आई रोड, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. भरत आछडा यांनी सोनवणे याच्याकडून मोटारगाडी घरगुती वापराकरीता विकत घेतली होती. ती गाड़ी तीन महिन्यांपूर्वी शाहरुख शेख याला विकली. परंतु, त्याने आजपर्यंत एक रुपयाही दिला नाही. सदर गाडीच्या पैशाच्या मागणीसाठी त्याला कॉल केला होता. त्यानंतर रविवारी (ता.21) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोरगेवस्ती येथील मोकळ्या…

Read More

Lok Sabha Election 2024 ः नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या फॉर्म भरण्यासाठीच्या रॅली आणि सभेवर तोफ डागत प्रहार केला.महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश लंके दोघांनी उमेदवारी अर्ज भरले. नगरकरांनी दोन्ही पॅटर्न पाहिले. भाजप उमेदवाराच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेला आणि रॅलीत गुंडांचे पोस्टर्स झळकले. दहशतीचा सो-धा पॅटर्न गुंड कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभागी झालेला पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनेक गुंडांची उपस्थिती होती. तर दुसऱ्या बाजूला नीलेश लंके यांनी अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केला आहे. अंध, अपंग बांधवांना सोबत घेत अर्ज दाखल केला आहे. फकीर असणाऱ्या नीलेश लंके यांचा विजय…

Read More

Ahmednagar Lok Sabha 2024 ः वाहनांचे अडथळे, रस्ते बंद करावे लागणे, रणरणते ऊन, गावोगावी हनुमान जयंतीचे सुरू असलेले कार्यक्रम यामुळे गैरसोय टाळण्यासाठी राहुल गांधींना आणले नाही व साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, असे स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे नगर दक्षिणेचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी दिले. दरम्यान, स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोपातच आम्ही शक्तीप्रदर्शन केले आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. चुकीच्या माणसाला प्रश्न महायुतीच्या सभेला अजितदादा का आले नसावेत, असा प्रश्न विचारल्यावर माजी आमदार लंके म्हणाले, हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय. ते त्यांनाच विचारले पाहिजे. दुसर्‍या पक्षाबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे बोलून अजित पवारांबद्दल बोलणे त्यांनी टाळले. महाविकास…

Read More

“Sweep Master” Award ः अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 % मतदानाची भूमिका बजवावी, त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून नगर जिल्हा स्वीप समितीवतीने स्वीप मास्टर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. व्यक्ती, संस्था , विविध कार्यालये, शाळा/महाविद्यालये यांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या निवडणुकीत 100 टक्के मतदान घडविण्याचा संकल्प केला आहे. सक्षम मतदार, दिव्यांग मतदार, वंचित महिला घटक मतदार, तृतीयपंथी मतदार, ईव्हीएम व्हीव्हीपॅट विषयक जनजागृती, 85+ मतदार जनजागृती, 2019 मध्ये कमी मतदानाची टक्केवारी असलेल्या क्षेत्रातील…

Read More

Ahmednagar News ः नगर शहरात हनुमान जयंती आज मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. नगर शहरातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या संख्येने रामभक्त हनुमानाची मंदिरे आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिर झाल्याने नुकतीच श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्मोत्सव नगर शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाली. नगर शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज सूर्योदया वेळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक व विधिवत पुजा करून हनुमान चालीसा पाठ, श्रीराम नामाचा जप व आरती करून हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बरोबर सूर्योदयाच्या वेळी उपस्थित शेकडो भाविकांनी जय श्रीराम… जय…

Read More

Pune Climate Change Conference ः “हवामान बदलासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीमध्ये मानवी हस्तक्षेप हा महत्वाचा घटक आहे. ग्रीन हाऊस गॅसेसमधून तापमान वाढत आहे. तसेच कार्बन डायऑक्साइड पीपीएम पातळीमध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे मानवी शरीरावर व जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. निसर्गचक्रात बदल होऊन अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतीमधील किड रोग साखळीवर परिणाम होत असून पूर्वीच्या कमी नुकसानकारक किडी ह्या आता अधिक नुकसानदायक झाल्या आहेत. तापमान वाढीचा मोठा परिणाम मधुमक्षिकांवर होत असून त्याचा दूरगामी परिणाम कृषि उत्पन्न व पर्यायाने मानवी जीवनावर होणार आहे. येणाऱ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करत येऊ घातलेली भितीदायक परिस्थिती नियोजनबद्ध पद्धतीने हाताळली गेली…

Read More

Vaishno Devi Darshan ः अहमदनगरच्या टाकळीमिया (ता. राहुरी) येथील रामदास जाधव आणि सतीश मोरे या दोघांनी टाकळीमिया ते वैष्णोदेवी हा पाच हजार 500 किलोमीटरचा प्रवास 13 दिवसांत पूर्ण केला. दुचाकीवरून वैष्णोदेवीचा सुखरूप केलेल्या प्रवासाचे गावासह राहुरी तालुक्यातून कौतुक होत आहे. रामदास जाधव म्हणाले, “माझे वडील भीमराज जाधव यांनी 1971, 1982 व 1985 यावर्षी काशी, वाराणसी, ऋषिकेश, वैष्णोदेवी, पुष्कर या तीर्थस्थानी सायकलवरुन प्रवास केलेला आहे. मी देखील गेल्या 30-32 वर्षांपासून दरवर्षी इतर साधनांनी वैष्णोदेवी दर्शनास जात आहे. आपले वडील सायकलवरुन जात होते. याचीच प्रेरणा घेऊन मोटारसायकलवरून आपण सुद्धा जाऊ, असा निश्चय केला. या निश्चयाला मित्र सतीश मोरे यांची साथ मिळाली”. पाच…

Read More

Ahmednagar News ः नगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितेसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37 (1), (3) तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. नगर जिल्ह्यात हा आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेता येणार नाही. तसेच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा…

Read More

Ahmednagar News ः भारतीय हवामान विभागाने नगर जिल्‍हयात 20 व 21 एप्रिलला वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत , दिव्‍यांचे खांब, धातुचे…

Read More

New Arts Commerce and Science College ः “समाजाच्या प्रगतीसाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्य दिशादर्शक ठरले. संस्थेचे एक स्वायत्त महाविद्यालय म्हणजे न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाने सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविताना व महाविद्यालयास गुणवत्तेने वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना प्राचार्य व प्राध्यापकांची सेवा महत्त्वाची आहे. समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक गरज ओळखून ती गरज भागविण्याचे काम ही संस्था करत आहे”, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले. न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयावतीने प्राचार्य बी. एच. झावरे व प्रा. ज्ञानदेव जावळे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात अध्यक्ष म्हणून रामचंद्र दरे बोलत होते. राजर्षी शाहू…

Read More