Author: Kharee Gosht

Ahmednagar News ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने नगर शहरातील एका हॉटेलच्या रूममधून तिघांना 60 हजार रूपयांच्या रोख रकमेसह सोमवारी (दि. 29) रात्री ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बबन झावरे (रा. पारनेर), अनिकेत राजु यादव (रा. भिंगार) व विशाल गोविंद चिवडे (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार सतीष शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. एका हॉटेलच्या रूममध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पैशांचे वाटप सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. पथकाने तत्काळ सदर रूमवर छापा टाकून तिघांना 60 हजार रूपयांच्या रकमेसह पकडले. कोतवाली पोलिसांच्या त्यांना ताब्यात…

Read More

Pre-monsoon planning by Mahavidaran ः महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमना अगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरूस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात. जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात अभियंते, जनमित्र व बाह्यस्त्रोत कामगारांच्या माध्यमातून ही कामे सुरू झाली असून त्यामुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय…

Read More

Ahmednagar District Athletics Association ः अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलांमध्ये निखिल आव्हाड, ज्ञानेश्‍वर काळे, किशोर मरकड तर मुलींमध्ये उषा गुढीपाटी, ईश्‍वरी दराडे, विश्‍वेषा मिस्कीन व कोमल बनकर यांनी विविध गटात विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे सुनील जाधव व राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी पंच म्हणून रमेश वाघमारे, संदीप घावटे, जगन गवांदे, श्रीरामसेतू आवारी, समीर शेख, अमित चव्हाण,…

Read More

Don Bosco Football Cup ः भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को फुटबॉल चषक फिरोदिया शिवाजीयन्स (बी) संघ विजयी ठरला. मागील पाच दिवसापासून चर्चच्या मैदानात फ्लड लाईटमध्ये स्पर्धेचा थरार रंगला होता. स्पर्धेत तब्बल 21 संघांनी सहभाग नोंदवला. फिरोदिया शिवाजीयन्स अॅकॅडमीविरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स (बी) संघात अंतिम सामना झाला. यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन फिरोदिया शिवाजीयन्स (बी) संघाने विजय संपादन केले. डॉन बॉस्को फुटबॉल कप 2024 आयोजन समितीचे चेअरमन फादर विश्‍वास परेरा, मिसेस नंदिता डिसोजा, कर्नल डीप्टी कमांडंट रेजी मॅथ्यू, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनप ॲलेक्स फर्नांडीस, नितीन गवळी यांच्या हस्ते विजेत्या फिरोदिया शिवाजीयन्स बी संघास चषक 15…

Read More

Ahmednagar News : महाराष्ट्र अस्थिरोग संघटना अहमदनगर विभागाच्यावतीने 1 मे रोजी महाराष्ट्र अस्थिरोग संघटना दिवस मोफत शिबिराच्या सप्ताहाने साजरा केला जाणार आहे. सांधे वाचवा ही संकल्पना घेऊन संघटनेच्यावतीने 7 मे रोजीपर्यंत मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सांध्यांचे आणि हाडांचे आरोग्य सुधारावे यासाठी शहरात विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे समन्वयक डॉ. राहुल पंडित, अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतोष चेडे व सचिव डॉ. आशुतोष जोशी यांनी केले आहे. या शिबिरात मोफत कॅल्शियम घनता तपासणी, संधिवात तपासणी, वृध्द नागरिकांच्या हाडांची तपासणी व फिजिओथेरपी उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे.…

Read More

Mahatma Phule Agricultural University News ः राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री ई-टेंडर पद्धतीने करण्यात आली. यामध्ये यंदा विद्यापीठास रुपये एक कोटी 63 लाखांहून अधिकचा महसूल प्राप्त झाल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले. डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा उत्पादनात वाढ व विक्री पद्धतीमध्ये केलेल्या बदलांमुळे अधिकचा महसूल प्राप्त झालेला आहे. आंबा उत्पादन वाढीसाठी प्रक्षेत्रावरील अधिकारी व कर्मचारी यांनी आंबा बागांचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच किडींचे केलेले योग्य व्यवस्थापन अशा प्रकारची विशेष काळजी घेण्यात आली. यापूर्वी सन -2022 मध्ये रुपये एक कोटी 25 लाखांचा महसूल आंबा विक्रीतून विद्यापीठाला मिळाला होता. यावर्षी मध्यवर्ती…

Read More

Ahmednagar News ः जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना रोग प्रतिबंधक (ॲन्टी रेबीज), धनुर्वातचे लसीकरण करुन जंत प्रतिबंधक मोफत औषधे देण्यात आले. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील पशुपालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. अहमदनगर शहरातील माळीवाडा बसस्थानक जवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, जायंट्स ग्रुपचे विशेष कमिटी सदस्य संजय गुगळे, फेडरेशन ऑफिसर विद्या तन्वर, सचिव नुतन गुगळे, अनिल गांधी, आमी…

Read More

AHMEDNAGAR COLLECTOR’S OFFICE ः लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने खुप चांगली पूर्वतयारी केली आहे. आपण निवडणुकीच्या महत्वाच्या टप्प्यावर असून ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशील पणे पार पाडाव्यात. निवडणूक प्रक्रियेत सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवत काम करण्याचे निर्देश 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा यांनी दिले. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत अरोरा बोलत होते. यावेळी 37- अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग, 38-शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) अजय कुमार बिष्ट, निवडणूक निरीक्षक (खर्च)…

Read More

Ahmednagar Artifacts Museum ः पाचशेपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास असलेल्या अहमदनगर शहराचा ऐतिहासिक ठेवा जतन करणाऱ्या अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रास श्री गोपाल रामनाथ धूत फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्यावतीने स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लिनर भेट देण्यात आले. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा देविका रेळे, प्रतिभा धूत, वैशाली कोलते, सविता काळे , आर्किटेक मिनल काळे, सुजाता वाबळे, संग्रहालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर, अभिरक्षक डॉ. संतोष यादव, कर्मचारी नारायण आव्हाड, आनंद कल्याण, रामदास ससे, गणेश रणसिंग, बापू मोढवे, संतोष दांगडे, कृष्णा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिभा धूत म्हणाल्या, “राज्यातील सुसज्य संग्रहालयांपैकी अहमदनगर संग्रहालय हे एक आहे. मोठा ऐतिहासिक ठेवा संग्रहालयात…

Read More

Nagar Urban Bank : रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर 2023 मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये 23 एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी 12 कोटी 78 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. याच बरोबर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 17,200 ठेवीदारांचे 293.57 कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून परत करण्यात आले. 14,485 ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पुर्तता झालेली असून त्यांचे 60 कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहीती बँक प्रशासनाकडून देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षामध्ये थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येणार असून…

Read More