- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) सकाळी 11 वाजता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार काळ्या फिती लावून निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेची गुरुवारी (ता. 9) संघटनेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाइन बैठक झाली.राज्यातील पत्रकारांवर होणार्या हल्ल्याच्या संदर्भात चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणा दिल्या.विरोधकांच्या घोषणाबाजीला पीएम मोदींनी चांगलाच समाचार घेतला. पीएम मोदी म्हणाले, “काही लोकांचे वागणे निराशाजनक आहे. मी माननीय सभासदांना म्हणेन की, ‘माझ्याकडे चिखल होता, गुलाल माझ्याकडे होता… ज्याच्याकडे होता, त्याने त्याला उसळी दिली’. तुम्ही जितका चिखल टाकाल तितकी कमळ फुलेल. आमच्या यशात तुमचे योगदान विसरता येणार नाही”. हे घर राज्यांचे घर आहे, गेल्या दशकांमध्ये अनेक विचारवंतांनी घरातून देशाला दिशा दिली. असे लोकही घरात बसलेले असतात ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते…
अहमदनगर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावरील अरुढ पुतळा बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार आहे. आमदार संग्राम जगताप व महापौर रोहिणी शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. पंकज जावळे व उपमहापौर गणेश भोसले यांनी आज पाहणी केली.उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, “महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील आरूढ पुतळा बसवण्यासाठीच्या कामाचे भूमिपूजन भव्य दिव्य पद्धतीने हाेणार आहे”. शहरातील शिवप्रेमी व विविध संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहनही उपमहापौर…
बीडमधील 11 युवकांची प्रत्येकी पाच लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. शिर्डी पाेलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नाेंद झाली आहे. यात शिर्डी पाेलिसांनी तिघांना अटक केली असून, यात माेठी टाेळी सक्रिय असल्याचा पाेलिसांचा अंदाज आहे. शिर्डी विमानतळावर नाेकरी लावून देताे, असे म्हणत बनावट नियुक्ती पत्र देऊन बीडमधील 11 तरुणांची फसवणूक केली. तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शिर्डी विमानतळावर नोकरी निमित्तानं बीड जिल्ह्यातील अकरा तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होत. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात सखोल तपास केला असता गोकूळ राजाराम कांदे निफाड, गोकूळ गोसावी सिन्नर, विलास गोसावी सिन्नर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.
लाेकसभा आणि राज्यसभेत काॅंग्रेसविरुद्ध भाजप रणकंदन सुरू असताना पुण्यातील कसबा पाेटनिवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे. आता या पाेटनिवडणुकीत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी एन्ट्री केली आहे. काॅंग्रेसचे बंडखाेर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी मागे घेतली असून, यासाठी राहुल गांधी यांचा फाेन आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. कसबा निवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेले आणि पक्षाने उमेदवारी डावलल्याने दाभेकर यांनी बंडखाेरीचे निशाण फडकवले हाेते. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला हाेता. सध्या महाराष्ट्रात काॅंग्रेसचे डाेकेदुखी वाढली असतानाच दाभेकर यांच्या बंडखाेरीने त्यात आणखी भर पडली हाेती. यावर प्रदेश पातळीवर अनेक ताेडगे काढण्यात आले. परंतु पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांचा…
फुटबाॅल क्लब बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेच्या लाेगाेचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात झालं. क्रीडा मंत्री गिरीश महाजन आणि एफसी बायर्न क्लबचे सदस्य यावेळी उपस्थित हाेते. या स्पर्धा 14 वर्षाखालील खेळाडूंसाठी असून 8 फेब्रुवारीपासून सुरूवात हाेणार आहे. या स्पर्धेचं आयाेजन जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर असे असणार आहे. या स्पर्धेतील सर्वाेत्तम कामगिरी करणारे 20 खेळाडूंना म्युनिच (जर्मनी) इथं प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 27 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी इथं हाेतील. फुटबॉल क्लब बायर्न हा जगातील अग्रगण्य आणि लोकप्रिय फुटबॉल क्लब आहे. आतापर्यंत जर्मन फुटबॉलमध्ये राष्ट्रीय लीगमध्ये 32 वेळा विजेता ठरलेला आहे. तसेच इतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये…
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिरात सशुल्क दर्शन घेता येणार आहे. विश्वस्त मंडळाने याबाबत घेतला. प्रती व्यक्ती शंभर रुपयाचा पास घेऊन व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. साडेती शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून सप्तश्रृंगी गड आहे. हा गड सह्याद्री पर्वत रांगेतील पठार भागात आहे. या गडावर सप्तश्रृंगी मातेचं मंदिर आहे. एक आख्यायिका या मंदिराविषयी आहे. या गडावर भाविक मातेच्या दर्शनाबराेबरच पर्यावरण, निसर्गप्रेमी देखील येतात. समुद्र सपाटीपासून हा गड सुमारे 4600 फूट उंचीवर आहे. नवरात्राेत्सवाच्या काळात या गडावर भाविकांची रेलचेल असते. राज्यभरातून भाविका आपल्या नवसपूर्तीसाठी येतात. गडावर भाविकांच्या आणि पर्यटनप्रेमींसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं गर्दीत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. यातून…
तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल हाेत आहे. आर्टीफिशीयल इंटेलिजेंसवर जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहेत. त्यातून आव्हानात्मक संशाेधन पुढे येत आहे. यातून कंपन्यांमधील स्पर्धा देखील वाढली आहे. अमेरिकी टेक कंपनी गुगलने आर्टीफिशीयल इंटेलिजेंसवर आधारीत चॅट साॅफ्टवेअर बार्ड आणलं आहे. नाेव्हेंबर 2022 मध्ये लाॅंच झालेल्या चॅटजीपीटी चॅटबाॅटने संपूर्ण जगाला वेड लावलं. याच्या धाेक्यापासून वाचण्यासाठी चॅटबाॅट सर्व्हिस लाॅंच करण्याचं प्लॅनिंग केलं आहे. गुगलबार्ड एआय हे गप्पा मारण्याचे चॅटबाॅट आहे. जे LaMDA वर आधारित आहे. म्हणजेच नवा चॅटबाॅट गुगलच्या भाषा माॅडल फाॅर डायलाॅग एप्लिकेशन सिस्टमवर काम करताे. जर याला काेणी काही प्रश्न विचारला तर उत्तर देईल. कंपनी गेल्या काही वर्षांपासून या भाषा माॅडेलवर काम करत आहे. एका ब्लाॅग पाेस्टमध्ये गुगलचे सीईआे सुंदर पिचाई यांनी बार्ड एआयला टेस्टिंगसाठी तायर केलं आहे.…
महाराष्ट्रातील नाशिक इथं करन्सी नाेट प्रेसला नेपाळ देशाच्या एक हजार रुपयांच्या 430 दशलक्ष, तर पन्नास रुपयांच्या 300 दशलक्ष नाेटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे देश-विदेशाच्या चलनी नाेटा छापणाऱ्या करन्सी नाेट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कंत्राट बूस्टर डाेस ठरला आहे. नेपाळ सरकारबराेबर हा करार नुकताच झाल्याची माहिती आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गाेडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. भारत सरकारच्या डिजिटल करन्सीमुळे प्रेस कर्मचाऱ्यांसमाेर वेगळेच आव्हान हाेते. कर्मचारी कपातीची टांगती तलवार हाेती. यामुळे देशातीलच नव्हे इतर छाेट्या परदेशांच्या नाेटांचे कंत्राट मिळवून वेगळ्या वाटा शाेधण्यावर प्रेस प्रशासनासमाेर हाेते. यावर विदेशातील करन्सी छापण्याचा प्रस्ताव प्रेस प्रशासनासमाेर मजदूर संघाने दिला. त्याला प्रशासनाने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी नेपाळ…
भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीचे प्लॅनिंग जबरदस्त असते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची प्रत्येक निवडणूक ते प्लॅनिंग करून लढतात. लाेकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी अवघे चारशे दिवस राहिले आहेत. त्याचे प्लॅनिंग भाजपकडून पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भाजपच्या संसदीय कार्यकरिणीमध्ये खासदांना या निवडणुकीसंदर्भात खास कानमंत्र दिला आहे. निवडणुकीत विजय व्हायचे असेल, तर जनतेशी कनेक्ट रहा, तसे केल्यास अँटी इन्कबन्सी हाेणार नाही. खासदारांनी आपल्या मतदार संघांमध्ये लाेकांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत, असेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितले. भाजपची संसदीय कार्यकारिणीची बैठक नुकताच झाली. या बैठकीत नरेंद्र माेदी वेगवेगळ्या विषयांवर खासदारांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, “अमृतकाळातला अर्थसंकल्पही सादर झाला आहे. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना विचारात घेऊन सादर करण्यात…