- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानमध्ये विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी जेट इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे. पाकिस्तानच्या ईधी एअर अॅम्ब्युलन्ससह अनेक कंपन्यांनी त्यांचे काम बंद केले आहे. स्काय विंग्ज एव्हिएशन कंपनीने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.दरम्यान, ब्रिटनच्या प्रसिद्ध विमान कंपनी व्हर्जिन अटलांटिकने पाकिस्तानातून काढता पाय घेतला आहे. तशी घोषणाच केली आहे. ईधी विमानसेवा बंद झाल्याचा फटका पाकिस्तानातील रुग्णांना सहन करावा लागणार आहे. स्काय विंग्स एव्हिएशन कंपनी वैमानिकांच्या प्रशिक्षणात गुंतलेली आहे. ईधी एअर अॅम्ब्युलन्स सेवा बंद केल्यास गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम ठप्प होईल, असे ते म्हणाले.स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जेट इंधनाचे…
सिंधुदुर्गात सहा मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे. सावडाव (ता. कणकवली) गावात ही घटना घडली. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत जात असलेल्या रस्त्यावर चाकुचा धाक दाखवून मुलांचे अपहरणाचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद घेतली आहे. याबाबत घटनाक्रम असा, शाळेकडे रस्त्याने जात असताना या सहा मुलांना अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना वाहनात कोंबले; मात्र काही अंतरावर गेल्यावर आतील एकाला फोन आल्याने वाहनातील एका रस्त्यावर थांबली. ही संधी साधून मुलांनी हुशारी दाखवली आणि अपहरणकर्त्यांच्या वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. यानंतर पाेलिसांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलांनी केलेल्या वर्णनावरून वाहनाचा शाेध सुरू केला आहे. पोलिसांनी या अपहरणकर्त्यांचा शाेध…
अहमदनगर येथील बुरुडगाव श्री क्षेत्र आशुतोष महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त अखंड त्रिदिनीय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले. यानिमित्ताने कालीचरण महाराज, जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती करवीर पीठाधीश्वर आणि महंत शंकर भारती प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. कालीचरण महाराज, जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती करवीर पीठाधीश्वर आणि महंत शंकर भारती शुक्रवार (दि.17) दुपारी 12 वाजता उपस्थितीत राहणार आहेत. माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते बुरुडगाव पर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करून धर्मसभेला प्रारंभ होणार आहे. या धर्मसभेत सहभागी होण्याचे आवाहन बुरुडगाव ग्रामस्थांनी केले आहे.
महिला क्रिकेटमध्ये बीसीसीआयद्वारे प्रथमच महिला प्रीमियर लीग (WPL) चे आयोजन केले जात आहे. ज्यामध्ये स्मृती मानधना आतापर्यंतची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावात 400 हून अधिक महिला खेळाडूंचा लिलाव होणार असून यामध्ये 90 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. तर याच लिलावात 449 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून, 200 हून अधिक खेळाडू भारतीय आहेत. तर बाहेरच्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक खेळाडू आहेत. – स्मृती मानधना – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 3.40 कोटी (भारत)- अॅशले गार्नर – गुजरात जायंट्स, 3.20 कोटी (ऑस्ट्रेलिया)- सोफी एक्लेस्टोन – यूपी वॉरियर्स, 1.80 कोटी (इंग्लंड)- हरमनप्रीत कौर – मुंबई इंडियन्स, 1.80 कोटी (भारत)- एलिस पेरी…
चार वर्षे उलटूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचे गुऱ्हाळ सुरूच आहे. या शपथविधीबाबत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माेठा गाैप्यस्फाेट केला आहे. वृत्तवाहिन्यांवर तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीची कल्पना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाेती, असे म्हटले आहे. फडणवीस यांच्या या गाैप्यस्फाेटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांच्या या गाैप्यस्फाेटावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र हे असत्याच्या मार्गावर असं विधान करती, असे वाटले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर बाेलताना म्हटले आहे की, या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद…
केंद्रात नऊ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असून सर्व राजकीय पक्ष त्याच्या तयारीत व्यस्त आहेत. विशेषत: भाजप यावेळी हॅट्ट्रिक करेल, अशी आशा आहे. पक्षाला नेहमीच हिंदू मतदारांकडून आशा असते किंवा हिंदू हाच भाजपचा मूळ मतदार आहे, असे म्हणायला हवे. २०१९ च्या निवडणुकीत हिंदूंनी एकमताने भाजपला मतदान केले. या वेळीही त्याच कथेची पुनरावृत्ती होणार की नवीन कथा लिहिली जाणार, यासंदर्भात एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.प्यू रिसर्च सेंटरकडून एक सर्वे समोर आला आहे. यामध्ये ३० हजार लोकांनी भाग घेतला होता. सर्वेक्षणात या लोकांनी सांगितले की, हिंदूंनी भाजपला कोणत्या आधारावर मतदान केले. २०१९च्या लोकसभा…
जानेवारी २०२३ मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाईने तीन महिन्यांचा विक्रम मोडला आहे. सरकारने सोमवारी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कमाल मर्यादेपेक्षा ही जास्त आहे.रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर ४ टक्के ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याचबरोबर महागाईची व्याप्ती २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची मर्यादा आहे. जानेवारीपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई ५.७२ टक्के होती.देशाच्या ग्राहक किंमत निर्देशांकात फक्त अन्न किंमत निर्देशांकाचा सुमारे ४० टक्के हिस्सा आहे. याचा अर्थ देशातील महागाई वाढण्यास किंवा कमी होण्यास खाद्यपदार्थांच्या किमती हा एक मोठा घटक आहे. जानेवारी २०२३ ची आकडेवारी पाहिली तर जानेवारीत अन्नधान्य महागाई दर 5.94 टक्के…
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील माेदी सरकारावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींवर विशेषाधिकार भंगाचा आरोप करत नोटीस दिली. प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी हे आरोप सिद्ध करू शकत नसतील तर कारवाई निश्चित हाेईल, असे सांगितले. विशेषाधिकार भंग प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटीसवर लोकसभा सचिवालयाने पाठवलेल्या टीकेवर पलटवार करताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली जाईल. बिनबुडाचे आरोप केले आहे. आराेप सिद्ध करावे लागतील. ते न केल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई हाेईल”. संसद…
त्रिपुरामध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी 16 फेब्रुवारीला सर्व 60 जागांवर मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. पीएम मोदीही विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसले. डाव्यांबाबत ते म्हणाले की, “डाव्यांनी त्रिपुराला गुलाम मानले. त्रिपुरातील जनता डोळ्यासमोर विकास पाहत असल्याने आज वातावरण भाजपच्या बाजूने आहे. आज त्रिपुरामध्ये असे एकही कुटुंब नाही ज्याची भाजप सरकारने आघाडीतून सेवा केली नाही”.पंतप्रधान माेदी म्हणाले, “डाव्यांनी त्रिपुराला विनाशाच्या मार्गावर ढकलले आहे. सरकारी कार्यालये संवर्गाच्या ताब्यात, पोलिस ठाणी, व्यापार-व्यवसाय संवर्गाने व्यापले आहेत. डाव्यांनी त्रिपुरातील लोकांना गुलाम आणि स्वतःला राजा समजले होते”. ‘सत्तेची भूक भागवण्यासाठी डावे आणि काँग्रेस काहीही करू शकतात. ते केरळमध्ये कुस्ती…
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ले व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा लोकसेवा पत्रकार संघाच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. पत्रकारांनी काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी केली. लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन दिले या आंदोलनात लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबिद शेख, बाळासाहेब नेटके, माणिकराव वाघ, सुनील ठाकरे, असीम शेख, इमरान शेख, नागेश शिंदे, रोहिणी पवार, हिना…