- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
देशातील सर्वात मोठी बँक SBI ने पुन्हा एकदा कर्ज (SBI व्याजदर) महाग केले आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी निधी आधारित कर्ज दर म्हणजेच MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. बँकेने यावर्षी दुसऱ्यांदा MCLR वाढवला आहे. याआधी जानेवारीमध्येही बँकेने MCLR 10 बेसिस पॉइंटने वाढवला होता. वाढीव दर आजपासून म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून लागू झाला आहे. RBI ने अलीकडेच सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांनी कर्ज महाग केले आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी एप्रिल 2016 मध्ये आरबीआयने MCLR सुरू केला होता. त्याचा उपयोग व्यापारी बँका कर्जाचा व्याजदर ठरवण्यासाठी करतात. SBI ने रात्रीचा…
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या अहवाल पुढे आला आहे. या अहवालानुसार 2021-22 मध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) 614 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, तर काँग्रेसला 95 कोटी रुपये मिळाले. एडीआरच्या अहवालानुसार, 2021-22 साठी, राष्ट्रीय राजकीय पक्षांनी 7,141 देणग्यांमधून (20,000 रुपयांच्या वर) एकूण 780.774 कोटी रुपयांच्या देणग्या घोषित केल्या आहेत.अहवालात म्हटले आहे की, “भाजपने 4,957 देणग्यांमधून एकूण 614.63 कोटी रुपयांची घोषणा केली आहे, त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. काँग्रेसने 1,255 देणग्यांमधून 95.46 कोटी रुपये जाहीर केले आहेत. भाजपने घोषित केलेल्या देणग्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम), एनपीईपी, तृणमूल काँग्रेस…
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी माेठी मागणी केली आहे. या मागणीद्वारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना टार्गेट केले आहे. एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची ही मागणी आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी डोवाल यांना एनएसएच्या पदावरून हटवावे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले की, पेगासस टेलिफोन टॅपिंगसारखी चूक आपण अनेकदा केली आहे”. तसे न झाल्यास पंतप्रधान मोदींना 2023 च्या मध्यात पद सोडावे लागू शकते, असेही स्वामी म्हणाले. ट्विट करताना सुब्रमण्यम स्वामी यांनी अजित डोवाल यांच्याबाबत या गोष्टी सांगितल्या आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी डोभाल यांना बडतर्फ करण्याची मागणी, तर केलीच पण तसे न झाल्यास पंतप्रधान मोदींनाही पद सोडावे लागू शकते, असेही सांगितले.अदानी समूहाबाबत नुकताच आलेला…
अहमदनगर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती झाली आहे. डाॅ. राजेंद्र भाेसले यांची मुंबई उपनगरला जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. अहमदनगरला जिल्हाधिकारी बदली हाेण्यापूर्वी ते सिडकाेच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत हाेते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सालीमठ हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम पाहत हाेते. सालीमठ हे २०११ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कृषी संशोधनात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. १९९५ पासून ते प्रशासकीय सेवेत आहेत. महसूल, शहरी विकास, जमीन अधिग्रहण विषयावर सालीमठ यांनी काम केले आहेत. कणकवली, जव्हार, सावंतवाडी इथं त्यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगलीत जमीन अधिग्रहण अधिकारी, साेलापूरला निवासी उपजिल्हाधिकारी, यूएलसी मुंबईचे सक्षम प्राधिकारी, काेकण महसूल विभागात उपायुक्त म्हणून काम पाहिले. पालघर इथं…
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं… उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं..!या कवितेने काॅलेजमधील विद्यार्थ्यांना खळखळून हसवलं. सादरकर्ते हाेते, औरंगाबाद येथील प्रसिद्ध कवी नारायण पुरी. निमित्त हाेते अहमदनगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे. प्रसिद्ध कवी नारायण पुरी मार्गदर्शन करताना म्हणाले, ” आरशात फक्त प्रतिबिंब दिसते, पण कविता साहित्यामधून मनुष्याचे अंतरंग दिसते. कविता या समाजाचे एक्सरे व सिटी स्कॅन आहेत. सातशे वर्षापासून आपल्या आजी, आईसारख्या माय माउल्यांनी जात्याभवती ओव्यांनी कवितेला जिवंत ठेवल्यानेच. आज या कविता आपल्या पर्यत आल्या आहेत. पूर्वी आजी आजोबा, रेडिओने संस्कार केले. पण आता टीव्ही नावाचा डब्बा आपल्या समोर आहे. मग कशे संस्कार होणार?”…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबींचा खुलासा केला आहे. देशातील अनेक शहरांचे नामांतर, नक्षलवाद, ईशान्य भारतातील परिस्थिती, अतंकवाद, आंतरराष्ट्रीय पातळवर वाढलेला भारताचा दबदबा आदी मुद्यांवर अमित शहा यांनी मते मांडली. नामांतरावर ते स्पष्टच बाेलले, देशातील अनेक शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे येत आहे. देशातील एकही शहर असे नाही की, त्याचे नाव बदलेले गेलेले नाही. याबाबत सरकारने खूप विचार केलाय आणि तसा प्रत्येक सरकारला याबाबत कायदेशीर अधिकार आहे. पंतप्रधान मोदींनी ईशान्य आणि उर्वरित भारतातील अंतर संपवले आहे. आज ईशान्येतील लोकांच्या मनात असे वाटते की इतर भागांमध्ये आपला आदर आहे. इतर राज्यांतील लोक ईशान्येकडे गेले तर त्यांचाही आदर…
राज्यातील शाळांना लागाेपाठ पाच दिवसांची सुट्टी असणार आहे. कारणही तसंच आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे. हे अधिवेशन 15 ते 17 फेब्रुवारीला हाेणार आहे. या तारखांना जाेडून शनिवार आणि रविवार आला आहे. त्यामुळे पाच दिवसांची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शिक्षक संघाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील चंपक मैदानावर प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षक परिषद 17 फेब्रुवारीला हाेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विराेधी पक्षनेते अजित पवार, उद्याेगमंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री आणि माजी मंत्री उपस्थित…
KGF स्टार यशने बेंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यश व्यतिरिक्त पीएम मोदींनी कांतारा फेम ऋषभ शेट्टी आणि दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारची पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांचीही भेट घेतली. पीएम मोदींना भेटल्यानंतर यश खूप खूश आहे. भेटीनंतर त्यांनी पीएम मोदींसोबत झालेल्या संवादाची माहिती दिली.यश म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. त्यांनी धीराने आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या त्यांच्या व्हिजनबद्दल बोलले. त्यांनी आम्हाला आमच्या अपेक्षा, आम्ही काय शोधत आहोत, सरकारकडून आम्हाला काय अपेक्षा आहेत, एक उद्योग म्हणून आम्ही देशासाठी काय करू शकतो याबद्दल विचारले. त्याला इंडस्ट्रीबद्दल किती माहिती आहे हे पाहून मी प्रभावित झालो”. पंतप्रधानांनी चित्रपट उद्योगाला सॉफ्ट पॉवर म्हटले.…
उत्तर प्रदेश शिक्षण मंडळ १६ फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू करणार आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष बाब म्हणजे बोर्डाच्या परीक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी ३ लाख व्हॉईस रेकॉर्डरसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांची यादीही जारी करण्यात आली आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण 8 हजार 753 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या साडेचार टक्क्यांनी वाढली आहे. या केंद्रांवर दहावी आणि बारावीचे 58 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले आहेत.यूपी बोर्डाच्या परीक्षा पाहता २४२ परीक्षा केंद्रे अतिसंवेदनशील आणि ९३६ संवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. राज्यातील 16 जिल्हे संवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये…
कठीण काळातून जात असलेल्या अदानी समूहासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. मॉरिशसच्या नियामक वित्तीय सेवा आयोगाने (FSC) अदानी समूहाला क्लिन चीट दिली आहे. मॉरिशसच्या बाजार नियामकाने सांगितले की, त्याचा अंतर्गत अहवाल अद्याप आपल्या भारतीय समकक्षांशी सामायिक केलेला नाही. बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मॉरिशसमधील अदानी समूहाशी संबंधित सर्व युनिट्सकडून मिळालेल्या प्राथमिक मूल्यांकनाच्या आणि माहितीच्या आधारे, आम्हाला आतापर्यंत नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा आढळलेले नाहीत.सध्या, भारतीय बाजार नियामक सेबी अदानी समूह आणि दोन मॉरिशस-आधारित कंपन्या- ग्रेट इंटरनॅशनल टस्कर फंड आणि आयुष्मान लिमिटेड यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये काेणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही.शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार…