Author: Kharee Gosht

TRAI आता कॉल ड्रॉपिंगची समस्या संपणार आहे. ट्रायने यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. देशातील सर्व अनोंदणीकृत टेलिमार्केटिंग कंपन्यांवर अधिक कडक कारवाई केली जाईल. सर्व दूरसंचार कंपन्या नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांचे तपशील एकमेकांना शेअर करतील. तसेच, सर्व दूरसंचार कंपन्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि व्यावसायिक दूरसंचारावर बंदी घालतील. कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत.

Read More

Nokia Maze 5G :एकेकाळी प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारा नोकिया पुन्हा एकदा धन्सू स्मार्टफोन घेऊन येणार आहे. कंपनी लवकरच भारतात Nokia Maze 5G स्मार्टफोन आणणार आहे. या फोनची डिझाईन, फीचर्स आणि किंमत या सगळ्यात नंबर वन असेल. फोनची बॅटरी खूप शक्तिशाली आहे आणि कॅमेरा उत्कृष्ट आहे. तुम्हीही या फोनची वाट पाहत असाल, तर आम्हाला या फोनचे प्रत्येक स्पेसिफिकेशन कळवा.नोकियाचा हा स्मार्टफोन 4K रिझोल्युशनसह येत आहे. या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC चिप प्रोसेसर वापरला जाईल. हा Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा स्मार्टफोन असेल.Nokia Maze 5G मध्ये 8GB आणि 12GB RAM असेल. त्याच…

Read More

बुरूडगाव येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने कालीचरण महाराज यांची धर्मसभा झाली. यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राहुल महाराज दरंदले, महंत शंकरनाथ महाराज, महंत ओमभारती महाराज आदी उपस्थित होते.  कालीचरण महाराज म्हणाले, “अहमदनगरचे नाव प्राचीनकाळी अगस्त्यनगर होते. पुढे ते अंबिकानगर झाले. यानंतर मुस्लिम राजाने अहमदनगर हे नाव ठेवले. जेथे हिंदू अस्मिता आहेत, त्या अस्मिता जपण्यासाठी नामांतर होण्याची आवश्यकता आहे”. कुठलीही धर्मनिरपेक्ष संकल्पना अस्तित्वात नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म असा दावा कालीचरण यांनी यावेळी केला.  महाराष्ट्रातील नाथांच्या समाध्यांचे मुस्लिमांकडून कब्जा केला जात आहे. त्याचे पीरमदारमध्ये रूपांतर करण्याचे षडयंत्र सुरू आहे. साईबाबांनाही मुस्लिम ठरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिंदूंनी त्याला बळी पडू नये, असेही आवाहान कालीचरण महाराज यांनी केले. 

Read More

Voice Record :काळ्या बाजारात विक्री केला जाणारा तांदूळ प्रकरणी अहमदनगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलिस अंमलदाराने दुकानदाराकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान सदरची लाच मागणी पडताळणी पंचासमक्ष सुरू असताना तो अंमलदार डिजिटल व्हाइस रेकॉर्डर घेऊन पसार झाला आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे अंमलदाराचे नाव आहे.नगर तालुक्यातील देहरे गावातील तक्रारदारांच्या फिर्यादीवरून अंमलदार निपसे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर येथील पथकाने ही कारवाई केली. देहरे येथील तक्रारदार यांचे गावात किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात, तसेच गावातील काही लोक मुलांना शाळेत…

Read More

Income Tax Returns :या अर्थसंकल्पात सरकारने आयकरदात्यांना अनेक सुविधा दिल्या असून काही देखरेखही वाढवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने जारी केलेल्या नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सी ते स्टॉक मार्केटशी संबंधित अनेक माहिती उघड करावी लागणार आहे. एकूणच आता तुमच्या प्रत्येक खर्चावर आणि गुंतवणुकीवर आयकर विभागाची नजर राहणार असून थोडीशी चूक जड जाऊ शकते. मात्र, नवीन फॉर्ममध्ये वैयक्तिक करदात्यांसाठी फारसा बदल झालेला नाही.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने यावेळी आयकर रिटर्न फॉर्म खूप लवकर अधिसूचित केले, जेणेकरून नंतर करदात्यांना ITR भरताना गर्दीचा सामना करावा लागू नये. पूर्वी, आयटीआर फॉर्म सामान्यतः मे-जूनमध्ये यायचे, त्यामुळे…

Read More

Poison :अहमदनगर जिल्ह्याच्या सहलीवर असलेल्या दर्यापूर (जि.अमरावती) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या ९४ मुले व ५ शिक्षकांना शिर्डीच्या साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे मुले व शिक्षकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही, असे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे ‌. मुले व शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रितम वडगावे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.दर्यापूर (जि.अमरावती) येथील आदर्श हायस्कूलमधील २२७ मुले-मुली व १५ शिक्षक शैक्षणिक सहलीला निघाले होते. १६ फेब्रुवारीला दुपारी…

Read More

Peacock :निसर्गभ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर अहमदनगर शहराच्या आसपास असलेल्या जंगलामध्ये येणार्‍या उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी करावयाच्या उपायोजना संदर्भात फिरत होते. नगर तालुक्यातील केकताई भागात शिकार्‍यांनी लावलेल्या जाळ्यात त्यांना मोर अडकलेला दिसला. या माेराला शिकारी घेऊन जाताना दिसले.  पटेकर यांनी याची माहिती वन कर्मचारी तेजस झिने व विकास रणसिंग यांना दिली. यानंतर वन कर्मचारी यांनी शिकार्‍यांचा पाठलाग केल्यावर त्यांनी माेरास साेडून पळ काढला. शिकार्‍यांच्या जाळ्यात अडकल्याने माेर जखमी झालेला हाेता. पेटकर यांच्यासह वन कर्मचार्‍यांनी प्राथमिक उपचार करुन मोरास वन संरक्षक अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. विद्यासागर पेटकर, प्रसाद खटावकर, संजय दळवी, नितीन केदारी व इतर सदस्य जैवविविधता टिकवण्यासाठी कार्यरत असून यासाठी त्यांना…

Read More

Radhakrishna Vikhe Patil :महाराष्ट्र राज्यातील काॅंग्रेसमधील धुसफूस सुरूच आहे. मनाेमिलन झाल्याचे दिसते, परंतु वरिष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्व आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरूच आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्याविरुद्ध झालेल्या कुरघाेड्या आणि बाळासाहेब थाेरातांचे नाराजीनाट्य हे देखील राज्याने जवळून पाहिलं. अशातच भाजपचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वेगळा खेळी केली आहे. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची  ऑफर  देऊ केली आहे. या  ऑफरमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.  मंत्री विखे यांनी ही ऑफर देताना म्हटले आहे की, अशाेक चव्हाण ज्या पक्षात, त्याचे अस्तित्व आणि भविष्य काय, हे त्यांना देखील माहित नाही. नाशिक पदवीधर मतदार संघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक झाली.…

Read More

Chetan sharma :स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्माने बीबीसीआय (BCCI) निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी काही गोपनीय माहिती उघड केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “होय, चेतनने बीसीसीआय सचिव जय शाह यांना राजीनामा पत्र सादर केले आहे आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.”स्टिंग ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती. त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही. बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनलसाठी चेतन शर्मा निवड समितीच्या इतर सदस्यांसह कोलकात्यात होते. इराणी चषकासाठी संघ निवडीसंदर्भात तो तेथे गेला होता.चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने…

Read More

OnePlus 11 :जगभरात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात आहेत, पण वनप्लसची क्रेझ वेगळीच आहे. या कंपनीचे फोन भारतात देखील लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर ते खूप मजबूत आहेत. या कंपनीत बाजारात अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह येतात. येथे तुम्हाला मिड-बजेट आणि हाय बजेट वनप्लस लेटेस्ट फोन आणि त्यांच्या फीचर्सबद्दल सांगितले जात आहे. हे स्मार्टफोन उत्कृष्ट फीचर्स आणि स्पीकरसह येत आहेत. त्याचवेळी, OnePlus चा OnePlus 11 फोन भारतात लॉन्च झाला आहे. वनप्लसचे हे मोबाईल अॅपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनला टक्कर देत आहेत. या OnePlus Mobiles ची बॅटरी खूप जलद चार्ज होते आणि ती खूप दिवस टिकते. OnePlus फोनची…

Read More