- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Cold महाराष्ट्र राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सकाळी अकरा वाजल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत उन्हाच्या झळा असह्य हाेतात. सकाळीच्या उन्हाच्या झळा तीव्र जाणवत असल्या, तरी रात्री थंडी वाढते आहे. हा वातावरणातील बदल सर्व अनुभवत आहेत. पुढील दाेन दिवस उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. यानंतर पुन्हा गारवा वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. वातावरणातील बदलाचा अभ्यास करताना काही निरीक्षणांची नाेंद झाली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सातत्याने बदल हाेत आहेत. जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. परिणामी थंडी परतण्याची शक्यता आहे. काल रात्री राज्यभर थंड वारे वेगाने वाहत हाेते. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत थंड वार्याच्या वेगांमध्ये वाढ झाली हाेती. राज्यात सध्या कमाल तापमानामध्ये वाढ नाेंदवली…
Mahavitaran महावितरण कंपनी काेराेनानंतर त्यांच्या कारभारात अधिक वेगाने सुधारणा करताना दिसत आहे. वीज ग्राहकांना डिजिटल वीजबिलांसह विविध उपक्रम त्यांचे यशस्वी हाेत आहेत. यातच आता महावितरणने वीजबिले अतिशय अचूक पद्धतीने ग्राहकांना मिळावित यासाठी महावितरणने माेहिम सुरू केली हाेती. आता या माेहिमेला देखील यश मिळू लागले आहे. गेल्या सहा महिन्यात विजेच्या मीटरच्या अस्पष्ट छायाचित्रांचे प्रमाण दाेन टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. जानेवारीत हे प्रमाण दीड टक्क्यांपर्यंत खाली आले. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्याची माहिती महावितरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. वीज ग्राहकांना वीज बिल देण्याअगाेदर वीज मीटरचे छायाचित्र घेतले हाेते. ते वीज बिलावर वापरले जाते. त्यातून वीजवापराच्या आकडेवारीची नाेंद घेतली जाते. मीटरमध्ये काही दाेष असेल…
Kashmir to Kanyakumari अहमदनगर जिल्ह्यातील सायकलपटू जसमीत वधवा यांनी जम्मू-कश्मीर ते कन्याकुमारी प्रवासाला सुरूवात केली आहे. या प्रवासाला अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. घर घर लंगर सेवेचे हरजीत वधवा यांचे जसमीत हे धाकटे बंधू असून, त्यांची अहमदनगरसह देशात सायकलपटू ओळख आहे. सायकलपटू जसमीत वधवा हे जम्मू-कश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासासाठी २१ फेब्रुवारीपासून प्रवासाला सुरूवात करत आहे. या प्रवासाला अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी या प्रवासाला आणि जसमीत वधवा यांच्या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे, घर घर लंगर सेवेचे जनक अहुजा, डॉ.संजय असनानी, प्रीतपाल धुप्पड, कैलास नवलानी,अमोरा वधवा…
अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील लेफ्टनंट साैरभ भागुजी औटी यांचे जम्मू-काश्मीरमधील लडाख इथं अपघाती निधन झाले. राळेगणसिद्धी इथं साेमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लष्कार दाेन वर्षांपूर्वी भरती झालेल्या साैरभ यांच्यावर निराेप देण्याची वेळ आल्यानं गावकऱ्यांना गहिवरून आलं हाेतं. कर्तव्यावर असताना साैरभ यांच्या वाहनाला गेल्या आठवड्यात अपघात झाला हाेता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले हाेते. त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. यातच त्यांचे निधन झाले. लष्करात थेट अधिकारी पदावर निवड हाेणारे साैरभ औटी हे राळेगणसिद्धीमधील पहिले हाेते. एनडीएमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दाेन वर्षांपूर्वीच ते अधिकारी म्हणून लष्करात दाखल झाले हाेते. जम्मू येथील १६८ व्या ताेफखआना रेजिमेंटमध्ये दाखल झाले हाेते. साैरभ यांच्या या यशानिमित्त गावात माेठा सत्कार…
Fear of stopping Examination राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदाेलन सुरू केले आहे. या महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. यातच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केल्याने विद्यापीठ प्रशासनासमाेर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षांवर बहिष्कार घातला आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण हाेत नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संताेष कानडे यांनी दिली. राज्यातील सर्व महाविद्यालयांसमाेर कर्मचारी यांनी आज काम बंद आंदाेलन करून निदर्शने केली. अहमदनगर जिल्ह्यातील आंदाेलनात बबन साबळे, वंदना लाहोर, हेमा कदम, सविता डांगे, रवी वर्पे, सिताराम मुळे, दत्तात्रय जाधव, भानुदास गुंजाळ, शिवाजी…
Award :शहीद काॅम्रेड गाेविंद पानसरे यांनी शेतकरी, कामगार, कष्टकयांसाठी आयुष्य वेचले. ज्ञानदेव पांडुळे समाजभान असलेला कार्यकर्ता त्यांचेच कार्य पुढे नेत असल्याचे काैतुक आहे. त्यामुळे काॅम्रेड गाेविंद पानसरे स्मृती प्रबाेधन पुरस्काराने सन्मानित करताना आनंद हाेत असल्याचे प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीला माेराळे (बीड) यांनी दिली. शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे काॅ. गाेविंदभाई पानसरे स्मृती प्रबाेधन पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी प्रा. सुशीला माेराळे बाेलत हाेत्या. हमाल पंचायतीचे राज्य सल्लागार बाबा आरगडे अध्यक्षस्थानी हाेते. आमदार संग्राम जगताप, प्रा. तानाजी ठाेंबरे, माजी आमदार दादा कळमकर, स्मिता पानसरे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गाेसावी आदी उपस्थित हाेते. प्रा. सुशीला माेराळे म्हणाल्या, “गाेविंदभाई पानसरे यांच्या नावाने पुरस्कार म्हणजे डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा, प्राेत्साहन आणि ऊर्जा आहे. सध्या देशातील वातावरण मनुवादी आहे. फॅसिट प्रवृत्तींचा प्रभाव आहे. यातून समाजात…
March for Renaming of Ahmednagar अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा जाेर वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकरनगर नामकरणासाठी कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा नेला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टमेकाेडवली येथील नारायण खाणू माेठे देसाई, कृती समितीचे विजय तमनकर, राजेंद्र तागड, काका शेळके, निशांत दातीर, विनाेद पाचारणे, वकील अक्षय भांड, ज्ञानेश्वर बाचकर, शारदा ढवण, दत्ता खेडेकर, अण्णासाहेब बाचकर, अशाेक वीरकर, डी. आर. शेंडगे, बाबासाहेब तागड, सचिन डफल, राजेंद्र पाचे आदी माेर्चात हाेते. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी आमदार गाेपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली हाेती. राज्याचे मंत्री दीपक केसकर यांनी या मागणीला उत्तर दिले हाेते. जिल्हाधिकारी यांच्याकडून…
Subsidy :मत्स्यपालन संपदा याेजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून माेठं अनुदान मिळत आहे. याचा मत्स्य शेती करणाऱ्यांना चांगला फायदा हाेणार आहे. या याेजनेत राज्य सरकारचेही याेगदान असणार आहे. राज्यात मत्स्यपालन घटकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा याेजनेतून अनुदान मिळते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा याेजनेअंतर्गत २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर मत्स्यपालन करणाऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांना गाेड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी तलाव बांधणे, क्षारमुक्त आणि क्षारयुक्त जमीन तलाव बांधणे, आरएएस युनिटची स्थापना, दाेन, तीन आणि वीस टन प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेले खाद्य भाेजन, घरामागील मिनी आरएएस यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
10 Nuclear Power Plant Approved :उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा हरियाणातील दीडशे किलाेमीटर उत्तरेस असलेल्या फतेहाबाद जिल्ह्यातील गाेरखपूर गावात उभारला जाणार असल्याची घाेषणा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या राजवटीत देशाच्या ग्रामीण भागात अणू आणि अणुऊर्जा प्रकल्प उभे राहत आहेत, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र सिंह यांनी दिली. अणुऊर्जा प्रकल्प हे दक्षिण भारतीय राज्य, तामिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा पश्चिमेकडील महाराष्ट्रपर्यंत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली दहा अणुभट्ट्यांच्या स्थापनेसाठी मंजुरी मिळाली आहे. हा क्रांतिकारी निर्णय आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले. अणुऊर्जासाठी २० हजार ५९४ काेटी रुपयांच्या एकूण वाटप केलेल्या रकमेपैकी ४ हजार ९०६ काेटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला…
Adani group :अदानी समूह आणखी संकटात सापडला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या आराेपानंतर फाेर्ब्स अहवालात गाैतम अदानी यांचे माेठे बंधू विनाेद अदानींबाबत माेठा दावा केला आहे. हिंडेनबर्गने फाेर्ब्सचा अहवाल ट्विट केला आहे. कर्जासाठी अदानी समूहातील प्रवर्तकांची हिस्सेदारी गहाण ठेवल्याचे हा दावा आहे. फाेर्ब्सच्या अहवालानुसार विनाेद अदानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका खासगी कंपनीच्या सिंगापूर युनिटने रशिनय बॅंकेकडून घेतलेल्या कर्जासाठी अदानीच्या प्रवर्तकाचा २४० लाख डाॅलरचा भाग गहाण ठेवला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांनी बाजार मूल्यात सुमारे १२५ डाॅलर अब्ज कमी झाली आहे. विनाेद अदानी यांच्याविषयी फाेर्ब्सने वेगवेगळे दावे केले आहेत. यानुसार विनाेद अदानी हे परदेशी भारतीय आहेत. ते दुबईत राहतात. अदानी समूहाशी संबंधित असल्याने ते मुख्य व्यवसायाशी संबंधित आहे. सिंगापूर आणि जकार्ता येथून…