- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Prashant Damle प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गाैरविण्यात आले आहे. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरूवारी संगीत अकादमी पुरस्काराचे वितरण झाले. नवी दिल्ली इथं पुरस्कार कार्यक्रम झाले. हा पुरस्कार स्वीकारताना प्रशांत दामले यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. प्रशांत दामले म्हणाले, “हा माझ्यासाठी खूप माेठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकार, माझे कुटुंबीय, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकार आणि फक्त महाराष्ट्राच नाही तर भारत नाही, तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे”.हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रशांत दामले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे. महाराष्ट्र, देशासह जगभरातल्या मराठी रसिकांकडून आणि कलाकारांकडून प्रशांत दामले यांचे काैतुक हाेत आहे.
Afzal Khan अहमदनगर शहरातील केडगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत अफझल खान वधाचा देखावा सादर केला. या जिवंत देखावा पाहण्यासाठी गर्दी झाली हाेती. डाॅ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले. या जिवंत देखाव्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली शिवकालीन वेशभूषा लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीत शिवाजी महाराजांची पालखी, घाेडे, लेझीम व ढाेल पथक आकर्षण ठरले. संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष दत्ताजी जगताप, नगरसेवक मनाेज काेतकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रसाद जमदाडे आणि केडगाव व्यापारी संकुलच्यावतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. केडगाव देवी मंदिर परिसरात मिरवणूक आल्यावर उत्साह वाढला हाेता. इथं जालिंदर…
Devendra Fadnavis राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी लाेणी (ता. राहाता) इथं राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या समाराेप कार्यक्रमाला हजेरी लावली. फडणवीस यांनी यावेळी मार्गदर्शन करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसूल कामकाजाला वेग देण्याचे आवाहन केलं. याशिवाय जलयुक्त शिवार, घरकुल आणि मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत ही कामे मिशन माेडवर राबवावित अशी अपेक्षा व्यक्त केली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याच्या शेतीला आठ हजार मेगावॅट वीज लागते. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे चार हजार मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. यामुळे…
Adani Group देशात अव्वल स्थानावर असलेल्या अदानी समूहाला हिंडेनबर्ग अहवालाचा जाेरदार झटका बसला. या झटक्यातून अदानी समूह अजूनही सावरलेला नाही. शेअर्स मार्केटमध्ये मूल्य घसले आहे. या अहवालामुळे गाैतम अदानी यांच्या संपत्तीवर गंभीर परिणाम झाला असून, संपत्ती वेगाने घटत आहेत. अदानींची एकूण संपत्ती आता ४२.७ अब्ज डाॅलरवर आली आहे. संपत्तीत वेगाने घट हाेत असल्याने जगातील २५ श्रीमंतांच्या यादीतूनही अदानी बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची २९ व्या स्थानावर घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी यांच्या संपत्ती तब्बल ७५ अब्ज डाॅलरची घट झाली आहे. यावर्षी त्यांची संपत्ती सुमारे ८० अब्ज डाॅलरने कमी झाली आहे. आता श्रीमंतांच्या यादीत उद्याेगपती अदानी यांच्यापुढे २८ जण…
Aditya Thakare देशासह राज्यातील राजकारण कधी काय घडेल, याचा नेम नाही. राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत, यावर अनेकदा प्रयत्न, चर्चा झाल्या. तसे प्रयत्न देखील झाले. परंतु परिस्थिती जैसे-थेच आहेत. यावर आता आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. एका वृत्तपत्र समूहाच्या पुरस्कार वितरण साेहळ्यात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच अमित आणि आदित्य ठाकरे एकत्र येतील असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला हाेता. आदित्य म्हणाले, “उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र यावे यावर बरिच चर्चा झाली आहे. प्रयत्न…
Athlete मोटीव मार्शल आर्टस फिटनेस अॅण्ड स्पोर्टस अंतर्गत शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या कराटे पंच प्रशिक्षण परीक्षेत शहरातील बारा खेळाडूंनी यश संपादन केले. पंच प्रशिक्षण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंचा सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व स्थायी समितीचे सदस्य सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.कराटे फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गौस शेख, पोलीस नाईक सचिन धोंडे, गणेश पाटील, राष्ट्रीय खेळाडू कपिल गायकवाड, राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू कोमल शिंदे, मनिषा निमोनकर, तायक्वांदोचे प्रशिक्षक अल्ताफ शेख, अकिब पठाण, सचिन कोतकर, नुर शेख, फिरोज शेख, मुहाफिज सय्यद आदी उपस्थित होते. अहमदनगरमधीलशोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर मोटीव मार्शल…
Eknath Shinde “अद्यावत तंत्रज्ञानाच्या जाेरावर राज्यातील महसूल विभागाचे बळकटीकरण करणार आहे. हा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करणार आहाेत. गेल्या सहा महिन्यात धडाकेबाज निर्णय घेणारे महसूल विभाग आहे”, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागातर्फे लाेणी (ता. राहाता) इथं आयाेजित करण्यात आलेल्या दाेन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील , महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महसूल विभाग गेल्या सहा महिन्यांपासून धडाकेबाज निर्णय…
America-Pakistan-China आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान कधीही दिवाळखाेरीत निघू शकताे. पाकिस्तानला या परिस्थितीचा फायदा चीन घेत आहे. नेहमी चीनचे गुणगान गाणारा पाकिस्तानला कर्ज देण्यास देखी चीन तयार नाही. एकप्रकारे चीन पाकिस्तानला कर्ज देण्यास टाळाटाळ करताे आहे. चीनने सध्या पाकिस्तानला ३० अब्ज डाॅलर्सचे कर्ज दिले आहे. हे कर्ज चीनच्या फायद्यासाठी असून, त्यातून सीपीईसी बनवत आहे. चीनच्या या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अमेरिकेने कठाेर भूमिका घेतली आहे. चीनने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. आयएमएफने कर्ज देण्यापूर्वी चीनकडून हमी मागितली हाेती. चीन ते टाळत हाेता. यातच पाकिस्तान माध्यमांनी दावा केली आहे की, चीनने पाकिस्तानला सातशे दशलक्ष डाॅलर्स देण्याचे मान्य केले आहे. पाकिस्तान आणि चायना डेव्हलपमेंट…
Maruti Suzuki भारतात कारसंदर्भात वेगवेगळ्या क्रेझ आहेत. कारमध्ये सात सीटर कारर्स देखील डिमांड आली आहे. सात सीटर कारच्या विक्रीत आणि निर्मितीत मारुती सुझुकी कंपनी आघाडीवर आहे. किआ माेटर्स, टाटा माेटर्स आणि महिंद्रासारख्या कंपन्यादेखील या मारुतीसाेबत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. आता कार उत्पादनात मारुती सुझुकी वेगळा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. मारुती सुझुकी आता नवीन एमपीव्ही कार लाॅंच करण्याच्या तयारीत आहेत. ही कार महागडी असणार आहे. मारुतीची कार ही एर्टिगा आणि टाेयाेगाच्या इनाेव्हाला टक्कर देणार असे सांगितले जात आहे. वाहन निर्मितीत कंपन्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सुझुकी आणि टाेयाेटा यांच्यातील कारारानुसार, दाेन्ही ऑटो मेकर्स त्यांचे वाहन प्लॅटफाॅर्म आणि तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर करतात. बलेनाे-ग्लांझा, विटारा-हायराईडर, ब्रेझा-अर्बन क्रूझर यांसारखी कार आलीकडे लाॅंच झालेल्या…
Electricity Price मुंबईतील तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून यात सहभागी झालेल्या २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती नाेंदवता येणार आहे. यानंतर एक एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर पाच वर्षांनी वीज दरनिश्चितीसाठी एक एप्रिल २०२० पासून झाली. दरनिश्चितीचा आढावा दर तीन वर्षांनी घेतला जाताे. त्यानुसार वीज कंपन्यांकडून नव्याने वीज दरासंदर्भात प्रस्ताव सादर केले जातात. यानुसार मुंबई शहर, उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पाॅवर आणि बेस्ट उपक्रम या तिन्ही वितरकांनी महाराष्ट्र वीज नियामक आयाेगाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावावर साेमवारी सुनावणी पूर्ण झाली असून, यावर आता हरकती नाेंदवता येणार आहेत. या प्रस्तावानुसार तिन्ही…