- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Nana Patole काॅंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाव्यावर आली आहे. काॅंग्रेसच्या २१ नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेत नाना पटाेले यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. राज्यातील काॅंग्रेसमधील अनेक नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या कामकाजावर नाराज आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत ही नाराजी नेत्यांनी जाहीर केली हाेती. त्यानंतर ती काॅंग्रेस हायकमांडपर्यंत गेली हाेती. पटाेले राज्यात स्वतः अजेंडा राबवित असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेश काॅंग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काॅंग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदिया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह २१ जणांनी निरीक्षक मरेश चिन्निथाला यांची भेट घेत पटाेले यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटाेले यांचे प्रदेशाध्यक्ष काढून ते आदिवासी नेते शिवाजी माेघे यांच्याकडे देण्याची…
E-Scooter बेंगळुरमधील इलेक्ट्रिक स्टार्ट-अप कंपनी रिव्हरने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर इंडी लॉन्च केली आहे. ही स्कूटर एका पूर्ण चार्जमध्ये 120 किलोमीटरपर्यंत (इको मोडवर) प्रवास करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची शाे-रूम किंमत 1.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.या ई-स्कूटरमध्ये 4 kWh क्षमतेच्या बॅटरी आहे. याशिवाय 6.7 kW पॉवरची इलेक्ट्रिक मोटर आहे. ही स्कूटर 3.9 सेकंदात 40 किमी/ताशीचा वेग पकडते. त्याची बॅटरी 5 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते. इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्ज केल्यावर 120 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे. इंडी ई-स्कूटरला तीन रायडिंग मोड्स इको, राइड आणि रश आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इंडी ई-स्कूटर एकूण 55-लीटर स्पेस…
ChatGPT-WhatsApp ChatGPT चे फायद्यांबद्दल राेज नवीन खुलासे समाेर येत आहेत. त्यामुळे ChatGPT विषयी उत्सुकता वाढू लागली आहे. प्रत्येक प्रश्नांचा उत्तर देत असलेले ChatGPT हे व्हॉट्सअॅप देखील चालवू शकते. हे AI टूल WhatsApp मध्ये घेतल्यास येणाऱ्या WhatsApp मेसेजला ते उत्तर देऊ शकते. डॅनियल ग्रॉस नावाच्या एका संशाेधकाने पायथन स्क्रिप्ट शेअर केली आहे. त्यानुसार चॅटजीपीटी व्हॉट्सअॅपमध्ये अगदी सहजतेने डाऊनलाेड केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला भाषा ग्रंथालयाची आवश्यकता असेल. https://github.com/danielgross/whatsapp-gpt येथे लिंक सापडेल.WhatsApp मध्ये ChatGPT डाऊनलाेड करताना प्रथम भाषा लायब्ररी पृष्ठ उघडावे लागेल. यानंतर, तुम्हाला Download Zip वर टॅप करावे लागेल. आता Whatsapp-gpt-main फाईल डाउनलोड होईल. ही फाईल उघडा आणि टर्मिनलमध्ये server.py फाइल कार्यान्वित करावी लागेल. यानंतर ‘ls’ टाइप करा…
Job Update संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने सेंटर फॉर एअर बोर्न सिस्टम्स (CABS) अंतर्गत JRF (DRDO रिक्रूटमेंट 2023) च्या पदांवर भरती सुरू केली आहे. DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती (DRDO रिक्रूटमेंट 2023) मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये 18 पदे भरली जाणार आहेत. अर्ज पुढील 21 दिवसांपर्यंत करता येईल. रिक्त जागा तपशीलएरोनॉटिकल अभियांत्रिकी : 1 पदसंगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी : 10 पदेइलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी : 7 पदे पात्रता ः पदवी आणि पदव्युत्तरस्तरावर वरील विषयांमध्ये वैध GATE स्कोअरसह प्रथम श्रेणीत BE/B.Tech किंवा ME/M.Tech असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 2021 चा फक्त GATE स्कोअर आणि 2022 चा GATE स्कोअर…
Russia-Ukraine War जग आजही दाेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे चिंतेत आहे. ते म्हणजे, रशिया-युक्रेनमधील युद्ध! या दाेन्ही देशांमधील युद्धाला आज वर्ष पूर्ण हाेत आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला रशियन सैनिकांनी युक्रेनवर तिन्ही बाजूंनी जाेरदार हल्ला चढवला हाेता. वर्ष झाले, तरी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लाेकांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ लाख नागरीक बेघर झाले आहेत. या युद्धात सर्वाधिक नुकसान झाले आहे, ते म्हणजे रशियाचे. या वर्षात नऊ ट्रिलियन डाॅलर्सचे रशियाचे नुकसान झाले आहे. रशियाचे तीनशे लढाऊ विमाने, ६ हजार ३०० हून अधिक सशस्त्र वाहने नष्ट झाली आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार १ लाख ३० हजारून अधिक…
Heat फेब्रुवारी महिन्यातील वातावरणातील बदलाचा जनजीवनावर विपरीत परिणाम हाेऊ लागले आहे. दिवसा उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पुढच्या काही दिवसांत या झळा अधिक तीव्र हाेण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान हे ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर गेले आहेत. उत्तरेतील काही जिल्ह्यांमध्ये दिवसा तीव्र ऊन, तर रात्री थंडी जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ऊन तीव्र हाेत चालले आहे. उत्तर महाराष्ट्रात रात्रीपासून ते पहाटेपर्यंत गारवा जाणवताे आहे. गेल्या २४ तासांमध्ये अकाेला इथं देशातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नाेंद झाली. विदर्भातील वाशिम, वर्धा, मराठवाड्यातील नांदेड, दक्षिण मध्य-महाराष्ट्रातील साेलापूर इथं ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये कमाल…
Udhav Thakare भाजप नेते किरीट साेमय्या पाठपुरावा करत असलेले मुरूड तालुक्यातील काेर्लई येथील जमीन खरेदी प्रकरणात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ठाकरे कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता आहे. किरीट साेमय्या यांनी ट्विट करत ठाकरे कुटुंबियांना या १९ बंगल्याचा हिशाेब द्यावाच लागेल, असे म्हटले आहे. रेवदंडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. मुरुडचे ग्रामविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी तक्रार दिली आहे. ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पाेलिस निरीक्षक देविदास मुपडे तपास करत…
Accident पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं भीषण अपघात झाला आहे. या लातूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारने तीन पटल्या घेतल्या. यात संदीप राजाभाऊ माळी (वय ३५), बालाजी केरबा तिडके (वय ४८) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (वय ६१) या तिघांचा मृत्यू झाला. चंद्रकांत रामकिशन गवळी (वय ५४) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-साेलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. कारचा वेग खूप हाेता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. चालकाचे कारवरील ताबा सुटला आणि तिने तीन पटल्या खाल्या. यात कारचा चुरा झाला आहे. कारचा पत्रा मृतांच्या अंगात शिरले हाेते. कारच्या दर्शनी भाग आत शिरला हाेता.
India जगात सर्वात वाईट ड्रायव्हिंग थायलंडमधील लाेक करत असल्याचे अहवाल पुढे आला आहे. Uber ने राइडिंग विथ इंटरसिटीचा वार्षिक प्रवास अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 50 देशांमध्ये परीक्षण करण्यात आले आहे. यात सर्वात वाईट चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत भारताचा क्रमांक देखील आहे. Uber वार्षिक प्रवास निर्देशांकाच्या अहवालानुसार, जगात कुठेही सर्वोत्तम ड्रायव्हिंग असेल तर ते जपानमध्ये. चांगल्या ड्रायव्हिंगच्या बाबतीत नेदरलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे नॉर्वेला तिसरे, एस्टोनियाला चौथे आणि स्वीडनला पाचवे स्थान मिळाले आहे.या अहवालानुसार, जगातील सर्वात वाईट ड्रायव्हिंग थायलंडमध्ये होते. तिथे सर्वात वाईट ड्रायव्हर्स आहेत. 50 देशांमध्ये सर्वात वाईट रहदारीच्या बाबतीत थायलंड पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत पेरूला…
Rashtrawadi-Manse राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. पक्षातंर्गत कुरघाेड्यांमुळे पक्षांचे प्रमुख, नेत्यांची डाेकेदुखी वाढली आहे. शिवसेनेतील बंडाळीने संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काॅंग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आता राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांवरून पक्षातंर्गत राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला. यादिवशी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. यानंतर लगेच पक्षाचे नेते तथा विराेधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. हा कलह सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत बॅनर झळकले आहेत. यावरून पक्षातील वाद पुन्हा उफळला आहे. यात मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टाेलेबाजी केली आहे. ही टाेलेबाजी लक्ष वेधून घेणार आहे. यात आमदार राेहित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. गजानन…