- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
PM Suryaghar Free Power Scheme ः सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाठविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे. यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे…
Ayushman Health Card and PPE Kit ः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मागासवर्गीय लाभार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून दिल्ली येथून संवाद साधला. तत्पूर्वी, प्रातिनिधीक स्वरूपात देशातील चार लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत, त्यांना मिळालेल्या केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभाविषयी प्रधानमंत्री यांनी माहिती जाणून घेतली. यामध्ये पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील तरूण नव-उद्योजक नरेश अवचर यांचा समावेश होता. प्रधानमंत्री यांनी नरेश अवचर यांच्या स्टार्ट-अप विषयी यावेळी माहिती जाणून घेतली. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील वंचित मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सवलतीचे व्यावसायिक व शैक्षणिक कर्ज, आयुष्यमान कार्ड व सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. खासदार डॉ. सुजय…
Nagar Political : लोकसभा निवडणुकीमुळे भाजप २४ तास करण्याच्या मूडमध्ये आहे. संघटन बळकटीकरणावर भाजप भर देताना दिसतो आहे. यातूनच भाजपने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावर निमंत्रित सदस्यांना जिल्ह्यातून घेण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील पाच जणांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी नावे जाहीर केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर शहरातील पाच कार्यकर्त्यांची प्रदेश कार्यकारणीत निमंत्रित सदस्यपदी एकाचवेळी नियुक्ती केली आहे. एकाचवेळी नगर शहरातील पाच कार्यकर्त्यांची प्रदेश कार्यकारणीत नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भिंगार शहरातील कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वंसत राठोड, माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष संतोष गांधी, माजी स्थायी समिती सभपती नरेंद्र कुलकर्णी,…
Nagar News : नगर अर्बन बॅंकेचा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास चांगला गाजत आहे. दाखल गुन्ह्यात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. नगर अर्बन बॅंक बचाव कृती समिती गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. यातच बॅंकेच्या गैरव्यवहाराची समाज माध्यमांवर व्हायरल झालेली पोस्ट आणि त्याखालील कमेंट चर्चेत आल्या आहेत. बॅंकेच माजी संचालक तथा बॅंक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांची पोस्ट आहे. ही पोस्ट व्हायरल होण्याबरोबर बॅंक अडचणीत आणणाऱ्यांना चिंतन करायला देखील लावणारी आहे. ज्या बँकेत, अरे दोन लाख कशाला पाहिजेत? एक लाखात काम चालेल तुझे… कशाला जास्त व्याज भरतो..?, असे संचालक व पदाधिकारी सांगायचे. तीच बँक दुर्दैवाने 2014 पासून एक भ्रष्टाचारी चेअरमन…
Ahmednagar Political : अहमदनगर शहराचे नाव ‘पु्ण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा विषय राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला आहे. या नामांतराला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याचवेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नामांतरात महत्त्वाची भूमिका आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे आणि आमदार दत्ता भरणे यांनी केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक होती. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराचा विषय घेण्याची विनंती केली. यानुसार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी या बैठकीत…
Nagar News ः नगर महापालिका आयुक्त डाॅ. पंकज जावळे हे वसुलीसाठी चांगले अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. चार प्रभाग अधिकारी आणि 60 वसुली कर्मचारी यांचे वेतन थांबवण्याचा आदेश देत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्त जावळे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मार्च अखेर असल्याने महापालिका प्रशासन थकीत मलमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आग्रही आहे. नगर महापालिकेचे शहरात चार प्रभाग आहे. त्याला स्वतंत्र प्रभाग अधिकारी आहे. या प्रभाग अधिकाऱ्यांना आयु्क्तांनी वसुलीचे टार्गेट दिले आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेण्याची मुभा देखील दिली आहे. चारही प्रभाग अधिकाऱ्यांसह 60 कर्मचारी वसुलीसाठी मैदानात आहेत. यानुसार थकीत कर वसुलीसाठी अधिकारी आणि पथक…
Political News ः अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ होण्यासाठी धनगर समाजाचे नेते आमदार दत्ता भरणे सरसावले आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामकरणाचा विषय घेऊन त्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप, आमदार नितीन पवार, सुरेश बनसोडे यावेळी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण व्हावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नामांतरणाच्या मुद्यावर आक्रमक आंदोलन केले आहे. अंबिकानगर हे नाव ‘मनविसे’ने लावून धरले होते. ‘मनविसे’चे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगर शहरातील प्रमुख कायनेटिक चौकात अंबिकानगर नामांतराचा फलक देखील झळकवला…
Nagar News : महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार असून, त्याच्या मंजुरीसाठी कायदामंत्री व मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. नगर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांच्याकडे महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. यावेळी ॲड. महेश शिंदे, सुहासराव सोनवणे, पोपटराव बनकर, रावसाहेब मगर, बाबू काकडे आदी उपस्थित होते. राहुरी येथे घडलेल्या ॲड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा आढाव यांचे अपहरण करून करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा मंत्री रामदास आठवले यांनी निषेध व्यक्त केला. ॲड. महेश…
TDF teachers meet ः शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चा जिल्हा उद्बोधन मेळावा तब्बल २२ वर्षानंतर नगर शहरात पार पडला. टीडीएफ नेत्या लता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात सर्व शिक्षकांसमोर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. टीडीएफ जिल्हाध्यक्षपदी एम.एस. लगड, सचिवपदी मुस्ताक सय्यद तर शहर जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब वांढेकर, शहर सचिवपदी तौसिफ शेख व शहर उपाध्यक्षपदी वैभव सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली. टीडीएफचा शिक्षक मेळावा गेल्या २२ वर्षात कधीही झाला नसल्याची खंत अनेक शिक्षकांनी मेळाव्यात व्यक्त केली. राज्य व जिल्हा कार्यकारिणीची निवड लोकशाहीपद्धतीने झाली नसून, यापूर्वी सर्व निवडी बंद खोलीतच करण्यात आल्याचा रोष व्यक्त केला. बैठकीत लोकशाहीपद्धतीने शिक्षक लोकशाही आघाडीची कार्यकारिणीची निवड…
PM Suryaghar Free Power Scheme ः घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. दीपक कुमठेकर म्हणाले, “वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये…