- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Onion Market News ः कर्जत तालुक्यातील आंबीजळगावचे कांदा व्यापारी शब्बीर शेख समाज माध्यमांवरील त्यांच्या व्यापाराविषयी केलेल्या चुकीच्या एका पोस्टमुळे हैराण झाले आहेत. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मला आणि माझ्या व्यापाराला बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. माझ्याविरोधात ज्यांनी हा प्रकार केला आहे. कट रचला आहे, त्यांच्याविरोधात न्यायालयात निश्चित उत्तर देईल, असे शब्बीर शेख यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. आम्ही जवळपास सहा वर्ष झाले, आमच्या शेतातील कांदा व्यापारी शब्बीर शेख यांना देत आलो आहे. आजतागायतपर्यंत आमच्या वजनात काडीमात्र फरक पडला नाही. किंवा व्यवहारात अडचण देखील आली नाही. कोणी ही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.…
Ahmednagar College News ः चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सांघिक विजेतेपद मिळविले आहे. विजेत्या संघात साजरी परदेशी हीचा समावेश होता. नगरची खेळाडू असलेल्या साजरी परदेशी हिला या खेळात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. अपेक्स विद्यापीठ , क्रिसेंट विद्यापीठ, एमडीयू विद्यापीठ , कॉलीकट विद्यापीठ, राजस्थान, रोहटक, केरळ या संघांचा पराभव करीत पुणे विद्यापीठाने प्रथम क्रमांकाचा चषक पटकाविला. साजरी परदेशी हिला तिने दिलेल्या संघातील योगदानाबद्दल व उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुवर्णपदकाने गौरविण्यात आले . कॉर्फबॉल मुले व मुली एकत्रित असणाऱ्या खेळामध्ये साजरीने सर्व मॅचेसमध्ये लक्षवेधक कामगिरी करून नवोदित खेळाडू म्हणून मान मिळविला. साजरी ही नगर कॉलेजची…
Crime News ः बदलत्या हवामानाचा अंदाज घेण्यासाठी राज्य सरकारने पाथर्डीतील तिसगाव येथे स्वयंचलीत उपकरणे बसवली होती. या उपकरणांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनीचे सागर पवार यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली आहे. पवार यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनी हवामानाच्या नोंदी मिळवण्यासाठी स्वयंचलीत उपकरण किट बसवते. तिसगाव (ता. पाथर्डी) येथे देखील हवामान केंद्रावर स्वयंचलीत उपकरण बसवले होते. या स्वयंचलीत यंत्राद्वारे हवामानाची माहिती तालुका कृषी कार्यालय,जिल्हा कृषी कार्यालय,तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांना माहिती प्राप्त होते. पाथर्डी तालुक्यात तिसगाव, मिरी, कोरडगाव, टाकळीमानुर, माणिकदौंडी, पाथर्डी येथील प्रत्येक…
Nagar News : रिझर्व्ह बॅंकेने नगर अर्बन बॅंकेचा रद्द केलेला परवानाच्या निर्णयाविरोधात केंद्रीय अर्थ मंत्रालयात करण्यात आलेले अपिलावर निर्णय समोर आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नगर अर्बन बॅंकेच्या परवान्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बॅंकेने केलेले अपील फेटाळले आहे. यामुळे बॅंक पुन्हा उर्जित अवस्थेत आणण्याच्या हालचाली मावळल्याने बॅंक अधिकारी, कर्मचारी आणि ठेवीदारांमध्ये अस्वस्थता बसली आहे. तसेच ज्या गैरव्यवहारामुळे बॅंक अडचणीत आली. त्या गैरव्यवहारात अटकेत असलेल्या तिघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. नगर अर्बन बॅंकेचा २५१ कोटी २५ लाख रुपयांच्या घोटाळा सध्या गाजत आहेत. या प्रकरणात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. गुन्ह्यात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.…
Pundalik Maharaj Jungle Shastr ः वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक व वैचारिक बैठकीमुळे आपली भारतीय संस्कृती आजही ताठ मानेने जगात टिकून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. परम पूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्ञानेश योग आश्रम डोंगरगणच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी दूरदृश्य प्रणाली द्वारे ते बोलत होते. परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नगर जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, जंगले महाराज…
Rahuri News ः मोटारसायकल खरेदी विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची, असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा तसाच मोटारसायकल घेऊन पसार झाला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील डॅनियल शेंडगे (वय ५०) हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहतात. त्यांचे राहुरी फॅक्टरी कारखान्याच्या पंपासमोर साई अँटो नावाने गाड्या खरेदी विक्री व सर्व्हिसिग गॅरेज आहे. सुनील शेंडगे यांच्या साई अँटो गॅरेज तेथे एक अनोळखी भामटा त्याच्या ताब्यातील मोपेड वाहन घेऊन आला. सुनील शेंडगे यांना त्याने मोमीन आखाडा येथून आल्याचे सांगितले. मला गाडी घ्यावयाची आहे. तुमच्याकडची मोटारसायकल मला आवडली आहे. मी चक्कर…
Ahmednagar Politics ः आमदार नीलेश लंके यांनी आज पुणे येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात येत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि आमदार नीलेश लंके यांची संयुक्त झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही बाजूने प्रवेशाची आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची स्पष्टता झाली नाही. त्यामुळे आमदार लंकेची विचारधारा स्पष्ट झाली असली, तरी भूमिकेविषयी गोंधळ कायम राहिला. शरद पवार आणि नीलेश लंके या दोघांनी मिळून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह विरोधकांना पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकले आहे. आमदार लंके मुंबईत की दिल्लीत दिसणार? शरद पवार म्हणाले… आमदार नीलेश लंके यांना सुरूवातीला बोलून दिल्यानंतर शरद पवार म्हणाले, पारनेरमध्ये लढण्यासाठी आणखी काही सहकारी…
Amrit Mahaavas Mission Award ः विभाग आणि राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत सन 2020-21, 2022-23 कालावधीत अत्युकृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी ‘अमृत महाआवास अभियान’तही चांगले काम करुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांचा सन्मान राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘अमृत महा आवास अभियान’व ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
Chat-bot service ः महावितरणच्या वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीज जोडणी अशा विविध कामांसाठी मदत करणाऱ्या ऊर्जा या चॅट-बॉटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे केले. महावितरणने आपल्या तीन कोटी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्ससारख्या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्राहकांना भरवशाचा, दर्जेदार आणि पुरेसा वीज पुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे…
Green Energy from Mahavitran ः राज्यातील वाढती कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने बुधवारी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले. वीज खरेदीचा दर माफक असल्याने वीज खरेदी खर्चात बचत होणे अपेक्षित असून त्यामुळे विजेचा दर मर्यादित ठेवण्यास मदत होईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.…