- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Nagar Political News ः नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये काम केले असून, टप्प्याटप्प्याने विकासाच्या योजना मार्गी लावले आहे. खासदार सुजय विखे आणि महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर झाला आहे. नियोजनबद्ध आणि दर्जेदार कामे मार्गी लावणे हे आमचे कर्तव्य आहे. निधी कागदावर न ठेवता नागरिकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष प्रभागातील कामे मार्गी लावत असल्याचा आनंद माजी नगरसेविका आशा कराळे यांनी केले. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथील साधना हाउसिंग सोसायटीमध्ये माजी नगरसेविका आशा कराळे यांच्या पाठपुराव्यातून व खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी नगरसेविका आशाताई कराळे, माजी नगरसेवक मनोज दुल्लम,…
Nagar Political News ः “राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये नागरिकांचा अक्षरशा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाजातील विविध प्रश्नांवर काम करत आहे. राजकारणाला समाजकारणाचा जोड असला पाहिजे या संकल्पनेतून राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा हे नेहमीच जनभावनेचे उपक्रम हाती घेऊन राबवीत असतात. त्यानिमित्त मनसे आरोग्य आधार योजनेचा शुभारंभ संपन्न झाला आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत मिळेल त्यांचे समाजाप्रती सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अखिल चित्रे यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या…
Nagar Political News ः केडगाव उपनगराचा आम्ही सर्वजण मिळून एक विचाराने विकासाची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहेत. या कामासाठी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले. आता केडगावमधील 110 रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला असून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी चांगले काम केले आहे. नागरिकांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते. या माध्यमातून काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले. केडगावमधील ताराबाग कॉलनी येथे माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून व खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते…
Nagar Political News ः सरकारी योजना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत घेऊन जाण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. सिद्धार्थनगर आणि गवळीवाडा परिसरातील अंतर्गत कॉलनीतील रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या कामासाठी खासदार विखेंकडे तातडीचा निधी मागितला आणि तो त्यांनी उपलब्ध करून दिला. गवळीवाडा परिसर स्वच्छ झाला असून नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तसेच सिद्धार्थनगरमधील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी खासदार सुजय विखे यांनी केलेल्या कामाचे स्वागत केल्याचा आनंद माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला. सिद्धार्थनगर आणि गवळीवाडा येथे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या पाठपुराव्यातून आणि…
Nagar Farmer News ः श्रीरामपूर तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या आकारी पडित संघर्ष समितीच्या उपोषणाचा आज सात दिवस झाले. या प्रकरणी तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. उपोषणकर्त्यांमधील तिघांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावलेल्या आंदोलनकर्त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याची प्रशासनाकडून तयारी झाली. मात्र उपोषण करत असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच उपचार द्या. आम्ही येथून लेखी आश्वासन घेतल्याशिवाय हलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आकारी पडित संघर्ष समितीच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. आंदोलनातील शेतकरी बाळासाहेब आसणे, ऍड. सर्जेराव घोडे आणि शालन झुरळे यांची आज प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ शेवंते यांनी सल्ला दिला आहे.…
MLA Jitendra Awad ः मुंबईतील मुंब्रा येथे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना निळा पंचा घालत असताना फेकून देण्यात आला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे आणि महिला अध्यक्ष साधना बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात अंकुश मोहिते, राष्ट्रवादी युवकचे वैभव ढाकणे, समीर भिंगारदिवे, सुभाष वाघमारे, सागर विधाते, विशाल बेलपवार, वीर चव्हाण, बाबा कदम, ऋषी विधाते, ओम भिंगारदिवे, आनंद…
Crime News ः संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच चोऱ्या, मारामाऱ्या, अवैध धंदे याबाबत चर्चेत राहिले आहे. गुरुवारी रात्री मांडवे बुद्रुक येथील शेतातील विहिरीच्या जवळील कोपीमध्ये गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी अशोक खेमनर याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवे बुद्रुक शिवारातील अनिल काढणे याच्या शेतीमधील विहिरी जवळच्या कोपीमध्ये गावठी बनावटीचे पांढरे धातूचे पिस्तुल आढळले. या पिस्तुलाच्या दोन्ही बाजूला काळसर रंगाची प्लास्टिकची मूठ बसवलेली आहे. या पिस्तुलाची किंमत 20 हजार रुपये आहे. तसेच 1500 रुपये किमतीचे एक पांढरे धातूची मॅक्झिन आणि त्यात पाच जिवंत काडतुसे सापडले आहे. या जिवंत काडतुसाच्या…
Shrirampur News समाज माध्यमांवरून मैत्री करणे अल्पवयीन मुलीला महागात पडले आहे. पीडित मुलीशी ओळख वाढवून शाळा आणि शाळा परिसरात भेट घेऊ लागला. यानंतर तिच्याबरोबर फोटो काढले. मुलीचा पाठलाग सुरू केला. यानंतर तु मला खूप आवडतेस, असे बोलून गैरवर्तन केले. मुलीबरोबरचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यश हरिभाऊ चौधरी (वय २१, रा. चौधरी वस्ती, जळगाव, ता. राहाता) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. अल्पवयीन पीडितेची गंभीर स्वरुपाची तक्रारी होती. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी याची दखल घेत आरोपीचा शोध घेण्याच्या गुन्हे पथकाला सूचना केल्या. यश हा घरी असून, तो पसार होण्याच्या तयारी होता. गुन्हे पथकाने…
Supreme Court Judgment ः सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत, अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. 19 लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- INCP ने अशी भीती व्यक्त केली की, 2016-19 दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 19 लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 मध्ये फेरफार करण्यासाठी केला गेला असता. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 61(A) बाजूला सारुन बॅलेट पेपर वापरून निवडणुका…
MNS opposition to toll collection ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या संघटनेचे टोल नाक्याशी किती वाकडे आहे, हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे मनसे सैनिक नेहमीच टोल नाक्यावरून आक्रमक असतात. संगमनेरमधील पुणे-नाशिक हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मनसेने आज खळखट्याक करत नाक्यावर स्थानिकांकडून वसुलीसाठी लावण्यात आलेले फलक फाडण्यात आले. मनसे सैनिकांनी केलेल्या याखळखट्याकमुळे नाक्यावर पळापळा होऊन गोंधळ उडाला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ६०) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाका आहे. हा टोल सुरू झाल्यापासून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टोलनाका प्रशासनाने स्थानिक वाहन धारकांकडून किमान ५० टक्के टोल आकारणीचा निर्णय घेतला. तसेच स्थानिकांना टोल क्राॅस करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय…