- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
Author: Kharee Gosht
Ahmednagar News ः देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 16 मार्चला जाहीर झाला. यानुसार निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. प्रशासकीय पातळीवर आचारसंहितेसह मतदान आणि मतमोजणीपर्यंतच्या सर्वच कामाला लागले आहे. नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेशा जारी केले आहे. निवडणूक आयोगानुसार शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होईल. यासाठी या दोन्ही मतदारसंघात सहा जूनपर्यंत आचारसंहिता लागू राहिल. निवडणूक आयोगास भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 324 खाली प्रदान केलेले अधिकाराचा वापर करत आहे.…
Crime News ः महिलेचा विनयभंगप्रकरणी तलाठी संदीप नवनाथ नेहरकर याला राहुरी न्यायालयाने २१ महिने कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश ए. एस. वाडकर यांनी हा निकाल दिला आहे. सरकारी अभियोक्ता आर. के. गागरे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथे १९ आॅगस्टला हा प्रकार घडला होता. तलाठी संदीप नवनाथ नेहरकर याच्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली होती. पोलीस नाईक प्रवीण खंडागळे यांनी तपास करून गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. यानंतर गुन्ह्याचा खटला राहुरी येथील न्यायालयातील न्यायाधीश ए. एस. वाडकर यांच्या समोर चालला. सरकारी अभियोक्ता आर. के. गागरे यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले. सरकार…
Crime News ः नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांनीवर अत्याचार आणि त्यानंतर तिच्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या घटनेतील तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसून, वेगाने तपास करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून पाहाता आले आहे की, शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून किंवा फुस लावून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना घडतात. संगमनेरमधील घटना देखील अशीच काहीशी आहे. उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याशी घटनेवर तपशीलवार चर्चा झाली आहे”. या घटनेमध्ये दोषारोपपजत्र योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावे आणि आरोपींवर कडक शिक्षा लागेल, अशी कारवाईच्या सुचना केल्या आहेत.…
Change in teacher set approval ः शालेय स्तरावर शिक्षक नेमणुकी करीता प्रत्येक वर्षी शाळांची संच मान्यता करून पदे निश्चित केली जातात. 2014 पासून मात्र निकषात बदल होऊन तुकडीवर आधारीत शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संच मान्यता होऊ लागल्या. 2015 पासून शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून 6 ते 8 या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आल्याने कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला. त्यामुळे 2019 च्या शिक्षक भरतीत 0.01 टक्केच शारीरिक शिक्षकांची पर भरती होऊ शकली. चालू भरतीत देखील 36 जागांच्या आसपास उच्च माध्यमिकपर्यंतच्या अतिशय नगण्य जागेची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र सरकारने नुकत्याच निर्गमित केलेल्या…
Ahmednagar corporation news : नगर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंपहाउस, सबस्टेशन आणि मुख्य जलवाहिनी ठिकाणची महत्वाची दुरुस्ती होणार आहे. या कामासाठी नगर महापालिकेकडून बुधवार (ता. २०) सकाळी ११.०० वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. दरम्यान या काळात मुळानगर, विळद येवून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. यामुळे नगर शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. परिणामी नगर शहरातील पाणीपुरवठा हा विस्कळीत राहणार आहे. नगर शहरातील उपनगर बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहररोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच बुरूडगाव रोड, सारसनगर, कोठी, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागाला बुधवार (ता. २०) सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास…
Religious News ः नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार कुठल्याही परिस्थितीत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेले संत शेख महंमद महाराज मंदिर हे प्रति शिर्डी म्हणून जगभरात नावारूपास येईल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला. श्री संत शेख महंमद महाराज यांच्या ३२६ व्या संजीवन समाधी सोहळा व यात्रानिमित्त आयोजित श्री तुकाराम गाथा आणि योगसंग्राम ग्रंथ पारायण सोहळा सप्ताहाच्या सांगता झाली. संत शेख महंमद महाराजांचा यात्रा उत्सव बुधवार (ता. २०) होणार आहे. यात्रेसाठी नगर जिल्ह्यासह राज्यातील भाविक मोठी गर्दी करतात. यानिमित्ताने ११ मार्चपासून श्री तुकाराम गाथा आणि योगसंग्राम…
Nagar Sport News ः नगर येथे २१ मार्चपासून होणाऱ्या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कबड्डीमॅटचे मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. सुमारे ३० हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी प्रेक्षा गॅलरी उभारण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी नगर शहरावर आहे. देशभरातील ८०० खेळाडू नगरमध्ये येणार आहेत. वेगवेगळ्या प्रांतातून ३२ संघ नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांचे आदरातिथ्य आपल्याला करायचे आहे. राज्य स्तरीय स्पर्धा यशस्वी पणे आयोजन करण्याचा अनुभव आमच्याकडे आहे त्यामुळे मागीलवेळी राहिलेल्या सर्व त्रुटी भरून काढून उत्कृष्ठ पणे नियोजन केले जाईल असे आश्वासन त्यांनी…
Nagar Political News : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिली नाही. शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक असून किमान आता तरी संख्येने सर्वात जास्त असलेल्या बौद्ध समाजाला संधी मिळावी ही समाजाची भावना आहे. अन्यथा त्याचा परिणाम शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभेवर सुद्धा होणार असून मतदानावर बौद्ध समाज दोन्ही मतदार संघात बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे समाजाच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला आहे. रिपाईच्या कवाडे गटाचे सुमेध गायकवाड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड, काँग्रेसचे सुनील शेत्रे, आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे, भीमशक्ती संजय जगताप, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे…
Rahuri News : “अलीकडच्या काळात बेकरी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात होणार्या बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षणामुळे बेकरी व्यवसायाला चालणा मिळणार असून यामुळे गावपातळीवर आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे. बचत गटाशी संबंधीत महिला तसेच ग्रामीण भागातील तरुणांनी या बेकरी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेवून स्वतःचा उद्योग उभारल्यास विद्यापीठासाठी भुषणावह ठरेल”, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने 18 ते 22 मार्चमध्ये बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनील गोरंटीवार बोलत होते. यावेळी अधिष्ठाता…
Nagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाही केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक विषयक आदर्शआचार संहिता लागू झाली आहे. पुढे 6 जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. तरी निवडणूकी संबंधित सर्व यंत्रणेने आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पुर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात बैठक घेण्यात आली या वेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त…