Author: Kharee Gosht

Nagar Merchants Bank Salary Hike : नगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व नगर मर्चंट्स-को ऑपरेटिव्ह बँक यांच्यात शुक्रवारी (दि.22 मार्च) करार होऊन, बँक कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ देण्यात आली आहे. हा वेतनवाढीचा करार 1 एप्रिल 2023 पासून पुढील 5 वर्षाकरीता करण्यात आलेला आहे. वेतनवाढीच्या करारावर युनियनतर्फे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, सहसचिव नितीन भंडारी, खजिनदार एम. वाय. कुलकर्णी, कर्मचारी संचालक प्रसाद गांधी, जितेंद्र बोरा यांनी तर बँक व्यवस्थापनातर्फे चेअरमन हस्तीमलजी मुनोत, व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक सीए अजय मुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पुराणिक यांनी सह्या केल्या. या करारान्वये बँक व्यवस्थापनावर वार्षिक 45 लाखाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यामध्ये अतिरिक्त वेतनवाढ,…

Read More

Maratha Reservation ः मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सज्ज झाले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून चारशेवर जणांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील उद्या शनिवारी (23 मार्च) सकाळी 10 वाजता वांबोरीमध्ये (ता. राहुरी) व दुपारी 12 वाजता पारनेरला बैठक घेणार असून, यात याबाबत निर्णय होणार आहे. सगेसोयरे निर्णयाच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण मागणीसाठी मागील सहा-सात महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलने करीत आहेत. मात्र, आता लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने हा विषय राजकारण्यांनी बाजूला टाकल्यासारखा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत लोकसभा निवडणूक होऊ नये यासाठी सकल मराठा समाज आक्रमक भूमिकेत आला…

Read More

Ahmednagar Police ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (एलसीबी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काल, गुरूवारी सायंकाळी नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून 72 लाखाची रोकड पकडली. ही रोकड हवाल्याची असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पोलीस दलाकडून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्नीशस्त्रे यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीसह स्थानिक पोलिसांना नाकाबंदी, गस्त वाढविण्याची आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला माध्यमातून पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने पोलीस दल अलर्ट…

Read More

State Teachers Council ः शिक्षण व्यवस्थेतील अन्यायकारक संच मान्यतेचा सरकार निर्णय दुरुस्त करावा. ड्रेस कोडबाबतचा सरकारने निर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिर्लेकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती यांनी निवेदन देत लक्ष वेधल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. सर्व निकषांचा विचार केल्यास सन 2024-25 पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण झटकेसरशी खाली येणार आहे आणि ते प्रमाण टिकवणे देखील अवघड असणार आहे. शिक्षकांच्या दृष्टीने ही एक धोक्याची घंटा आहे. दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर त्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या…

Read More

Prohibitory order of Collector Siddharam Salimath ः लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1), (3) नुसार जिल्ह्यात 20 मार्च ते दोन एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई असणार आहे. तसेच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक…

Read More

CSRD Social Work and Research Institute ः जागतिक समाजकार्य दिनाचे औचित्य साधून सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या माध्यमातून लोकाभिमुख समाज विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील २५ हून अधिक गावांमध्ये तसेच विविध सामाजिक संस्था,सेवा वस्ती याठिकाणी विविध उपक्रम राबविल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली. या दृष्टिकोनातून समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समन्वय समितीच्या बैठकीला डॉ. सुरेश मुगुटमल, प्रदीप जारे, सॅम्युअल वाघमारे, नाजीम बागवान, श्रीकांत तलोकार यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. समाजकार्याचे राष्ट्रीय संघटन (नॅशनल असोशीएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क्रर्स इन इंडिया) यांचा सहयोगाने १९…

Read More

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ः जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासक या ठिकाणी लागू आहे. या निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केल्याचा, घणाघात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केला. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन्ही ठिकाणी प्रशासक राज सुरु आहे. याच्या निषेधार्थ दुसरे वर्षश्राद्ध घालत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्ले बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट निमसे, गणेश वायसे, जिवाजी लगड आदी उपस्थित होते. संदेश कार्ले म्हणाले, “दोन वर्षांपासून निवडणुका…

Read More

The theft of the teacher’s jewellery ः एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला शिक्षकाच्या पर्समधील ठेवलेले सोन्या व चांदीचे दागिने चोरीची घटना घडली आहे. पाथर्डीच्या शिरूर कासार येथील महिला शिक्षिका सुरेखा रामराव बडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. सव्वा तीन लाख रुपयाचा ऐवज चोरी गेला आहे. शिक्षिका सुरेखा बडे या बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षिका म्हणून करत आहेत. शिरूर कासार (ता. पाथर्डी) या ठिकाणाहून पाथर्डीला एसटी बसणे येत होत्या. बसमध्ये गर्दी होती. सुरेखा बडे यांना बसमध्ये मागील सिटावर जागा मिळाली. सुरेखा बडे व त्यांचे नातेवाईक हे बसमध्ये मागील सिटवर बसले. सुरेखा यांच्या आई पुष्पा…

Read More

New Arts College : नगर शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयामध्ये मंगळवारी (19 मार्च) दुपारी सव्वाचारच्या सुमारास एका युवतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून बांधून ठेवण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून अनोळखी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे नगर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेबाबत तोफखाना पोलिसांना वेगळीच शंका आहे. संबंधित युवती मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास कॉलेजमध्ये एकटीच असताना अनोळखी सहाजणांनी संगनमताने तिचा हात पकडला. तिच्या पोटात लाथा मारल्या. तसेच दरवाजाला लावलेला दगड हातात घेऊन तिच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. मारहाण करताना मुलीने प्रतिकार केला. त्यावर केस करके तुमने गलती कर की, असे…

Read More

Distribute a set of inspirational books ः “समकालीन प्रकाशनतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमशील पुस्तकांचे वितरण केले जात आहे. ‘जागर वाचनाचा’ हा उपक्रम स्तुत्य आहे”, असे प्रतिपादन राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांनी केले. ‘जागर वाचनाचा’ उपक्रमांतर्गत राहुरी तालुक्यातील 22 शाळांना ग्रंथालयासाठी प्रेरणादायी पुस्तकांचा संच प्रदान करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. गटशिक्षणाधिकारी तुंबारे म्हणाले, “वाचन हा राज्य प्राप्तीचा मार्ग आहे. वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो. मोबाईल वापरामुळे वाचन कमी होत आहे. वाचन प्रेरणा रुजवण्यासाठी समकालीन प्रकाशन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. शालेय वयात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी समकालीन प्रकाशनाने दिलेला प्रेरणादायी पुस्तकांचा संच निश्चितच उपयुक्त ठरेल”. शिक्षण विस्तार…

Read More