Author: Kharee Gosht

Maharashtra Political ः महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज (ता. २७) यांनी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष उद्या (ता. २८) लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन देखील तोडगा न निघाल्याने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दहा दिवस झाले आहेत. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण जागावाटप झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीत वंचितच्या समावेशाचा घोळ कायम आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटात जागा वाटपावरून घोळ कायम आहे. जागावाटपानंतर बंडखोरीची सर्वांनाच भीती आहे. त्याचा फायदा…

Read More

Aam Aadmi Party ः आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला आहे. हुकुमशाही सत्ताधारी यांनी राजकीय सुढाच्या भावनेतून केलेल्या कृत्याचा नगर शहरात आम आदमी पक्षाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. हिटलरशाहीच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमा टांगून तानाशाही आणि हिटलरशाही विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनात आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्ष ॲड. विद्या शिंदे, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र…

Read More

Nagar Forest Department Rescue : राहुरी खुर्द येथील शिंगणापूर फाटा येथे वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या आढळून आला. वन विभागातील कर्मचारी आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तब्बच चार तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. मात्र या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वन विभागातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. बिबट्याने काही भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडला होता. बिबट्या शनिवारी (ता. २३) रस्ता पार करत असताना त्याला एका वाहनाची धडक बसून तो जखमी झाला. रात्रीपासून तो बिबट्या शिंगणापूर फाटा येथील विद्यापीठ क्षेत्रात झाडाझुडपात दबा धरुन बसला होता. काही लोकांना दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २४) दुपारी…

Read More

Rangotsav 2024 ः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) पुणे येथे 18 ते 19 मार्च दरम्यान झालेल्या रंगोत्सव 2024 कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंप्री (ता. नगर) एकूण आठ विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षिका उत्कृष्ट सादरीकरण केले. परिषदेच्या परिक्षकासह राज्य भरतील उपस्थित शिक्षकांची व अधिकाऱ्यांसह सर्वांची मन जिंकली. नगर मधील एका छोट्याशा गावातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी ‘कला समावेशित शिक्षण’ च्या माध्यमातून उत्तम कामगिरी करून राज्यस्तरीय रंगोत्सवामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. कला समावेशित शिक्षण, कृतीयुक्त शिक्षणावर आधारित राज्यातील सर्वोत्तम पाठ सादरीकरण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यात राज्यभरातून जवळजवळ वीस शाळांची सादरीकरण झाले.…

Read More

Teacher Bharati’s statement ः शिक्षक भारतीच्या निवेदना नंतर इयत्ता दहावीच्या विज्ञान-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देणे बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे पत्र आज निर्गमित झाले आहे. 18 मार्चला इयत्ता दहावीचा विज्ञान-1 या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला. यात प्रश्न-1 (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी अध्यक्ष/सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना निवेदन दिले. ‘हायड्रोजन’ आणि ‘हेलियम’ या दोन्ही उत्तरास मार्क मिळणार आहे, अशी माहिती शिक्षक…

Read More

Nagar Bank Association ः “बँक कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वेतन वाढमुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे. बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के वेतन वाढ देण्याचा करार मंजूर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील हितासाठी सेवा करारामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्या दृष्टीने बँक कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करण्याची गरज आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी केले. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन व इंडियन बँक असोसिएशन तर्फे कर्मचाऱ्यांना 17 टक्के वेतन वाढ देण्याचा पंचवार्षिक करार झाला. 12 व्या द्विपक्ष कराराची बँक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रमूख वक्ते तुळजापूरकर बोलत होते.…

Read More

Ahmednagar Crime ः संगमनेर तालुक्यातील साकुर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने विषारी द्रव्य पिऊन जीव दिला. तिच्यावर अत्याचार करणारे आणि त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या नराधमांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा स्थानिक महिलांनी कॅंडल मार्च काढून निषेध करण्यात आला. साकुर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाला. ती दहावीचे प्रवेशपत्र घेण्यासाठी शाळेत गेली होती. त्यावेळी तिला एका पानटपरीत नेऊन तिच्यावर अत्याचार झाला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतु बदनामीच्या भीतीने तिने विषारी द्रव्य घेऊन आपले जीवन संपवले. आरोपीने यापूर्वी देखील असेच कृत्य केले आहे. हा त्यांचा पहिला गुन्हा नाही. संघटीत पद्धतीने ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. अल्पवयीन मुलींना फसवत आहेत. या…

Read More

Ahmednagar Police ः कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. यासाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जयश्री विजय आव्हाड (रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी बुद्रुक, ता. राहुरी) या विवाहित युवतीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लग्न झाल्यानंतर सुमारे तीन महिने सासरच्या लोकांनी जयश्री हिला चांगल्या प्रकारे नांदवले. त्यानंतर धामोरी येथे जायचे नाही. तेथील काम सोडून दे. जादूटोणा करतेस. माहेरी जाऊ नको, असे म्हणून तिला शिवीगाळ करुन किरकोळ कारणावरून सासरचे लोकांनी मारहाण सुरू केली. शेतात कुक्कुटपालन करायचे आहे. यासाठी जयश्री हिने माहेरहून…

Read More

Ahmednagar Police ः नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. पतीचे दुसर्‍या एका मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाचा जाब विचारला म्हणून विवाहितेला सासरच्या लोकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सफिया सोहेल शेख (वय २९, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) विवाहित युवतीने फिर्याद दिली. सफिया शेख हिचा विवाह २४ डिसेंबर २०२२ सोयल नाजर शेख (रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे) याच्य बरोबर झाला होता. सासरच्या लोकांनी सफिया हिला सुरुवातीला दोन ते तिन महिने चांगले नांदविले. त्यानंतर काही दिवसानी सफिया हिचा पती सोहेल याची नोकरी गेल्याने सफिया हिने नोकरी करुन पैसा कमवावे. या कारणावरून…

Read More

Nagar MIDC Police ः नगर तालुक्यातील पोखर्डी येथे नशेसाठी वापरल्या जात असलेल्या गांजा झाडाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. कारवाईत ९२ हजार ५०० रुपये किमतीची ३७ किलोचा गांजाची झाडे जप्त करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली. पोखर्डी शिवारातील एका शेतात गांजाची झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाकडून खात्री करून घेण्यात आली. माहितीत तथ्य आढळल्याने सहायक निरीक्षक चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी उपअधीक्षक संपतराव भोसले यांना कळविले. उपअधीक्षक भोसले यांनी कारवाईच्या सूचना दिल्यावर सहायक निरीक्षक चौधरी यांनी…

Read More