Author: Kharee Gosht

Nagar Collector’s Office Meeting : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरिंग कमिटी) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी विविधमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण करणे, एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून उचित कारवाई करणे आदी कामे ही समिती करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक आज झाली. जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी तथा समितीचे सदस्य सुधीर पाटील, सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर,…

Read More

Experimental teacher Sachin Thange ः ऐतिहासिक कागदपत्रे असो वा शिवकालीन पत्रे असो, मोडी लिपीतील मजकूर अत्यंत सराईतपणे वाचण्याचे कौशल्य आता शालेय विद्यार्थी आवडीने आत्मसात करू लागले आहेत. पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगशील शिक्षक सचिन ठाणगे यांच्या संकल्पनेतून इयत्ता दुसरीचे विद्यार्थी मोडी लिपी शिकून तिचे वाचन आणि लेखन करण्याची आवड जोपासत आहेत. १९६० पूर्वी मोडी लिपी राज्यातील शालेय शिक्षणात शिकवली जात होती. परंतु कालांतराने मोडी लिपी शिकवणे बंद झाले. आता पुन्हा ऐतिहासिक दुर्मिळ दस्तऐवज, जुनी कागदपत्रे वाचण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मोडी लिपीचे महत्व वाढू लागले आहे. मोडी लिपीच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय…

Read More

Rahuri Agricultural University Staff Coordinating Association ः राहुरीतील महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील कर्मचारी समन्वय संघटनेच्या अध्यक्षपदी वनस्पती रोग शास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजय कोळसे यांची समन्वय संघाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर विद्यापीठ सेवेमधून निवृत्ती झाल्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. या बैठकीमध्ये डॉ. संजय कोळसे यांची अध्यक्षपदी तर संदीप लवांदे यांची उपाध्यक्षपदी, मोहन काळे यांची संघटकपदी व दीपक आवटी यांची सहखजिनदारपदी निवड करण्यात आली. डॉ. संजय कोळसे यांनी समन्वय संघटनेच्या स्थापनेपासून संघटनेत विविध पदांवर काम केले असून यापूर्वी त्यांनी कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेमध्ये तसेच सावित्रीबाई शिक्षण संस्थेमध्ये संचालकपदी व उपाध्यक्षपदी काम…

Read More

Nagar Police News ः दहावीचे पेपर दिल्यानंतर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील सात्रळ परिसरातील एका कॉलेज परिसरातून अपहरण झाल्याची घटना काल २६ मार्चला दुपारी घडली. या घटनेतील पीडित मुलीचा राहुरी पोलिसांनी २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. दहावी शिक्षण घेणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने काल २६ मार्चला दहावीचा पेपर दिला. यानंतर तिचे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण झाले. या घटनेची माहिती राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने गुन्हाचे तांत्रिक विश्लेषण करत पीडित मुलीचा शोध घेतला. या मुलीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय…

Read More

Municipal Labor Union ः महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी यांची बैठक नुकताच झाली. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी घरगुती कारणास्तव अध्यक्ष पदावर काम करताना अडचणी येत आहे, सांगून अध्यक्षपदापासून दूर झाले. यामुळे जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांची महापालिका कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. श्रमिक कार्यालय येथे जनरल सेक्रेटरी आनंद वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी घरगुती कारणास्तव अध्यक्ष पदावर काम करण्यास नकार दिला. परंतु महापालिका कामगारांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये, अशी भावना देखील व्यक्त केली. लोकसभेसाठी आदर्श आचारसंहिता सुरू आहे. यामुळे कामगार युनियनची सर्वसाधारण सभा आयोजित करणे शक्य…

Read More

Rahuri Shrine Dispute : राहुरीतील गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद हिंदू-मुस्लिम समाजाकडून निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे. हे धार्मिक स्थळ हिंदू-मुस्लिम, अशा दोन्ही समाजाचे श्रद्धास्थान आहे. या धार्मिक स्थळाची देखभाल करण्यासाठी ब्रिटिश काळापासून स्थानिक अल्पसंख्याक समाजाकडे आहे. तशी काही कागदपत्रे समोर येतात. गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणचे धार्मिक स्थळ हे हिंदू धर्मियांचे आहे, अशा मुद्यावरून हिंदू-मुस्लिम समाजात वाद सुरू आहे. हा वाद आता वक्फ बोर्ड, जिल्हाधिकारी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय अधिकार्‍यांसमोर आणि न्यायालयात सुरू आहेत. गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद लवकरात लवकर न्यायपद्धतीने निकालात निघावा, यासाठी आवश्यक ते सहकार्य सलोखा संपर्क गट करण्यास तयार आहे.…

Read More

Nagar City News ः नगर शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथे मागील एक महिन्यापासून दररोज सकाळी विद्युत पुरवठा खंडित होतो. यानतंर पुन्हा कमी दाबाने विद्युत पुरवठा सुरू होतो. यातून नागरिकांनी मानसिक त्रास सुरू होतो. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन विद्युत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. नगर शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात विद्युत पुरवठा करणारे दोन लाईन असून, त्यापैकी एका लाईनवरुन अनेक घरांना वीज पुरवठा होत आहे. मात्र मागील एक महिन्यापासून त्या लाईनची दररोज सकाळी लाईट जाणे किंवा विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दररोज हा प्रकार सुरु असून, या…

Read More

Mukundnagar News : नगर शहरातील मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदच्या मागील परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांवर भर उन्हात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तर याच परिसरात घरांसमोर ड्रनेजचे पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण व घरा समोर साचलेल्या घाण पाण्याच्या डबक्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लिम बहुल भाग असलेल्या या परिसरात सर्वच मुस्लिम बांधव रोजा धरत असतात. रोजाच्या सहेरीसाठी पहाटे चार वाजता उठावे लागते. यानंतर महिलांना दिवसभर रोजामध्ये घरातील काम करावी लागतात, परंतु सदरच्या भागात गेल्या…

Read More

Nagar News : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्यावतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. नवनाथ विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी पेटविण्यात आली. होळीत मावा, गुटखा, तंबाखू, विडी, दारुच्या बाटल्या, सिगारेट टाकून आमली पदार्थांचे दहण करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, विमल रासकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे उपस्थित होते. नाना डोंगरे म्हणाले, “युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तंबाखू,…

Read More

Flyover Nagar : नगर शहरातील मुख्य उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर आणखी दोन नवीन उड्डाणपूल होणार आहेत. पोलीस अधीक्षक चौक ते पत्रकार चौक आणि एमआयडीसीतील सह्याद्री चौक या ठिकाणी उड्डाणपूल होणार आहे. पोलीस अधीक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी माती परीक्षण केले जाणार आहे. या माती परीक्षणामुळे नगर शहरात पुन्हा तीन उड्डाणपूल साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नगर शहर हे राज्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणावरून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात आहे. यामुळे जड वाहतूक आणि दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असून परिणामी वाहतूक कोंडी होते. नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे.…

Read More